गलमेवाडी- येवती मार्गावर सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांची माहिती अशी, गलमेवाडी येथील अक्काताई राजाराम चोरगे (वय ६०) या नेहमीप्रमाणे सकाळी गावाजवळ डोंगरात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. सायंकाळी तेथून गलमेवाडी- येवती रस्त्याने त्या घरी निघाल्या असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेले दोघे अगोदर काही अंतर पुढे गेले. नंतर माघारी येऊन चोरगे यांच्याजवळ गेले. हा रस्ता पुढे कुठे जातो, पुढे गाव कोणते आहे, आदी विचारणा त्यांनी केली. यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यातीलच एकाने चोरगे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व अन्य एक दागिना हिसकावून दुचाकीवरून पोबारा केला.या घटनेनंतर ढेबेवाडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चेक केले आहेत.लवकरच आरोपींना अटक केली जाईल या दिशेने तपास सुरू आहे.असे पोलिसांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा