कुसुर येथील खुनाचा गुन्हा उघड; वीस हजार मागितलेचा राग.
कराड दि.24 - उधारी दिलेले वीस हजार रुपये परत मागितल्याचा राग मनात धरून कुसुर ता. कराड येथील शिवाजी सावंत यांचा खून झाल्याचे तब्बल 16 दिवसांनी उघडकीस आले आहे. कराड तालुका गुन्हे प्रकटीने शाखा व स्थानिक गुन्हा शाखा साताराने तपास करून त्याच गावातील दिलीप कराळे (वय 52) यास याप्रकरणी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 02/09/2024 रोजी शिवाजी लक्ष्मण सावंत हे कुसुर ता. कराड येथून बेपत्ता झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाणेत दाखल झाली होती. सावंत यांचा शोध सुरु असताना दि.05/09/2024 रोजी कुसुर ता. कराड येथील शेतीचे शिवारात कुजलेले स्थितीत शिवाजी सावंत यांचा मृतदेह मिळुन आला होता, मृतदेह कुजलेला असलेने मयताचे जागेवर शव विच्छेदन करण्यात आले. यावेळी त्याचा मुत्यु हा धारधार शस्त्राने वार केल्याने झाला आहे असा अहवाल आल्यानंतर त्याचे भावाचे फिर्यादी वरुन कराड तालुका पोलीस ठाणेस 590/2024 बी.एन.एस. 103 (1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरच्या गुन्हयाचे स्वरुप हे गंभीर स्वरुपाचे असलेने पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थागुशा सातारा तसेच कराड तालुका पोलीस ठाणेकडील प्रत्येकी दोन तपास पथके बनवण्यात आली. तपास पथकाची बैठक घेवुन त्यांना सुचना देण्यात आल्या. या सुचने प्रमाणे तपास करुन कुसुर गाव तसेच आजु बाजुचा परिसर पिंजुन काढण्यात आला. सलग 16 दिवस पोलीसांचेकडुन अथक प्रयत्न करण्यात आले. तांत्रिक माहीतीच्या आधारे मयताचे संपर्कातील संशिईत सर्व साक्षीदार पडताळण्यात आले मात्र पोलीसांचे हाती काहीही धागेदारे सापडत नव्हते.
दिनांक 22/09/2024 रोजी कराड तालुका पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना संशयीत दिलीप कराळे याचे गुन्हा घडल्यानंतरचे वर्तन संशयास्पद असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी सदर गुन्हयातील संशयीत दिलीप लक्ष्मण कराळे यास तपास कामी ताब्यात घेणेत आले. सदर आरोपीकडे तांत्रिक व गोपनिय माहीतीचे आधारे पुन्हा कसुन चौकशी करण्यात आली. त्यावेळी सदर संशयीत आरोपी याने पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांचे समक्ष शिवाजी सावंत यांचा खुन केल्याचे कबुल केले. अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता कराळे याने खुनाचे कारण वीस हजार रुपये मागितल्याचा राग मनात धरुन शिवाजी सावंत यांना निर्जन ठिकाणी शिवारात बोलावुन घेऊन धारदार विळयाने गळयावर व पोटावर वार करुन खुन केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी 22 रोजी सायंकाळी उशीरा अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. 30/09/2024 पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीचे आदेश दिले असुन गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा