मंगळवार, ३ मार्च, २०२०

तेहरानमध्ये अडकलेल्या मोमीन यांचा खा.श्रीनिवास पाटलांना फोन

कराड (सातारा) : महाराष्ट्रातून हज यात्रेसाठी गेलेले 44 जण इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. कोरोना व्हायरसमुळे विमान रद्द झाल्यामुळे यात्रेकरू सध्या तेहरानमध्ये आहेत.

यात्रेकरूंपैकी एस एस मोमीन यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना संपर्क करून तेहरानमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती केली. त्याला प्रतिसाद देत खासदार पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

चीनमध्ये अडकलेल्या सातारच्या अश्वीनी पाटील यांच्यासह अन्य भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाठपुरावा केल्याने केंद्र शासनाने स्वतंत्र विमान पाठवून कार्यवाही केली.

ही घटना ताजी असतानाच पुन्हा महाराष्ट्रातील 44 हज यात्रेकरु इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकले आहेत. कोरोना व्हायरसमुळे त्यांचे विमान रद्द झाल्यामुळे यात्रेकरू सध्या तेहरानमध्ये आहेत. त्यातील श्री. मोमीन यांनी खासदार पाटील तसेच महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना दुरध्वनीवरुन संपर्क साधुन त्यांनी तेहरानमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली आहे. त्याची तातडीने दखल घेवुन खासदार पाटील यांनी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

अडकलेल्या 44 जणांना भारतात- महाराष्ट्रात आणण्यासाठीची कार्यवाही सुरु करण्याची विनंती त्यांनी परराष्ट्र मंत्रायाला पत्राव्दारे केली आहे. त्यासाठी आणखी उद्या खासदार पाटील स्वतः परराष्ट्र मंत्रालयात जावुन त्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याबाबत पुढाकार घेणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

थकीत कर्ज न भरणाकेल्याने दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल.

कर्ज न भरणार्‍यास दोन वर्षे तुरुंगवास व 80 हजार दंड कराड ज्युडिशीअल मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल. पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज मुदतीत...