शनिवार, २८ जून, २०२५

कु़ंभारगाव ग्रामपंचायतिच्या पाच ग्रामपंचायत सदस्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश.

कु़ंभारगाव ग्रामपंचायतिच्या पाच सदस्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश.
दि.२८ जुन २०२५  शनिवार रोजी  सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) कार्यालय सातारा याठिकाणी राज्यसभेचे विद्यमान खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री नितीन काका पाटील यांच्या उपस्थितीत आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व माजी शिक्षण अर्थ व क्रिडा सभापती आणि सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा श्री संजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली कुंभारगाव ग्रामपंचायतिच्या पाच विद्यमान सदस्य मा श्री किशोर चव्हाण, सौ वैशाली गुरव, सौ शितल गुरव ,मा श्री संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य) ,मा अनिल  काळुगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा श्री बाळासाहेब सोळस्कर, रयत सहकारी साखर कारखाना संचालक मा श्री प्रशांत पाटील  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्येकर्त उपस्थित होते.
यावेळी श्री संजय देसाई म्हणाले की सातारा जिल्ह्याबरोबर पाटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असून,सहा महिन्यांत कुंभारगाव ग्रामपंचायतीची मुदत संपत असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाची सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...