शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

*सांगली : कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – पालकमंत्री जयंत पाटील*


सांगलीदि. कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याला आपल्याला तोंड द्यावे लागेलत्याला पर्याय नाही. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय आजच जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहिम सुरू आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून पुढील काळात रूग्णालयातील बेड्स कमी पडू नयेत असा आपला प्रयत्न असला पाहिजे, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग उच्चस्तराला पोहोचला की तो हळूहळू कमी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कोरोना संसर्ग फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढत जाईल व मार्च महिन्यामध्ये तो ओसरेल. राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे थोडीशी भिती लोकांच्यामध्ये आहे. तरी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप यासारखे कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून त्वरीत कोविड चाचणी करून घ्यावी. त्याचबरोबर ज्यांनी अद्यापही  कोविड लस घेतली नाही, ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे अशांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही केले.

सातारा : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास मेडिकल दुकानांवर कारवाईजिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा इशारा

सातारा : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास मेडिकल दुकानांवर  कारवाई

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा इशारा

 

 सातारा, दि.7  : औषध दुकानदारांनी  नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

कोरोना संसर्गाबाबत मार्गदर्शनाप्रमाणे उपचार असल्यामुळे शेड्युल एच औषधे व स्टेरॉइडस् यांची विक्री नोंदणीकृत डॉक्टराच्या चिठ्ठीवर होणे आवश्यक आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्टेरॉइडस, गर्भपातावरील औषधे ॲन्टीबायोटीक्स आदी औषधे रुग्णांच्या तोंडी मागणीवर विक्री केली जाऊ नयेत यासाठी  औषध दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास अशा औषध दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचेही आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त यांना दिले आहेत.

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

*महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नाही ; कडक निर्बंध लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्णय*


 महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नाही कडक निर्बंध लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्णय 
मुंबई दि.5:राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढती गर्दी आणि रुग्णसंख्या पाहता निर्बंध अधिक कडक करण्याचा विचार राज्यसरकारने केला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली जाणार आहे.

राज्यातील कोरोनाचा आकडा काय?

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.

ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण

राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.


*आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी ( ईडब्ल्यूएस’): ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा* *राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार- मंत्री अशोक चव्हाण यांचे सूतोवाच*

आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी ( ईडब्ल्यूएस’): ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा
राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार- मंत्री अशोक चव्हाण यांचे सूतोवाच
मुंबई, दि. ४ – आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीन धारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही अट शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल, असे सूतोवाच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या अटीचा उल्लेख आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात एकत्रित कुटुंबांची संख्या मोठी असून, अन्य कोणत्याही आरक्षणाचे लाभ मिळत नसलेले बहुतांश शेतकरी कुटूंब केंद्र सरकारच्या या अटीमुळे १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणापासून देखील वंचित राहणार आहेत. या गंभीर विषयासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जमीनधारणेचे प्रमाण जास्त आहे. केवळ या विभागांमध्येच नव्हे तर इतरही विभागांत अविभाजित कुटुंबांमध्ये ५ एकर पेक्षा जास्त शेतजमीन असू शकते. ५ एकर पेक्षा जास्त जमीन असली तरी बहुतांश शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपयांपेक्षा कमीच असते. त्यामुळे मराठा समाजासह इतर अनेक समाजातील शेतकऱ्यांना केंद्राच्या या शिफारसीमुळे मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने कमाल ५ एकर जमीनधारणेच्या अटीवर फेरविचार करावा आणि सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी आमची मागणी असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

*कराड: येथील महिला खुनाचा चार तासात उलगाडा :खून झालेली महिला पाटण तालुक्यातील महिंद गावातील*

कराड येथील महिला खुनाचा चार तासात उलगाडा :पाटण तालुक्यातील महिंद येथील संबंधित महिला 

कराड : येथे एका महिलेचा साेमवारी खून झाला हाेता. संबंधित महिला काेण हाेती हे त्यावेळी घटनास्थळी गेलेल्या पाेलिसांना समजू शकले नव्हते. त्यानंतर पाेलिसांनी अवघ्या चार तासात या खूनाचा छडा लावून एकास अटक  केली आहे. खून झालेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली. त्याच्या आधारे संबंधित महिला ही महिंद (ता. पाटण) येथील असल्याचे समजले आहे . याच चिठ्ठीमुळे संबंधित संशयित आराेपीस पकडण्यात पाेलिसांना यश आले आहे.

पाेलिसांनी अत्यंत हुशारीने संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्ल्याने आता पाेलिसांची समाज माध्यमातून काैतुक केले जात आहे.

दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खून झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळूंखे वय ३० ,रा. महिंद, ता. पाटण असे आहे. तिने लिहिलेल्या चिठ्ठीत एका व्यक्तीचे नाव आहे. त्या व्यक्तीने  मला लग्नाचं आमिष दाखवून आणले, माझ्याशी संबंध ठेवले. माझ्या बराेबर लग्नाचं खोटे आश्वासन दिले पण आत्ता लग्न करत नसून मला मारहाण करुन माझ्याशी संबंध ठेवत होता. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले किंवा मी जीव दिला तर त्यास ताे जबाबदार आहे असा मजूकर हाेता. त्याअनुषंगाने संबंधित व्यक्तीची चाैकशी केली असता. एकाकडून खात्रीशिर माहिती मिळताच संशयित आराेपीला पकडण्यात आले आहे.शरद हणमंत ताटे (वय 30, रा. येरवळे, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे


सोमवार, ३ जानेवारी, २०२२

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘शिवडी न्हावाशेवा सी लिंक’ची पाहणी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘शिवडी न्हावाशेवा सी लिंक’ची पाहणी

शिवडी - न्हावा शेवा सी लिंक वरील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वी उभारणी

प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण सी लिंकचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

मुंबई, दि. ३ – मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली. नगरविकास मंत्री स्पीड बोटीतून या कामाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह खासदार राजन विचारे, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवडी आणि न्हावाशेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून १८ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे ३२ गाळे बसवून हा ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून १८० मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरचे लोंचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.मुंबई-नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी होणारठाणे-रायगड जिल्हे एकमेकांना जोडले जाणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरले पर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

या गाळ्यांच्या लॉचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड  तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करून ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

आज करण्यात आलेल्या ह्या कामामुळे हा पारबंदर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न. *विस्तारीत विश्रामगृह साताराच्या वैभवात भर घालेल*सातारच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटी*वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही

सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न.
 *विस्तारीत विश्रामगृह साताराच्या वैभवात भर घालेल
*सातारच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटी
*वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही
सातारा दि. 3 : सातारा येथील विश्रामगृहाच्या विस्तारीकरणाचे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे भूमीपुजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न  झाले. 
 
यावेळी सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे,  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,  मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्र चव्हाण, अधिक्षक अभियंता सं.गो. मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय दराडे आदी उपस्थित होते.

विस्तारीत विश्रामगृह साताराच्या वैभवात भर घालेल

 यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सातारा येथे 13 कोटी 12 लाख खर्च करुन विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 1 व्हीव्हीआयपी कक्ष, 2 व्हीआयपी कक्ष व 5 साधारण कक्ष बांधण्यात येणार आहेत. तसेच मल्टीपपर्ज हॉल, डायनिंग व किचन याबरोबरच स्वागत कक्ष, प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, स्टोअर रुमची सुविधा असणार आहेत. हे विस्तारीत विश्रामगृह सातारा शहराच्या वैभवात भर घालेल.
 

सातारच्या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी 300 कोटी

 सातारचे सैनिक स्कूल हे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरु झाले आहे. या सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी प्रत्येक वर्षी 100 कोटी या प्रमाणे 300 कोटी देण्यात येणार आहे. येथे कोणत्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्याबाबत पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी कमी पडू देणार नाही

 सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा बांधकाम आराखडा चांगल्या पद्धतीने करावा. महाविद्यालय चांगल्या प्रकारे कसे उभे राहिल यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. तसेच स्थानिकांनीही यासाठी सहकार्य करावे. तसेच महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा संस्थेसाठी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या प्रयोगशाळाच्या उभारणीला 12 कोटी 99 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रयोग शाळेत म्युझियम, व्याख्यान कक्ष, डेमो रुम, विभाग प्रमुखांसाठी कक्ष अशा सुविधा असणार आहेत.

मुंबई : मुंबई बँकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकारी पॅनलचा दणदणीत विजय

मुंबई : मुंबई बँकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकारी पॅनलचा दणदणीत विजय
मुंबई : दि.3 मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकारी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबई बँक निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी २१ जागांवर सहकार पॅनलचा विजय झाला आहे.पूर्वी सहकार पॅनलच्या १७ जागांवर बिनविरोध निवड झाली होती तर ज्या ४ जागांवर निवडणूक लागली होती. त्या जागांवरही सहकार पॅनलचे उमेदवार जिंकले आहेत. प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँकमध्ये घोटाळा केल्याचे आरोप केल्यानंतरही एकहाती वर्चस्व मिळाले आहे. मुंबई बँक निवडणुकीत ज्या ४ जागांवर मतदान झाले होते त्याची आज मतमोजणी पार पडली आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा विजय झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या ४ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलमधील विठ्ठलराव भोसले यांचा विजय झाला आहे. तर प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघातून पुरुषोत्तम दळवी, महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ आणि राखीव मतदार संघातून अनिल गजरे यांचा विजय झाला आहे. अशा प्रकारे २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील सहकारी पॅनलमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील उमेदवारांचा समावेश होता. परंतु शिवसेनेच्या बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे ४ जागांवर निवडणूक लागली होती. मुंबई बँकेतील अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवेसनेकडून अधिकृत उमेदवार होते तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी केली असून त्यांचा पराभवही झाला आहे. शिवेसनेचे बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

*कराड : पृथ्वीराज चव्हाण हे जनतेच्या मनातील भगीरथ - चेतना सिन्हा* *कराड दक्षिण काँग्रेस कमिटी व सत्यजित पतसंस्था च्या वतीने महिला मेळावा संपन्न*

 *कराड : पृथ्वीराज चव्हाण हे जनतेच्या मनातील भगीरथ - चेतना सिन्हा* 

कराड दक्षिण काँग्रेस कमिटी व सत्यजित पतसंस्था च्या वतीने महिला मेळावा संपन्न 
 *कराड :* माण तालुका अत्यंत दुष्काळग्रस्त भाग या भागात पाणी येईल असे कधी कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. या भूमीत माणगंगा नदी असूनही कायम कोरडी असणारी नदी प्रवाहित करण्याचे काम त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यामुळेच पृथ्वीराज चव्हाण हे आम्हा जनतेच्या मनातील "भगीरथ" च आहेत असे गौरवोद्गार माणदेशी उद्योग समूहाच्या संस्थापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांनी आज काढले, त्या कराड येथे सत्यजित पतसंस्था व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होत्या. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे,  उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रसिद्ध व्याख्याता राणी पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, जि प सदस्या मंगला गलांडे, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, अर्चना पाटील, मीनाक्षी मारुलकर, उत्तमराव पाटील, विद्या मोरे, बानुबी सय्यद, राजेंद्र यादव (आबा), आदींसह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. 

 *यापुढे सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा म्हणाल्या कि,* प्रत्येक दुष्काळात माण तालुक्यात चारा छावण्या उघडल्या जातच होत्या या चारा छावण्यांना फक्त भेट देणे आणि दुष्काळग्रस्तांच्या भावना समजून घेणे फार वेगळी गोष्ट आहे. दुष्काळग्रस्तांच्या भावना तेच समजून घेऊ शकतात जो मनातून शेतकरी आहे यामुळेच त्यावेळी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांची मने जाणून घेतली व पूर्ण दुष्काळ छावण्यांची पाहणी केली आणि त्यावर उपाय सुचवून निधी सुद्धा उपलब्ध केला. अत्यंत संवेदनशील मन असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी माणगंगा नदी प्रवाहित केली यासाठी त्यांनी त्या भागात उभारलेले साखळी बंधारे आजहि कार्यान्वित आहेत. तसेच त्या पुढे म्हणाल्या कि, महिलांचे सक्षमीकरण हेच माणदेशी फाउंडेशन चा उद्देश असल्याने त्यानुसारच संस्था कार्यरत आहे. आजच्या युगात महिलांना डिजिटल ज्ञान मिळण्यासाठी जवळपास १ लाख ग्रामीण भागातील महिलांना संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
 *याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* माणदेशी फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणाचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले त्यानंतर २००१ साली स्व विलासराव देशमुख यांनी दुसरे महिला धोरण मांडले व त्यानंतर तिसरे महिला धोरण २०१४ साली मी मुख्यमंत्री असताना मांडण्यात आले. या धोरणांमुळे उद्दिष्टे जरी मांडली जात असली तरी त्याचे ग्रामपंचायत पर्यंत अंमलबजावणी होते का ? तसेच आज खरंच महिलांना समानतेची वागणूक दिली जात आहे का? घरातील सर्व कामे न चुकता करणारी गृहिणी तिच्या कामाचे मूल्य तिला कधी मिळणार आहे का ? असे अनेक प्रश्न महिला सबलीकरणात येतात.महिलांना ५०% आरक्षण जरी दिले गेले असले तरी ते अधिकार नक्की काय आहेत ते प्रशिक्षण महिलांना दिल्याशिवाय समजणार नाही. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. १८ व्या शतकात स्त्री शिक्षणाची बीज पेरणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिला सक्षमीकरणाकडे पहिले पाऊल होते. 

या कार्यक्रमाचे आभार कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी मानले. 
------------------------------------------------

तळमावले : जनसहकार निधीच्या दिनदर्शिकेचे खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन


तळमावले : जनसहकार निधीच्या दिनदर्शिकेचे खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

जनसहकार निधी लिमिटेड तळमावलेच्या २०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन खा.श्रीनिवास पाटील आणि श्री.सारंग पाटील(बाबा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जनसहकार निधी लिमिटेडच्या चढत्या आलेखाबद्दल कौतुगोद्गार काढले.

