शनिवार, २१ जून, २०२५

दिवशी बुद्रुक सोसायटीत भाजपची एक हाती सत्ता.तालुक्यातील भाजपचे कमळ फुलले..


दिवशी बुद्रुक सोसायटीत भाजपची एक हाती सत्ता.

 
पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यात झालेल्या पहिल्याच अतिशय प्रतिष्ठेच्या व रंगतदार अशा सहकार क्षेत्रातील निवडणुकीत दिवशी बुद्रुक येथील पावनाईदेवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या पॅनलचा बारा शुन्य असा धुव्वा उडवत दिवशी बुद्रुक सोसायटीची एकहाती सत्ता आपल्या ताब्यात घेतली.

सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व टाटा कंपनीचे कामगार नेते सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत पावणाईदेवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी घवघवीत यश मिळवत ना. देसाई गटाच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला. सोसायटीच्या बारा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये सर्वसाधारणमधून विश्वजीत पाटणकर,अशोकराव पाटील, भगवान पाटील, मोहन बोंद्रे, प्रकाश यादव, जालिंदर सूर्यवंशी, निवास सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी, महिला राखीव मधून सौ. जयश्री थोरात, सौ. विमल सूर्यवंशी, अनुसूचित जाती जमाती रघुनाथ महापुरे, इतर मागासवर्गीय सुभाष कुंभार हे उमेदवार बहुमताने निवडून आले. नवनिर्वाचित संचालकांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, युवा उद्योजक
याज्ञसेन पाटणकर, टाटाचे कामगार नेते सुजित पाटील, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती राजेश पवार, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, विक्रमसिंह पाटणकर दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतकांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...