मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

तळमावले : शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
तळमावले/वार्ताहर
पवारवाडी (कुठरे) ता.पाटण येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सुमारे 50 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केले. जि.प.प्राथमिक शाळा पवारवाडी कुठरे येथे या रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हे शिबीर घेतले गेले. सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पवार, दत्तप्रसाद कदम, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अविनाश पवार, सुनील पवार, मनीष कदम, अक्षय कदम, अनिकते शेजवळ, अजित लोहार, आकाश लोहार, संदीप लोहार, दत्ता पवार, विक्रम कदम, दीपक लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वीही विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...