सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

राज्यपालांच्या हस्ते डाॅ.संदीप डाकवे यांना शासनाचा शेतीमित्र पुरस्कार प्रदान.

 राज्यपालांच्या हस्ते डाॅ.संदीप डाकवे यांना शासनाचा शेतीमित्र पुरस्कार प्रदान.



तळमावले/वार्ताहर
    पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळयात राज्यपालांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे, कृषि आयुक्त रविंद्र निबवडे भा.प्र.से., कृषि सचिव जयश्री भोज भा.प्र.से, व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत डॉ.संदीप डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आले. याप्रसंगी डॉ.संदीप डाकवे यांची आई गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, मुले चि.स्पंदन, कु.सांची आणि भाची कु.अक्षता निवडूंगे, पुजा निकम, सुनिल पवार, जनार्दन सुतार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. रुपये 1 लाख 20 हजार, मानपत्र, मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
    या पुरस्कार वितरण सोहळयात राज्यपाल सी. पी. सुब्रमण्यम उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
    डाॅ.संदीप डाकवे यांनी कृषिविषयक बातम्या, शेतकरी यशोगाथा, कृषि योजना प्रसारासाठी स्वतःची प्रकाशने, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून राबवलेले उपक्रम, यासोबतच विविध समाज माध्यमांचा वापर प्रभावीपणे करत लिखाण केले होते. याची दखल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय यांच्यावतीने घेवून कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर केला आहे.
    सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ऍड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा संतोषकुमार बरकडे, कृषि विकास अधिकारी जि.प.सातारा विजय माईनकर, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे, तंत्र अधिकारी (विस्तार) जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा समीर पवार, कृषि सहायक प्रमोद गाढवे, कृषि सहाय्यक गणेश सावंत, कृषी सहाय्यक प्रदीप मराठे, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, वांगव्हॅली पत्रकार संघ, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री भोज भा.प्र.से.यांनी केले.

 पुरस्कार मिळाल्याचा आंनद पण वडिलांची उणीव : डाॅ.संदीप डाकवे
    माझे वडील राजाराम डाकवे यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेती आणि मातीशी अखंड नाते जपले होते. या पुरस्कारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मला मिळालेला वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मी त्यांना समर्पित केला असून पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे पण तो स्वीकारताना वडीलांची उणीव जाणवतेय अशी भावनिक प्रतिक्रिया शेतीमित्र पुरस्कार प्राप्त डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

राज्यपालांकडून कौतुक, अजितदादांकडून शाबासकी :
पुरस्कार वितरणाची वेळ अत्यंत काटेकोर होती, त्या वेळेतही डॉ. डाकवे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे अक्षर गणेशा भेट दिले. राज्यपालांनी डॉ.डाकवे यांचे कौतुक केले. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यपालांना डॉ.संदीप डाकवे यांच्या कलेची माहिती देत शाबासकी दिली.


 



गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजितदादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी विविध ‍विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम.

 

मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजितदादा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत

रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी विविध ‍विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम. 


 

 

पाटण दि.26:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 289 कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व ना.अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रताराव जाधव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा. दौलतनगर ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

        प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे.यामध्ये काळोली ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकूल 5 कोटी रुपयांचे कामाचा लोकार्पण सोहळा, पाटण नगरपंचायत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या 20 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन, नाडे ता.पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळयाचा लोकार्पण सोहळा, मल्हारपेठ ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय मल्हारपेठच्या 50 लक्ष रुपयांचे नुतनीकरण केलेलया इमारतीचा लोकार्पण सोहळा,वाटोळे ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागोच 94 कोटी रुपांचे प्रशिक्षण केंद्राचे ई भूमिपूजन, मोरणा गुरेघर येथील बंदिस्त पाईप लाईन आणि नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या 90 कोटींचया कामांचे ई भूमिपूजन, तारळी प्रकल्पामधील 50 मीटर व 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या 79 कोटींच्या कामांचा लोकार्पण सोहळा अशा पध्दतीले शिवसेना-भाजपा महायुती शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 289 कोटी रुपयांचे कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदेसाहेब यांचे शुभहस्ते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस,ना.श्री.अजितदादा पवार,केंद्रीय राज्यमंत्री ना.श्री.प्रतापराव जाधव,आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे,खासदार श्री. नितीनकाका जाधव-पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आ.श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, आ.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,आमदार श्री.मकरंद जाधव-पाटील,आमदार श्री.जयकुमार गोरे, आमदार श्री. दिपक चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) आदी मान्यवरांचे उपस्थितीमध्ये रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वा. दौलतनगर ता.पाटण येथे संपन्न होत आहे. तरी पाटण विधानसभा मतदासंघातील शिवसेना-भाजपा महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तमाम शिवसैनिक,युवा सेना पदाधिकारी,शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व आम जनता यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे. 


