जि.प.प्राथमिक शाळा बादेवाडी येथे स्वाध्याय मालाचे वितरण
पाटण तालुक्यातील बादेवाडी (कुठरे) येथील इ.1 ली ते 4 थी पर्यंतच्या सर्व विद्याथ्र्यांना मोफत स्वाध्याय मालाचे वितरण करण्यात आले. स्वाध्याय माला खरेदी करण्यासाठी माजी विद्यार्थी वसंत जाधव, विलास जाधव, संजय जाधव, रविंद्र चव्हाण, अनिल लोकरे, शशिकांत शिंदे, सुनील पवार, रघुनाथ शिंदे यांनी मदत केली.
स्वाध्याय माला वितरणप्रसंगी विद्याथ्र्यांचे पालक उपस्थित होते. प्रतिवर्षी माजी विद्याथ्र्यांच्यावतीने सर्व मुलांना वहया वाटप, गणवेश वाटप व अन्य शैक्षणिक साहित्य वितरित केले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कदम मॅडम, पाटील मॅडम यांनी माजी विद्याथ्र्यांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा