बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला 3 महिन्यांची मुदतवाढ

मुंबई, दि. १ :  राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात काल आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा, बॉम्बे चॅरीटेबल ट्रस्ट आणि बॉम्बे नर्सींग होम कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार असून कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.राज्य या शासनाच्या या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना शासन निर्धारित दरानुसार रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. खाटा राखीव करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्र वगळता जिल्हाधिकारी यांना तर महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्यस्तरावर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार देण्यात आले आहेत.

 

खासगी रूग्णालये कोरोनाच्या रूग्णांकडून मनमानी करत बिल आकारणी करीत होते. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना या अधिसुचनेत जे दर निश्चित करून देण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आकारणी करावी लागणार आहे.

 

सुधारीत अधिसूचनेमधील दरसूचीत रुग्णाला वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनचे दर देखील समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्सीजनपोटी स्वतंत्र रक्कम आकारता येणार नाही. पीपीई कीटच्या दरांबाबत देखील या अधिसूचनेमध्ये उल्लेख करण्यात आला असून सामान्य वॉर्डमध्ये पीपीई कीट वापरल्यास प्रति दिवस ६०० रुपये आकारले जातील तर अतिदक्षता आणि व्हेंटीलेटरची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पीपीई कीट वापरासाठी प्रति दिवस १२०० रुपये इतके आकारले जातील. त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास रुग्णालयांना कारणमिमांसा द्यावी लागणार आहे. रुग्णाला बिल देण्यापूर्वी ते नेमण्यात आलेल्या लेखा परिक्षकाकडून तपासूनच देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आहेत. रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने होणाऱ्या दर आकारणी बाबत तक्रार complaints.healthcharges@jeevandayee.gov.in या ईमेलवर नागरिकांनी पाठवावी असे आवाहन करतानाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि राज्य  आरोग्य सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांना तक्रार निवारणीसाठी  प्राधिकृत करण्यात आले आहे