मनसेच्या आंदोलनास यश,लेखी आश्‍वासन दिल्याने चौथ्या दिवशी उपोषण मागे.

 


पाटण, दि. 26 : पाटण वासियांच्या जिव्हाळ्याच्या कराड-चिपळूण 166 राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत पाटण ते हेळवाक रस्त्याचे काम रखडल्याने खड्ड्यांमुळे रस्त्याची  झालेली दयनीय अवस्थेविरोधात मनसे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली पाटणमध्ये  ( रामापूर) मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषण अधिकच तीव्र होत असल्याने शासनाने नमते घेतले. या आंदोलनाला अखेर यश आले असून राष्ट्रीय महामार्ग विभाग साताराचे अधिकारी अभियांत मणेर यानी उपोषस्थळी भेट देवून सर्व मागण्याबाबत लेखी आश्‍वासन दिल्याने चौथ्या दिवशी  उपोषण मागे घेन्यात आले. यावेळी गायब तहसीलदार पंडीत पाटील यांच्या हस्ते गोरख नारकर याना सरबत देवून आंदोलनाची सांगता करन्यात आली.
      रखडलेल्या कराड-चिपळूण राज्यमार्ग अंतर्गत पाटण ते हेळवाक रस्त्याच्या रुंदीकरणासाठी, गाशा गुंडाळून पळालेल्या  एल अँड टी कंपनीवर गुन्हा दाखल करावा, रूंदीकरणासाठी तोडलेल्या  झाडांच्या बदलाट तातडीने झाडे लावावीत व निकृष्ठ कामाच्या चौकशीसाठी मनसे तालुकाध्यक्ष  गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष  चंद्रकांत बामने, कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे, संजय सत्रे आदींसह मनसैनिकांनी  दि. 23 पासून पाटण शहरात आमरन उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरीकांनी भेटी देवून आपला पाठींबा जाहीर करत रखडलेल्या कामा विरोधात संताप व्यक्त केला होता. आंदोलनास तहसीलदार अनंत गुरव व उपअभियांत परेदशी मॅडम यांनी भेट देवून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र कंपनीने लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा मनसैनिकांनी घेतला होता.
      मात्र अखेर उपोषणकरट्यांपुढे  शासनाने नमते घेतले. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सातारा येथील अभियंता मनेर यांनी नायब  तहसीलदार पंडीत पाटील यांच्या समवेत चौथ्या  दिवशी उपोषणकर्त्याची   भेट घेत लेखी आश्‍वासन दिले आहे. या लेखी आश्‍वासनात रखडलेल्या 13 कि.मीचे काम  ऑल ग्रेस कंपनी गुडगाव  याना दिले आहे. यासाठी मशिनरी आली असून कार्यरंभ आदेश आपवार  तातडीने काम सुरू करू. कामास विलंब झाल्याने एल. अँड. टी. कंपनीस 10.01 कोटींच्या  दंडाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयास पाठवला आहे. एल. अँड. टी. कंपनीला वृक्ष लागवडीच्या  सूचना दिल्या  असून दोन दिवसात तोडलेल्या  ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाईल. कंपनीला आतापर्यंत  211.69 कोटी रुपयांची रक्कम  अदा केली आहे. नवीन कंत्राटदारास कार्यरंभ  आदेश दिल्यास  तातडीने काम सुरू होईल. याशिवाय रस्त्यावर पडलेले खड्डे भरन्याचे काम तातडीने हाती घेतले आले आहे, असे विविध मुद्दे कंपनीने दिलेल्या  लेखी आश्‍वासनात देण्यात आले आहेत.
     यास्तव  मनसैनिकांच्या मागण्यांबाबत समाधान झाल्याने चौथा दिवशी गुरूवार दि. 26 रोजी मनसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी नायाब  तहसीलदार पंडीत पाटील  यानी गोरख नारकर याना सरबत देवून उपोषणाची सांगता केली. यावेळी मनसेचे समर्थ चव्हाण, राहूल संकपाळ, हणमंत  पवार, रामचंद्र माने, अधिकराव पवार, ंसंतोष देशमुख, अरविंद पवार, सचिन कदम, संभाजी चव्हाण, भाउसाहेब पवार, तानाजी पवार, बळीराम पवार आदी  मनसैनिकांसह सामजिक कार्यकर्ते  नितीन पिसाळ, शंकर मोरे, अनिल भोसले आदी नागरीक उपस्थित होते.
चौकट
अधिकाऱ्यांनी आज लेखी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतले आहे. मात्र या  संपूर्ण कामावर आमचे बारकाईने लक्ष असणार आहे. सदर काम चांगल्या  दर्जाचे झाले पाहिजे. काम व्यवस्थित नसेल तर यापुढे आम्ही आंदोलन, उपोषण करणार नाही. मनसे स्टाईल खळ खट्ट्याक...करणार, असा इशाराही यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष  गोरख नारकर व कोयना विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे  यानी बोलताना अधिकाऱ्यांना दिला आहे.

