मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

जागोजागी खड्डे तरी प्रशासन गाफिल पोकळ आश्वासनांना थारा नाही, लेखी ठोस भूमिका स्पष्ट करा, मनसेची मागणी.

 जागोजागी खड्डे तरी प्रशासन गाफिल
पोकळ आश्वासनांना थारा नाही, लेखी ठोस भूमिका स्पष्ट करा, मनसेची मागणी.


 

पाटण/प्रतिनिधी
          गुहागर विजयपुर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ठ दर्जाचे काम झालेले आहे. पाटण ते संगमनगर धक्का इथून प्रवास करणे म्हणजे मरणयातना भोगणे आहे. जागोजागी पडलेले खड्डे अनेक अपघातांना निमंत्रण देत आहेत. राष्ट्रीय महामार्ग निव्वळ पोकळ आश्वासने देत आहे तर स्थानिक प्रशासन दुसर्याकडे बोट दाखवून गाफिल आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरु करा आणि आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याशिवाय आमरण उपोषण मागे नाही असं मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी सांगितले आहे.
        रस्त्याच्या निकृष्ठ कामाविरोधात विविध मागण्यांसाठी रामापुर पाटण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांचे नेतृत्वाखाली सोमवार दि २३सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाच्या दुसर्या दिवशी ही आपल्या मागण्यांवरती उपोषण कर्ते ठाम आहेत. या उपोषणास मनसेचे चंद्रकात बामणे संजय शिर्के राहूल सपकाळ समर्थ चव्हाण दयानंद नलवडे हणमंत पवार राम माने आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
      पाटण तालुक्यातील मुख्य रहदारी चा महामार्ग गतवर्षापासून निधी मंजूर,काम सुरू होणार रस्ता खड्डे मुक्त होणार अशा अनेक घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्ष रस्त्याची दुर्दशा असताना सारेच मुग गिळून गप्प झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग पोकळ गोष्टी सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत. स्थानिक प्रशासन डोळ्यादेखत सर्व पाहत आहेत. रस्त्याची झालेली दुर्दशा आणि खड्डयाचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. किरकोळ स्वरुपात डागडुजी करणे, खड्डे भरण्याच्या नावाखाली तात्पुरती मलमपट्टी करणे, भूसंपादन च्या नावाखाली दिशाभूल करणे, काम सुरु होणार वारंवार सांगून लोकांना भूलथापा मारणे, वृक्षलागवड करण्यास पोकळ कारणे देणे अशा गोष्टींसाठी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा लढा उभारला आहे.
     उपोषणस्थळी प्रहार संघटना तालुकाध्यक्ष शुभम उबाळे, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विकास हादवे, मतदुरे सोसायटी मा.चेअरमन सूरज पाटणकर, नंदीवाले समाज तालुकाध्यक्ष विकास जाधव, विश्वजित पाटणकर, शंकर मोरे, नाना मोरे, नितीन पिसाळ, सागर माने, अनिल भोसले,महादेव साळुंखे व तालुक्यातील अनेक लोकांनी भेटी दिल्या
.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...