सातारा : जिल्ह्यातील नवीन 589 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि.1:  जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सुद्धा दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढता पहायला मिळाला. जिल्ह्यातील नवीन 589 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आल्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 15247 वर; पोहचली आहे.
रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब - 138,  एन सी सी एस - 55,  कृष्णा   -85 ,  अँटी जन टेस्ट ( RAT) - 277 , खाजगी लॅब - 34 असे सर्व मिळून  589  जण बाधित आहेत रुग्णांची तालुकानिहाय, गाव निहाय सविस्तर माहिती
----------–-----------------------
*जिल्ह्यातील 589 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 16  नागरिकांचा मृत्यु*
सातारा दि.2:  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*कराड* तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, सोमवार पेठ 5, रविवार पेठ 2,   मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शिवाजीनगर 1,   श्री हॉस्पीटल 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 4, आगाशिवनगर 6, मलकापूर 6,  कापेर्डे हवेली 8, वाखाब 1, केदारवाडी 1, वाखन 1, रेठरे  बु 1,मुंडे 2, पेर्ले 4, खुबी 1, ओंड 1, वडगाव 2, श्रद्धा क्लिनीक 1, घानोशी 1, कपील 1, उंब्रज 4,  गोळेश्वर 1, शिरवडे 1, वडगाव 1, आटके 1, केसेगाव 1,  बनवडी 3 कार्वे 2, विद्यानगर 1, दुशेरे 1, हरपळवाडी 1, शिरवडे 1, करवडी 2,  वडगाव हवेली 2, बेलवडे बु 2, गोळेश्वर 2, कोडोली 1, येरवळे 1, विरवडे 1,  पाल 7, रेठरे खु 4, उंडाळे 1, नारायणवाडी 1, काले 4, कर्वे नाका 1, सुपने 1, गमेवाडी 1, नंदगाव 1, वारुंजी फाटा 2, चव्हाण नगर वारुंजी 1, मार्केट यार्ड कराड 1, *सातारा* तालुक्यातील सातारा 31, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, रविावार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  बुधवार पेठ 1,  मल्हार पेठ 1,  एलआयसी ऑफीस क्वार्टर पोवई नाका 1,  संभाजीनगर 5, विलासनगर 1,  गोवे 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 4, करंजे पेठ 3, सदरबझार 7, संगमनगर 1, व्यंकटपुरा पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, विलासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 2, शाहुनगर 1,  शाहूपुरी 6, गोडोली 1, बापुजी साळुंखे नगर कोडोली 1,    नागठाणे 1, शेळकेवाडी 1, गुलमोहर कॉलनी 1, आयटीआय रोड, सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, गोळीबार मैदान सातारा 2, खेड 1, पळशी 1, लिंब 1, नेले किडगाव 1, नेले 1, बसाप्पाचीवाडी 4, कामेरी 1, चिंचणेर वंदन 2, सोनगाव 1, जरंडेश्वर नाका, सातारा 1, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, भरतगाव 1, पार्ली 1, 
*पाटण* तालुक्यातील पाटण 3, मारुल 1, रामपूर 1, अवर्डे 2, तारळे 1, दुताळवाडी 4, होळ 1, तळमावले 1,  
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 5,  बुरुड गल्ली 5, ऐकंबे रोड 6, रहिमतपूर 1, वाठार किरोली 4, व्यापार पेठ 6, जांब 2, शिवाजीनगर 1, नंदगिरी 1, चिमणगाव 8, वाठार स्टेशन 1, करंजकोप 5, पिंपोडे बु 1, आनपटवाडी 1, चौधरवाडी 5, बर्गेवाडी 1, पाडळी 1, कोया 1, ल्हासुर्णे 1, कटापूर 2, रहिमतपूर 3, साप 1, 
*माण* तालुक्यातील म्हसवड 18,  इंजबाव 1, मार्डी 1,  राणंद 3,  माण 1, दहिवडी 1, वडगाव 2,  बिदाल 1, कुळुकजाई 1, 
*खटाव* तालुक्यातील मायणी 18,  वडूज 13, गणेशवाडी 2, पुसेसावळी 2, पळशी 1, गुरसाळे 1, बुध 1, पुसेगाव 1, पुसेगाव 1, औंध 3,  
*फलटण* तालुक्यातील फलटण 7, बुधवार पेठ 2, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,  मलटण 3, मुंजवाडी 3, कोळकी 2, शुक्रवार पेठ 3, निरगुडी 7, सासवड 1,  राजाळे 1, झिरपवाडी 2, सस्तेवाडी 2, पवार वस्ती विडणी 1, पिप्रद 1,  साखरवाडी 1, विडणी 1, कसबा पेठ 1, बोराटे वस्ती पिपरद 1, बरड 2,  जिंती 1,  आसू 1, 
*खंडाळा* तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ 5,  तालीम चौक शिरवळ 5,  पिसाळवाडी 1, शिरवळ 6,  शिंदेवाडी 1,  न्यु कॉलनी शिरवळ 1, फुलेमळा 2,  स्टार सिटी शिरवळ 1, पाडेगाव 5, बीरोबा कॉलनी शिरवळ 1,  खंडाळा 1, देवघर 1,  लोणंद 8, बाधे 2, धनगरवाडी 1, पाडेगाव 1,  पाडेगाव 1, 
*महाबळेश्वर* तालुक्यातील गोडोवली पाचगणी 15, पाचगणी 1, संभाजीनगर 1, नगरपालिक 2, एमटीडीसी 1,  देवळाली 1,  वालवने 2, रांजणवाडी 4, नगरपालिका सोसायटी 1, 
*वाई* तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, गंगापुरी 2, सोनगिरीवाडी 1, यशवंतनगर 1,  भुईंज 1, कवटे 7, केंजळ 1, गरवारे वॉल एमआयडीसी 1, रविवार पेठ 3, धनगवाडी एमआयडीसी 1, उरमोडे 1, शेंदूजर्णे 1, ब्राम्हणशाही 1, 
*जावली* तालुक्यातील दारे खुर्द 1,  अंबेघर 1, 
*इतर* 12
 बाहेरील जिल्ह्यातील मालगाव जि. सांगली 1, वाळवा जि. सांगली 1, नाडे सिटी, पुणे 1, इस्लमापूर 2, पेठ जि. सांगली 1, कोल्हापूर 1,  किल्लेमच्छींद्र ता. वाळवा 1, तांबवे ता. वाळवा 2 
*16 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे बुध ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष, माची पेठ सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड येथील 74 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 60 वर्षीय पुरुष. तसेच जिल्याकोतील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठ वाई येथील 62 वर्षीय महिला, शेंदूजर्णे ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई येथील 78 वर्षीय पुरुष, रामडोह आळी वाई येथील 60 वर्षीय महिला, गंगापुरी  वाई येथील 83 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 53 वर्षीय महिला, भवानी पेठ सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 16 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --   45723
एकूण बाधित --  15247
घरी सोडण्यात आलेले ---   7778
मृत्यू --  430
उपचारार्थ रुग्ण --   7039

साताऱ्यात उभं राहणार 250 बेडचे कोविड हॉस्पिटल ; पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्याकडून पाहणी

साताऱ्यात उभं राहणार 250 बेडचे कोविड हॉस्पिटल ; पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री यांच्याकडून पाहणी

सातारा दि.1 :  सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पहाणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.
या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 7 ते 8 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे, कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्राहलयात 250 बेडचे कोरोना रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली आहे. या कोरोना रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयात 200 ऑक्सीजन बेड व 50 आयसीयुबेड असणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या सर्व सुविधा  उपलब्ध करुन द्या, अशा सूचनाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी मंजूर करण्यात आलेल्या 250 बेडेचे कोरोना रुग्णालयांचे काम तातडीने करुन लवकरात लवकरत पूर्ण करून वापरात येईल त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी या  पाहणी प्रसंगी केल्या.
कोरोनाची भिती बाळगू नये पालकमंत्री यांनी केले जनतेला आवाहन
गेल्या 7 ते 8 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढली आहे.  कोरोना रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. तरी जनतेनही घाबरुन न जाता कोरोनाचा खंबीरपणे मुकाबला केला पाहिजे.
मला 14 ऑगस्ट रोजी त्रास जाणवू लागल्यामुळे माझी कोरोनाची चाचणी केली. माझा अहवाल पॉझिटिव्ह आला,  मला कुठलाही त्रास जाणवत नव्हता. आज मी 14 दिवसानंतर पूर्णपणे बरा झालो आहे. तुमच्या सेवेत रुजू झालो आहे. जनतने कोरोनाला न घाबरता खंबीरपणे मुकाबला करावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

तळमावले : जि.प.प्राथमिक शाळा बादेवाडी येथे स्वाध्याय मालाचे वितरण

जि.प.प्राथमिक शाळा बादेवाडी येथे स्वाध्याय मालाचे वितरण
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील बादेवाडी (कुठरे) येथील इ.1 ली ते 4 थी पर्यंतच्या सर्व विद्याथ्र्यांना मोफत स्वाध्याय मालाचे वितरण करण्यात आले. स्वाध्याय माला खरेदी करण्यासाठी माजी विद्यार्थी वसंत जाधव, विलास जाधव, संजय जाधव, रविंद्र चव्हाण, अनिल लोकरे, शशिकांत शिंदे, सुनील पवार, रघुनाथ शिंदे यांनी मदत केली.
स्वाध्याय माला वितरणप्रसंगी विद्याथ्र्यांचे पालक उपस्थित होते. प्रतिवर्षी माजी विद्याथ्र्यांच्यावतीने सर्व मुलांना वहया वाटप, गणवेश वाटप व अन्य शैक्षणिक साहित्य वितरित केले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कदम मॅडम, पाटील मॅडम यांनी माजी विद्याथ्र्यांचे आभार मानले.  

तळमावले : शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
तळमावले/वार्ताहर
पवारवाडी (कुठरे) ता.पाटण येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सुमारे 50 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केले. जि.प.प्राथमिक शाळा पवारवाडी कुठरे येथे या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हे शिबीर घेतले गेले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पवार, दत्तप्रसाद कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अविनाश पवार, सुनील पवार, मनीष कदम, अक्षय कदम, अनिकते शेजवळ, अजित लोहार, आकाश लोहार, संदीप लोहार, दत्ता पवार, विक्रम कदम, दीपक लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत.

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 30 सप्टेंबर पर्यंत सुधारीत आदेश जारी• 2 सप्टेंबरपासून व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचाली विनापास सुरु.. • 2 सप्टेंबरपासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीस परवानगी..• 2 सप्टेंबरपासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना आदर्श कार्यप्रणालीनुसार चालू ठेवणेस परवानगी..• आदेशात बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच..

पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 30 सप्टेंबर पर्यंत सुधारीत आदेश जारी

2 सप्टेंबरपासून व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचाली विनापास सुरु.
• 2 सप्टेंबरपासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीस परवानगी..
2 सप्टेंबरपासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना आदर्श कार्यप्रणालीनुसार चालू ठेवणेस परवानगी..
• आदेशात बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच..
सातारा दि. 31 :  आज दि. 31 ऑगस्ट रोजीच्या  शासनाच्या आदेशानुसार  राज्यातील कोरोना (कोविड-19) च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून सदर लॉकडाऊन कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार सातारा जिल्हयात 1 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. 
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत.
•   सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन/ अंतराचे शिक्षणास परवानगी राहील. 
•   चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उदयाने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील ), बार, सभागृह, असेंबली हॉल  यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. 
•  रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा आदर्श कार्य प्रणाली नुसार चालू राहील.
•   सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
•    सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.
•    सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यासांठी बंद राहतील. तथापि, सर्व धार्मिक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तींकरिता बंद राहतील.  तथापि, तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.  
•    वय वर्ष 65 वरील व्यक्ती, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील. 
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील.
•       दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. 
•       दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी /मान्यता/ई-परवान्याची आवश्यकता नाही. 
•       दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
•       बाहय शारिरीक क्रियाकलाप (Outdoor Physical Activities) करणेस कोणतेही बंधन असणार नाही. 
•       सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढीलप्रमाणे परवानगी राहील.  टॅक्सी / कॅब/ ॲग्रीगेटर  - फक्त अत्यावश्यक 1+ 3,   रिक्षा  - फक्त अत्यावश्यक 1+ 2,  चार चाकी-  फक्त अत्यावश्यक 1+3,  दोन चाकी – 1 +  1  मास्क व हेल्मेटसह.  प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. 
•     सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये चालु रहातील.  तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.
•     सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 20 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश  दि.26/06/2020 मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 
•     अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.
•     वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)
•     केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि.27 जून 2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे. 
•   सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि. 11 जून 2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
•     सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे. 
•     अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस परवानगी राहील.

घालून दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्यास दंडात्मक/फौजदारी कारवाई
•     सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा.
•     सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा
•     दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु.500/- दंड आकारावा. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 1000/- दंड आकारावा. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु. 1000/- दंड आकारावा. शहरी भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 2000/- दंड आकारणेत आकारावा. व शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
•     जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 

कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
•     शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.
•   कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. थर्मल स्कॅनिंग, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची येतानाचे व जातानाचे ठिकाणावर व्यवस्था करावी.
•     कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.
•     औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 
आरोग्य सेतु ॲप चा वापर- जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.
मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील 31 ऑगस्ट रोजीच्या आदेशा मधील Annexure I मध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 
कटेंनमेंट झोन- ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहिर करण्याचे अधिकार इन्सीडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित कंटेनमेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश कंटेनमेंट झोन वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच  कंटेनमेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सीडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेनमेंट झोन कोरोनामुक्त (अप्रभावी) झाल्यानंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सीडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने कंटेनमेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.
कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.
जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील 31 ऑगस्ट रोजीच्या आदेशामधील Annexure III मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी, असेही या आदेशात नमूद आहे. 

000

सातारा :जिल्ह्यातील 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 17 बाधित नागरिकांचा मृत्यू

 सातारा दि.31:  जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी सुद्धा दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढता पहायला मिळाला. जिल्ह्यातील नवीन 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आल्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 14658 वर; आतापर्यंत 397 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब - 173,  कृष्णा   -85 ,  अँटी जन टेस्ट ( RAT) - 380  , खाजगी लॅब - 23 असे सर्व मिळून 661 जण बाधित आहेत*

रुग्णांची तालुकानिहाय, गाव निहाय सविस्तर माहिती.
–―--------------------------
जिल्ह्यातील 661 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 17 बाधित नागरिकांचा मृत्यू

सातारा दि. 1  : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 661 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील   सातारा 27, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1,  गुरुवार पेठ , शुक्रवार पेठ 1,  शनिवार पेठ 5, सदाशिव पेठ 1, शाहूनगर 2,  प्रतापसिंहनगर 1, करंजे पेठ 1, यादोगोपाळ पेठ  1, करंजे 1, पिल्लेश्वरीनगर करंजे 1, फॉरेस्ट कॉलनी गोडोली 1,  विलासपूर गोडोली 1,  व्यंकटपूरा पेठ 1, संभाजीनगर एमआयडीसी 1, केसरकर पेठ 1, भवानी पेठ 1, संगमनगर 1,  कृष्णानगर 1, अजिंक्यतारा 1, सदरबझार 1, अलंकार भवन 1,  स्टेट बँक पारंगे चौक 1, बालाजी साळुंखेनगर  1, गोळीबार मैदान 2, कामाठीपुरा 1, मेघदूत कॉलनी 1, न्यु क्रांती सोसायटी संभाजीनगर 1, अश्वीनी पार्क वनवासवाडी 1, संगम माहूली 1, जवान हौ. सोसायटी जरंडेश्वर नाका 1, विसावा नाका 1, सातारा सिव्हील  3, संभाजीनगर 1,  शळेकेवाडी 1, बागल चौक मालगाव 1, चिंचणेर 1,  किडगाव 1, नेले 1, आने 1,  शिवनगर 1, कोडोली 1,  चोरे 1, कळंबे 1, कण्हेर 4, वडूथ 10,  दरेखुर्द 7,  निसराळे 2, गोवे 1,  पोलीस लाईन 1, लुमनेखोल 1, खेड 1, लिंब 2, विलासपुर 1, कोंडवे 1, नागठाणे 2, 

कराड तालुक्यातील  कराड 15, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 7, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5,  शनिवार पेठ  19, रविवार पेठ 1,   कृष्णा मेडीकल कॉलेज 2,  विद्यानगर सैदापूर 9,  कोयना वसाहत 1,  काझीवाडा परीसर 1, कार्वेनाका 7,   वखाणनगर ,  श्री हॉस्पीटल 6, गजानन हौसिंग सोसायटी 2,  शिवाजी हौसिंग सोसायटी 1, यशवंतनगर 1, विजयनगर 2, मार्केटयार्ड 1, गोळेश्वर रोड 1, बापूजी साळुंखे नगर 1, दादासाहेब चव्हाणनगर 2,  मलकापूर 16, आगाशिवनगर 2, खराडे , पाल 2, आरेवाडी 1, कुसूर 1, उंडाळे 1,  रेठरे बुद्रुक 8,  साकुर्डी 5, विंग 1, काले 2, वाघेवाडी 1,  ओंड 1, नडशी 1,  पाडळी केसे 2,  कोनेगाव 2, कापूसखेड 1,  शिरवडे 1, तांबवे 2, शेरे 3, आटके 3, वाण्याचीवाडी 1, उब्रंज 2, पोतले  1, कोपर्डे हवेली 1,  सुपने 2, वडगाव हवेली 1, वहागाव 1, बेलवडे बुद्रुक 3, मुंढे 2,  पार्ले 1, गोळेश्वर 3, जखीणवाडी 1, वसंतगड 1,  वनवासमाची-हजारमाची 1, 
 
पाटण तालुक्यातील पाटण 4, मल्हारपेठ 1,  म्हावशी 1, नावडी 1, नाडे 1,  मारुल हवेली 1, बेलावडे खुर्द 3, मालदन 1, सणबुर 2

महाबळेश्वर तालुक्यातील   कुंभरोशी 1, अंबाघर तारकुडाळ 5, गोडवली 1,  खिंगर 1, संजिवन विद्यालय पाचगणी 2, 

वाई तालुक्यातील  वाई शहरातील रविवार पेठ 2 , गणपती आळी  2, ब्राम्हणशाही 2, गंगापूरी 2,  अमृतवाडी 1, आसरे 1, यशवंतनगर 5, गणेशनगर 3, मुंगसेवाडी 1, बदेवाडी 2, शेंदुरजणे 7, दह्याट 1, सिध्दनाथवाडी 2, सुरुर 1, उडतारे 10, व्याजवाडी 1,  मलतपूर 6, मांढरदेव 1, शेलारवाडी 4,  भोगाव 7, मेढा 3,  कण्हूर 1, बोपेगाव 1, बावधन 5, कवठे  7, 

खंडाळा तालुक्यातील   केसुर्डी 3, खेड 6, पाडळी 4, शिरवळ 8,  पिसाळवाडी 9,  नायगाव 1, निंबोडी 1, लोणंद 3, चव्हाणवस्ती पिंपरे बुद्रुक 4,  अंदोरी 1, माळआळी शिरवळ 1, चव्हाण आळी शिरवळ 1 , शिंदेवाडी 1

जावळी तालुक्यातील    जवळवाडी 2,  मेढा 13,  बिभवी 1, बामणोली 1, अंबेघर 1, बामणोली 1, भणंग 1, 

फलटण तालुक्यातील  फलटण 3,  फलटण शहरातील  सोमवार पेठ 2,  रविवार पेठ 1, उब्रेश्वरचौक 1,   भडकमकरनगर  1 , शिंदेनगर 1, भास्कर गल्ली 1, परिट गल्ली 1, शिंपी गल्ली 1, विद्यानगर 1, वाखरी 2, काळज 1, चौधरवाडी  6, मलठण 4,  तामखाडा  12,  तरडगाव 4,  कोळकी 3, जिंती 1, पदमावतीनगर 3, सस्तेवाडी 1, धुळदेव 1, जाधववाडी 2, विडणी 3, सरडे 1, पिंप्रद 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, , आसू 1, 

कोरेगाव  तालुक्यातील कोरेगाव 5, तारगाव 2, वाठार किरोली 1, मिलीट्री अपशिंगे 2, रामोशीवाडी 2, भिवडी 1, दहिगाव 1, पिपोंडे बुद्रुक 1, रहिमतपूर 7, वाठार स्टेशन 1, करंजखोप 1, शिवाजीनगर 1, 

खटाव तालुक्यातील  खटाव 2,   पुसेसावळी 21, राजाचे कुर्ले 1, बुध 1,  चोराडे  11, उंचीठाणे 1, निमसोड 2, वडगाव 2, अंबवडे 6, खातगुण 13, वडूज 5,  विसापूर 10, येळीव 3, औंध 2, वरुड 1, डिस्कळ 1, कातरखटाव 1, 

माण तालुक्यातील  म्हसवड 9, दहिवडी 3, पळशी 7, 

इतर जिल्हा-  कडेगाव (सांगली) 1, केदारवाडी –वाळवा (सांगली) 1 , इस्लामपूर (सांगली) 1, डहाणू रोड (ठाणे), 

इतर 1,

17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या  केसरकर पेठ सातारा येथील 63 वर्षीय महिला,  निसराळे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष,  पाली, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, चोराडे वडूज येथील  70 वर्षीय पुरुष, बसप्पाची वाडी सातारा येथील 65 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, वाघेरी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष,  शेडगेवाडी कराड येथील  67 वर्षीय पुरुष असे एकूण 8 नागरिक तसेच विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये  मांढरदेवी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष, म्हातेखुर्द ता. जावळी येथील 47 वर्षीय पुरुष,  सैदापूर कोंडवे ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष,  संगममाहुली सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 49 वर्षीय पुरुष असे एकूण 5 तसेच फलटण येथे तांबखडा येथील 54 वर्षीय पुरुष, बागेवाडी येथील  45 व 34 वर्षीय पुरुष असे एकूण 3 तर कोरोना केअर सेंटर मायणी येथे मायणी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष अशा सर्व एकूण  17 कोरोनाबाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

घेतलेले एकूण नमुने                       --   45106
एकूण बाधित                                --  14658
घरी सोडण्यात आलेले                   --   7592
मृत्यू                                           -- 414
उपचारार्थ रुग्ण                             -- 6652

00000

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...