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

*श्री कुमजाई देवी नवरात्र उत्सव 2024*

दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी नवरात्रोत्सव कार्यक्रम नियोजन मिटींग झाली. यामध्ये सालाबादप्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या नवरात्रोत्सवात खाली नमूद केलेल्याना श्री कुमजाई देवीचा अभिषेक करण्याचा मान मिळाला आहे.
                
1) नवरात्र दिवस पहिला वार गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर 2024  *श्री.विष्णू कृष्णा माने* 

2) नवरात्र दिवस दुसरा वार शुक्रवार दिनांक 04 ऑक्टोबर 2024 *श्री.गोविंद सीताराम माने*

3) नवरात्र दिवस तिसरा वार शनिवार दिनांक 05 ऑक्टोबर 2024 *श्री.रामचंद्र संपत माने*
   
4) नवरात्र दिवस चारवा वार रविवार दिनांक 06 ऑक्टोबर 2024 *श्री.गणेश जयसिंग माने*

5) नवरात्र दिवस पाचवा  वार सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 *श्री.सूरज दिलीप माने*

6) नवरात्र दिवस सहावा वार मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 *श्री.अशोक रामचंद्र माने*

7) नवरात्र दिवस सातवा वार बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 *श्री.सुभाष बाबुराव माने*

8)नवरात्र दिवस आठवा वार गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024  *श्री.प्रवीण प्रकाश माने*

9) नवरात्र दिवस नववा वार शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 *श्री.तुकाराम लक्ष्मण माने*

10) नवरात्र दिवस दुसरा वार शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024  *श्री.भरत कृष्णा माने*


त्याचबरोबर या नवरात्रोत्सवात रोज सायंकाळी सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

*श्री कुमजाई देवी नवरात्र उत्सव 2024*
                *भजनी मंडळ व सौजन्य*
1) दिनांक .03 ऑक्टोबर 2024  वार - गुरुवार 
    *श्री नाईकबा भजनी मंडळ गलमेवाडी*
*सौजन्य - श्री.रामचंद्र तातोबा चाळके* 

2) दिनांक .04 ऑक्टोबर 2024  वार - शुक्रवार
   *श्री ना
मानंद महाराज भजनी मंडळ म्हासोली*
 *सौजन्य- श्री.पवन संपतं माने* 

3) दिनांक .05 ऑक्टोबर 2024  वार - शनिवार
*श्री.संतकृपा भजनी मंडळ साबळेवाडी*
  *सौजन्य- श्री.शंकर ज्ञानदेव माने*

4) दिनांक . 06 ऑक्टोबर 2024  वार - रविवार 
    श्री.सचिन लोहार महाराज भजनी मंडळ शिबेवाडी 
*सौजन्य - श्री.रामचंद्र शिवाजी माने*

5) दिनांक.07 ऑक्टोबर 2024  वार - सोमवार
   *श्री.श्याम स्वामी भजनी मंडळ कुंभारगाव, तळमावले* 
 *सौजन्य- श्री.गणेश जयसिंग माने.*

6) दिनांक 08 ऑक्टोबर 2024  वार - मंगळवार
  *आरेवाडी भजनी मंडळ* 
 *सौजन्य - श्री.अरविंद शिवाजी माने*

7) दिनांक.09 ऑक्टोबर 2024  वार - बुधवार 
   *श्री.जुगाई माता महिला भजनी मंडळ पाटीलवाडी*
*सौजन्य- श्री.अरविंद शिवाजी माने*

8) दिनांक 10 ऑक्टोबर 2024  वार - गुरवार 
    *श्री.बाळासाहेब शिरंबेकर महाराज भजनी मंडळ साळशिरंबे*
 *सौजन्य- अरविंद शिवाजी माने*

9) दिनांक 11 ऑक्टोबर 2024  वार - शुक्रवार 

 *सौजन्य- कु.रुद्र अनिल माने*

10) दिनांक 11 ऑक्टोबर 2024  वार - शुक्रवार  श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती आणि महाप्रसाद.
*महाप्रसाद सौजन्य - *शुभम जितेंद्र केसेकर व व्यंकटेश जितेंद्र केसेकर*
       
10) दिनांक 12 ऑक्टोबर 2024  वार - शनिवार 
 श्री कुमजाईदेवी चे पालखीची मिरवणूक सिमोउल्लंघन।.
            *महाप्रसाद,विद्युत रोषणाई,साउंड सिस्टीम सौजन्य*
1) महाप्रसाद - *शुभम जितेंद्र केसेकर व व्यंकटेश जितेंद्र केसेकर*
2) मंदिर विद्युत रोषणाई - गणेश जयसिंग माने 
3) साऊंड सिस्टीम - पवन संपत माने , प्रवीण प्रकाश माने, दीपक गोविंद माने 
*4) हळदी कुंकू समारंभ - भेटवस्तू साठी कोणी असेल तर संपर्क साधावा*
  टीप. गतसाली कार्यक्रम होऊ शकला नाही त्यामुळे गतसालचे पैसे शिल्लक आहेत त्यांची सविस्तर माहिती आज सायंकाळी आपणांस या ग्रुपमध्ये दिली जाईल याची नोंद घ्यावी.

*सण 2024 देणगीदार नावे*
*ऐच्छिक वर्गणी आहे*
अधिक माहितीसाठी संपर्क - प्रदीप विष्णु माने G P NO.8108253323
          
*श्री कुमजाई देवी नवरात्र उत्सव 2024*      
             *देणगीदार*
1)  *पै. श्री.रोहित नारायण माने - 2121.00*
2)  *श्री.कुणाल नांगरे पाटील - 1111.00*
3)  *श्री.विष्णु कृष्णा माने - 1001.00*
4)  *श्री.सुयोग ज्योतीराम कुसळे 1111.00*
5)  *श्री.रविंद्र आनंदराव माने 1501.00*
6)  *श्री.स्वप्निल नांगरे पाटील. .2001.00*
7)  *श्री दिलीप आनंदा माने 1000.00*
8) *श्री.सुरेश पांडुरंग माने 1001.00*
9) *श्री अतुल महादेव माने 1001.00*
10) *श्री.शंकर ज्ञानदेव माने 1001.00*
11)
12)
13)
14)
15) 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 



मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

उसने दिलेले वीस हजार मागितलेचा राग.कुसुर येथील खुनाचा गुन्हा उघड;

 

 कुसुर येथील खुनाचा गुन्हा उघड; वीस हजार मागितलेचा राग.


 

कराड दि.24 - उधारी दिलेले वीस हजार रुपये परत मागितल्याचा राग मनात धरून कुसुर ता. कराड येथील शिवाजी सावंत यांचा खून झाल्याचे तब्बल 16 दिवसांनी उघडकीस आले आहे. कराड तालुका गुन्हे प्रकटीने शाखा व स्थानिक गुन्हा शाखा साताराने तपास करून त्याच गावातील दिलीप कराळे (वय 52) यास याप्रकरणी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 02/09/2024 रोजी शिवाजी लक्ष्मण सावंत हे कुसुर ता. कराड येथून बेपत्ता झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाणेत दाखल झाली होती. सावंत यांचा शोध सुरु असताना दि.05/09/2024 रोजी कुसुर ता. कराड येथील शेतीचे शिवारात कुजलेले स्थितीत शिवाजी सावंत यांचा मृतदेह मिळुन आला होता, मृतदेह कुजलेला असलेने मयताचे जागेवर शव विच्छेदन करण्यात आले. यावेळी त्याचा मुत्यु हा धारधार शस्त्राने वार केल्याने झाला आहे असा अहवाल आल्यानंतर त्याचे भावाचे फिर्यादी वरुन कराड तालुका पोलीस ठाणेस 590/2024 बी.एन.एस. 103 (1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरच्या गुन्हयाचे स्वरुप हे गंभीर स्वरुपाचे असलेने पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थागुशा सातारा तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील प्रत्येकी दोन तपास पथके बनवण्यात आली. तपास पथकाची बैठक घेवुन त्यांना सुचना देण्यात आल्या. या सुचने प्रमाणे तपास करुन कुसुर गाव तसेच आजु बाजुचा परिसर पिंजुन काढण्यात आला. सलग 16 दिवस पोलीसांचेकडुन अथक प्रयत्न करण्यात आले. तांत्रिक माहीतीच्या आधारे मयताचे संपर्कातील संशिईत सर्व साक्षीदार पडताळण्यात आले मात्र पोलीसांचे हाती काहीही धागेदारे सापडत नव्हते.

दिनांक 22/09/2024 रोजी कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना संशयीत दिलीप कराळे याचे गुन्हा घडल्यानंतरचे वर्तन संशयास्पद असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी सदर गुन्हयातील संशयीत दिलीप लक्ष्मण कराळे यास तपास कामी ताब्यात घेणेत आले. सदर आरोपीकडे तांत्रिक व गोपनिय माहीतीचे आधारे पुन्हा कसुन चौकशी करण्यात आली. त्यावेळी सदर संशयीत आरोपी याने पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांचे समक्ष शिवाजी सावंत यांचा खुन केल्याचे कबुल केले. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता कराळे याने खुनाचे कारण वीस हजार रुपये मागितल्याचा राग मनात धरुन शिवाजी सावंत यांना निर्जन ठिकाणी शिवारात बोलावुन घेऊन धारदार विळयाने गळयावर व पोटावर वार करुन खुन केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी 22 रोजी सायंकाळी उशीरा अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. 30/09/2024 पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीचे आदेश दिले असुन गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे करीत आहेत.

 

जागोजागी खड्डे तरी प्रशासन गाफिल पोकळ आश्वासनांना थारा नाही, लेखी ठोस भूमिका स्पष्ट करा, मनसेची मागणी.

 जागोजागी खड्डे तरी प्रशासन गाफिल
पोकळ आश्वासनांना थारा नाही, लेखी ठोस भूमिका स्पष्ट करा, मनसेची मागणी.


 

पाटण/प्रतिनिधी
          गुहागर विजयपुर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ठ दर्जाचे काम झालेले आहे. पाटण ते संगमनगर धक्का इथून प्रवास करणे म्हणजे मरणयातना भोगणे आहे. जागोजागी पडलेले खड्डे अनेक अपघातांना निमंत्रण देत आहेत. राष्ट्रीय महामार्ग निव्वळ पोकळ आश्वासने देत आहे तर स्थानिक प्रशासन दुसर्याकडे बोट दाखवून गाफिल आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरु करा आणि आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याशिवाय आमरण उपोषण मागे नाही असं मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी सांगितले आहे.
        रस्त्याच्या निकृष्ठ कामाविरोधात विविध मागण्यांसाठी रामापुर पाटण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांचे नेतृत्वाखाली सोमवार दि २३सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाच्या दुसर्या दिवशी ही आपल्या मागण्यांवरती उपोषण कर्ते ठाम आहेत. या उपोषणास मनसेचे चंद्रकात बामणे संजय शिर्के राहूल सपकाळ समर्थ चव्हाण दयानंद नलवडे हणमंत पवार राम माने आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
      पाटण तालुक्यातील मुख्य रहदारी चा महामार्ग गतवर्षापासून निधी मंजूर,काम सुरू होणार रस्ता खड्डे मुक्त होणार अशा अनेक घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्ष रस्त्याची दुर्दशा असताना सारेच मुग गिळून गप्प झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग पोकळ गोष्टी सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत. स्थानिक प्रशासन डोळ्यादेखत सर्व पाहत आहेत. रस्त्याची झालेली दुर्दशा आणि खड्डयाचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. किरकोळ स्वरुपात डागडुजी करणे, खड्डे भरण्याच्या नावाखाली तात्पुरती मलमपट्टी करणे, भूसंपादन च्या नावाखाली दिशाभूल करणे, काम सुरु होणार वारंवार सांगून लोकांना भूलथापा मारणे, वृक्षलागवड करण्यास पोकळ कारणे देणे अशा गोष्टींसाठी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा लढा उभारला आहे.
     उपोषणस्थळी प्रहार संघटना तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विकास हादवे, मतदुरे सोसायटी मा.चेअरमन सूरज पाटणकर, नंदीवाले समाज तालुकाध्यक्ष विकास जाधव, विश्वजित पाटणकर, शंकर मोरे, नाना मोरे, नितीन पिसाळ, सागर माने, अनिल भोसले,महादेव साळुंखे व तालुक्यातील अनेक लोकांनी भेटी दिल्या
.


सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

सैदापूर- विद्यानगरच्या विकासासाठी सदैव तत्पर - पृथ्वीराज चव्हाण गुरुदत्त कॉलनी मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची भूमिपूजन.

 सैदापूर- विद्यानगरच्या विकासासाठी सदैव तत्पर - पृथ्वीराज चव्हाण

गुरुदत्त कॉलनी मधील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाची भूमिपूजन.


 



 कराड, दि. २२ :  सैदापूर विद्यानगरचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे  मूलभूत सोयी सुविधांसाठी  लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्या झपाट्याने पूर्ण होण्यासाठी सैदापूरला नगरपंचायतीशिवाय पर्याय नाही, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

विद्यानगर (सैदापुर) येथील गुरुदत्त कॉलनीत   दहा लाखांच्या आमदार निधीतून होणाऱ्या रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष  ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितेश जाधव, तालुका खादी ग्रामोद्योगचे शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, दत्तात्रेय जाधव,  राजेंद्र जाधव, तानाजी माळी, विवेक जाधव, धनाजी जाधव, सतिश जाधव, वैशाली जाधव,आदित्य काळभोर आदींसह  कॉलनीतील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

 आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , माझ्या राजकारण व समाजकारणात सैदापूरचा मोठा वाटा आहे. माजी सरपंच आनंदराव जाधव आप्पा व विठ्ठलराव जाधव तात्या यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसला साथ दिली. त्यांच्यासह संपूर्ण सैदापूर  चव्हाण कुटुंबीय व काँग्रेसच्या पाठीशी राहिले. त्या माध्यमातून सैदापूरचा विकास करण्याचे भाग्य मला लाभले.  मुख्यमंत्री असतानाही मोठ्या प्रमाणात निधी देता आल्याचे समाधान आहे. गेल्या पाच वर्षातही मागेल त्या ठिकाणी विकास कामांसाठी निधी दिला आहे. यापुढेही सैदापूर  व विद्यानगरसाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल.  शहरालगतचे उपनगर असल्यामुळे सैदापूरला नागरिकरण वाढत आहे त्यामुळे विकासाची भूकही मोठ्या प्रमाणात आहे. ती पूर्ण करायची असेल तर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सैदापूरला ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीची आवश्यकता आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी कॉलनीतील संदीप नामदेव जाधव, संभाजी निकम, सुदामा कुंडले, अशोक निकम, रमेश गायकवाड, नवनाथ शिंदे, प्रताप साळुंखे, पंकज पाटील, सदाशिव पाटील, श्री. भाकरे, श्री. इंगवले, श्री. पवार, श्री. शिंदे, निजाम काझी आदी उपस्थित होते.
नितेश जाधव यांनी स्वागत केले. उदय थोरात यांनी आभार मानले.

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

*काळगाव - डाकेवाडीच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या राजधानीत होणार गौरव*

*डाकेवाडीच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या राजधानीत होणार गौरव*
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) चे सुपुत्र डाॅ.संदीप डाकवे यांचा महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने रविवार दि.29 सप्टेंबर, 2024 रोजी गौरव होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी  विभागाने वरळी च्या एनएससीआय मध्ये कृषी वितरण सोहळा आयोजित केला आहे.
कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. रु. 1 लाख 20 हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. डाॅ.संदीप डाकवे हे गेली 18 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत.
सदर कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य सदस्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पटकावणारे डाॅ.डाकवे हे पाटण तालुक्यातील पहिले आणि सातारा जिल्हयातील पाचवे पत्रकार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून 8 पत्रकारांचा यावेळी सन्मान होणार आहे. कृषी क्षेत्रातील कार्य संघटनात्मक आणि संपूर्ण राज्यांना दिशादर्शक असावे या हेतूने 1994-95 पासून या पुरस्कारांची सुरुवात झाली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी शेतीविषयक वृत्तपत्रातून उत्कृष्ट वार्तांकन, यशोगाथा, कृषिसंदेश यांचे लिखाण केले आहे. तसेच कृषिविषयक लेखमाला, पुस्तक प्रकाशन, निवडक लेखांचे प्रदर्शन, कृषिविषयक व्यंगचित्रे, हस्तलिखिते आदि नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.डाकवे यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा संतोषकुमार बरकडे, कृषि विकास अधिकारी जि.प.सातारा विजय माईनकर, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे, तंत्र अधिकारी (विस्तार) जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा समीर पवार, कृषि सहायक प्रमोद गाढवे, कृषी सहायक ए.बी.पवार व जी.डी.सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


महाराष्ट्र शासनाकडून मिळालेेले पुरस्कार :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
राजमाता जिजाऊ स्वावलंबन सवोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
जि.प. कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार
ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

काळगाव - डाकेवाडीत स्वतःच्या घरातच उभारले वाचनालय.

 डाकेवाडीत स्वतःच्या घरातच उभारले वाचनालय.


 


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील समाजशील व्यक्तिमत्त्व राजाराम विठ्ठल डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त डाकवे परिवाराने स्वतःच्या घरात वाचनालय सुरु केलेे आहे. यातील बरीचशी पुस्तके स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या विविध कार्यक्रम आणि स्पर्धात्मक उपक्रमात जमा झाली होती. त्याचे अनौपचारिक उद्घाटन शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, सेवानिवृत्त पोलीस ऑफीसर संभाजीराव पाटणकर, प्रा.ए.बी.कणसे, देवबा वायचळ, ग्रामीण लेखक ज्ञानदेव मस्कर, शिवम् असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), नितीन पाटील, अक्षय पाटील, आप्पासोा निवडूंगे, जगन्नाथ टेळे, कृष्णा डाकवे, विठ्ठल डाकवे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजावी, सुजाण सुसंस्कृत नागरीक घडावेत असा उदात्त हेतू ठेवून डाकवे परिवाराने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वाचनालयाची उभारणी केली आहे. चाफळ (ता.पाटण) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी त्यांच्याजवळील नामवंत लेखकांची 100 पुस्तके भेट दिली आहेत. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई आणि आ.जयंत पाटील यांनी लेख शुभसंदेश तर साताऱ्याचा चाॅकलेट हिरो आकाश पाटील यांनी व्हिडीओ क्लिप शेअर करत वाचनालयाला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी डाकवे परिवाराने मान्यवरांचे स्वागत पुस्तकाने, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, दिवाळी अंक स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार असे वाचन चळवळीला हातभार लावणारे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे. वाचन चळवळीसाठी अनोखे पाऊल उचलेल्या डाकवे परिवाराच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे.
दरम्यान, पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी राजाराम डाकवे (तात्या) यांच्या प्रतिमेचे दर्शन घेवून आदरांजली वाहिली. तात्यांच्या आकस्मिक निधनाने एक धडपडया, सामाजिक बांधिलकी जपणारे अनमोल रत्न हरपल्याची भावना यावेळी लोकांनी व्यक्त केली. तसेच डाकवे परिवाराने तात्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या सर्व उपक्रमाचे कौतुक करत त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
त्यानंतर सायंकाळी डाकेवाडीतील स्थानिक भजनी मंडळांने अप्रतिम भक्तीमय गीतांचे सादरीकरण केले. सुर्यकांत डाकवे (हार्मोनियम), लक्ष्मण डाकवे (मृदंगमणी), वसंत डाकवे, विणेकरी महादेव डाकवे, चोपदार पांडूरंग जाधव, तुकाराम चव्हाण, नंदा मस्कर, मीना डाकवे, शामराव डाकवे, लक्ष्मण मस्कर, काशिनाथ डाकवे, सुनंदा डाकवे, शंकर डाकवे, कलाबाई डाकवे, आनंदा घाडगे, पांडूरंग डाकवे, तानाजी डाकवे, लक्ष्मण डाकवे, दत्तात्रय डाकवे इ.च्या सहभागाने या भजनाची उंची अधिकच वाढली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, डाकवे, पारुबाई येळवे, सविता निवडूंगे, रत्नाबाई काळे, भरत डाकवे, सुनील मुटल, जिजाबाई मुटल, लक्ष्मी डाकवे, अनुसया डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, स्पंदन डाकवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

