
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ३० जून, २०२५
कुंभारगाव, ढेबेवाडी परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश.

शनिवार, २८ जून, २०२५
कु़ंभारगाव ग्रामपंचायतिच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश.
कुंभारगाव : जनावरे घेऊननिघालेल्या महिलेला लुबाडले; गळ्यातील सोन्याचे दागिने दोघांनी हिसकावून पोबारा
गलमेवाडी- येवती मार्गावर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांची माहिती अशी, गलमेवाडी येथील अक्काताई राजाराम चोरगे (वय ६०) या नेहमीप्रमाणे सकाळी गावाजवळ डोंगरात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. सायंकाळी तेथून गलमेवाडी- येवती रस्त्याने त्या घरी निघाल्या असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेले दोघे अगोदर काही अंतर पुढे गेले. नंतर माघारी येऊन चोरगे यांच्याजवळ गेले. हा रस्ता पुढे कुठे जातो, पुढे गाव कोणते आहे, आदी विचारणा त्यांनी केली. यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यातीलच एकाने चोरगे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व अन्य एक दागिना हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला.या घटनेनंतर ढेबेवाडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चेक केले आहेत.लवकरच आरोपींना अटक केली जाईल या दिशेने तपास सुरू आहे.असे पोलिसांनी सांगितले.
शनिवार, २१ जून, २०२५
दिवशी बुद्रुक सोसायटीत भाजपची एक हाती सत्ता.तालुक्यातील भाजपचे कमळ फुलले..
शुक्रवार, २० जून, २०२५
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव एकत्र शासनाकडे सादर करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.20 : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे. नुकसार भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थिती व पर्जन्यमान स्थितीचा आढावा दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विगाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाऊसामुळे पिण्याचे पाणी गढूळ येत आहे या पाण्यामुळे पोट दुखी, जुलाब उलट्या अशा आजारांना सामारे जावे लागते ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने उपचार द्यावे यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालय सोडू नये. प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधासाठा करुन ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
अतिवृष्टीमुळे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या योजना तसेच विद्युत पोल, विद्युत तारा तुटल्या आहेत, याचेही नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील विविध वाहतूक मार्गावर भुस्खलन झाल्यास तेथील राडा रोड काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा तयार ठेवावी. शाखा अभियंता यांनी मान्सून कालावधीत आपल्या तालुक्यात रहावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
मोठ्या धरणात 32 टक्के तर लहान धरणाांमध्ये 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. लहान धरणातून अंदाजे पुढील आठवड्यात विसर्ग सोडला जाईल. कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात तीन रस्ते बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...
-
ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी, पाटण तालुक...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...