: वडिलांच्या आठवणी सदैव जपण्याचा प्रयत्न :
रक्षाविसर्जन ऐवजी वृक्षारोपण, कार्यादिवशी अनाथ मुलांना स्नेहभोजन, मंदिर जीर्णोध्दारासाठी देणगी, समाजप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन, भित्तीचित्र काव्य स्पर्धा, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, तीर्थरुप तात्या, तात्या, तात्यांची स्पंदने ई-बुक इ.पुस्तकांची प्रकाशने, साहित्य पुरस्कार, चित्रकला स्पर्धा, सार्वजनिक वाचनालय इ.उपक्रम राबवत वडीलांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे डाॅ.संदीप डाकवे आणि डाकवे परिवाराने सांगितले.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण : प्रा. सुचिता पाटील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा

 माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण : प्रा. सुचिता पाटील.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा,



कराड : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची व आत्मज्ञानाची जाणीव करून दिली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी निर्भय होतील. विद्यार्थ्यांची श्रम व कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. स्वामी विवेकानंदांना देखील स्वावलंबन अभिप्रेत होते. माणसामध्ये असणा-या पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण होय, असे मत प्रा. सुचिता पाटील यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. (डॉ.) सतीश घाटगे होते, तर पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपुत यांची उपस्थिती होती.  
प्रा. सुचिता पाटील म्हणाल्या, स्वतःचे विचार असणारे, चारित्र्यसंपन्न, नीतिमान विद्यार्थी घडविण्याची आज गरज आहे. मुलाची आई पहिली शिक्षिका असते. औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन प्रकारचे शिक्षण असते. परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षकांना गुरूदेव कार्यकर्ता संबोधले. विद्यार्थ्याच्या मनातील अज्ञान दूर करणारा, संवेदनशील विद्यार्थी घडविणारा शिक्षक त्यांना अपेक्षित होता. माणुसकी जपणारी, स्त्रियांचा सन्मान करणारी पिढी निर्माण करण्याचे आव्हान आज शिक्षकांपुढे असल्याचे त्या म्हणाल्या.
प्रो. (डॉ.) सतीश घाटगे यांनी शिक्षकांनी स्वयंमूल्यमापन करून स्वतःच्या बलस्थानांचा शोध घेण्याचे सांगितले. कोणताही विद्यार्थी मूलतः हुशार किंवा मंद नसतो. त्याच्या आयुष्याला आकार देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. सर्वांनी माणूस म्हणून विद्यार्थ्यांकडे बघण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. विश्वनाथ सुतार तसेच अमृता डवरी व साई कोळी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. उज्ज्वला पाटील यांनी केले, तर प्रा. सुरेश यादव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शीतल गायकवाड यांनी केले. आभार प्रा. विनायक जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
-------------------------------------------------

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

*पाटण तालुक्यात पहिला शेतीमित्र पुरस्कार पटकावणाऱ्या डाॅ.संदीप डाकवेंचा पालकमंत्र्यांकडून सन्मान*

*पाटण तालुक्यात पहिला शेतीमित्र पुरस्कार पटकावणाऱ्या डाॅ.संदीप डाकवेंचा पालकमंत्र्यांकडून सन्मान*

तळमावलेध/वार्ताहर
पाटण तालुक्यात पहिला महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पटकावणारे डाॅ.संदीप डाकवे यांचा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुका कराड रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, डाॅ.दिलीपराव चव्हाण, विजय पवार, पंजाबराव देसाई, मंडळाचे अध्यक्ष अॅड.मिलींद पाटील, सचिव शंकर पाटील, खजिनदार आप्पासाहेब मगरे, कार्याध्यक्ष शंकर देसाई, सदस्य राजेंद्र जाधव, राहुल देसाई, रफिक पटेल, बाळकृष्ण काजारी, प्रा.उत्तमराव माने व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
ना.शंभूराज देसाई यांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे जाहीर कौतुक केले. आणि पाठीवर शाबासकीची थाप मारत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेल्या 'तात्या' पुस्तकाची प्रत ना.देसाई यांना भेट दिली. जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरुप रु. 1 लाख 20 हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पटकावणारे डाॅ.संदीप डाकवे हे पाटण तालुक्यातील पहिले आणि सातारा जिल्हयातील पाचवे पत्रकार आहेत. हा पुरस्कार पटकावत डाॅ.डाकवे यांनी शासन दरबारी पुरस्कार मिळवण्याचा षटकार ठोकला आहे
यापूर्वी पत्रकारितेसाठी डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, जि.प.कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन असे पुरस्कार मिळाले आहेत. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.मिलिंद पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.दीपक तडाखे आणि आभारप्रदर्शन आप्पासाहेब मगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटण तालुका कराड रहिवाशी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...