यावेळी जनसहकार उद्योग समूहचे विद्यमान चेअरमन श्री.मारुतीराव मोळावडे,श्री.विनायक शिनारे (मँक्विन मिडिया,पुणे )श्री.सुतार साहेब,श्री.राजू जाधव(संचालक-जनसहकार लिमिटेड) श्री.संदीप पाटील(सरपंच-ग्रामपंचायत पोतले)उद्योजक गणेश उचाळे, शरद वडणे व मित्र परिवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.श्रीनिवास पाटील यांनी दिनदर्शिकेचे जीवनातील महत्व विषद केले आणि सुंदर अशी दिनदर्शिका काढल्याबद्दल जनसहकार निधीचे कौतुक केले.चेअरमन श्री.मारुतीराव मोळावडे, यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची यावेळी माहिती दिली.

तळमावले :नवभारत पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी श्री.सौरभ देसाई यांची व्हा.चेअरमन पदी श्री.महेश ताईगडे यांची निवड

तळमावले :नवभारत पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध 
चेअरमनपदी श्री.सौरभ देसाई यांची व्हा.चेअरमन पदी श्री.महेश ताईगडे यांची निवड
तळमावले दि. २ नवभारत नागरी पतसंस्था मर्या.तळमावले संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली .संस्थेची बिनविरोध निवडणूकीची पंरपरा कायम ठेवत कटुता व सत्ता संघर्ष टाळून परस्पर सहकार्याचा सदस्यांनी परिचय दिला .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गणेश देशमुख यांनी काम पाहिले.नुतन संचालक मंडळ सन २०२१ - २२ ते सन २०२६ - २७ पर्यंत काम पाहणार आहे
 नवभारत पतसंस्था मुख्य कार्यालय तळमावले या ठिकाणी ही बिनविरोध निवडणूक पार पडली.
यावेळी मा श्री. प्रकाश जाधव साहेब तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण,अर्थ व क्रीडा सभापती मा. श्री. संजय देसाई साहेब, मा. श्री.नायर साहेब व्यवस्थापक अमोल माने उपस्थित होते. 
या निवडीमध्ये मा सौरभ देसाई यांची चेअरमनपदी व मा श्री महेश ताईगडे यांची व्हा.चेअरमन पदी निवड झाली.यावेळी नुतन संचालकांचा  निवडणूक निर्णय अधिकारी व संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ ,बुके देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कारास उत्तर देताना नूतन चेअरमन सौरभ देसाई म्हणाले की सर्व संचालकांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य केले सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पतसंस्थेच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील पतसंस्था नेहमीच कर्मचाऱ्यांच्या अविरत सेवेत कार्यरत आहे आदर्श कारभार करून नवनवीन योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगितले
 नूतन व्हा चेअरमन महेश ताईगडे म्हणाले की आमची पतसंस्था खऱ्या अर्थाने जनसामान्यांची कामधेनू आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी मोठी मदत झाली आहे आम्ही सर्व संचालक एकत्रितरीत्या चांगले काम करून दाखवू संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करु असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सचिन पुजारी सर यांनी केले व आभार मा श्री रमेश बावडेकर यांनी केले कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, शाखा प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. 

रविवार, २ जानेवारी, २०२२

वाझोलीत बिबट्याची दहशत शेळी व दोन पिल्ले केली ठार

 वाझोलीत बिबट्याची दहशत शेळी व दोन पिल्ले केली ठार
काळगाव ता.पाटण विभागातील वाझोली गावच्या परिसरात बिबट्याने शेळी व त्याची दोन पिल्ले याना  ठार केले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वाझोली गावच्या परिसरात आज दि 2 रोजी सुमारे 12 च्या आसपास  तानाजी लक्ष्मण  मोरे हे जनावरांना राणामध्ये घेऊन गेले असता अचानक  बिबट्याने  हल्ला केला. या हल्ल्यात शेळी व दोन पिल्ले  ठार झाली. तानाजी मोरे  यांनी यांनी आरडाओरडा करताच तेथे लोकांची गर्दी झाली.
घटनास्थळी वनक्षेत्रपाल  श्री पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत , वनरक्षक जयवंत बेंद्रे , मुबारक मुल्ला व  भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने  तातडीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गेल्या सहामहिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिट्याचा वावर असून प्रशासनाने योग्य ती कारवाही करावी,गावातील शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतामध्ये पिकाची अन्य जनावरांच्या कडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत पण या घटने नंतर  गावातील शेतकरी वर्ग हा भीतीच्या दडपणाखाली गेला असून वनविभागाने ठोस पर्याय काढून बिबट्यांचा व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा.   
श्री अशोक मोरे -मा. सरपंच व विद्यमान             सदस्य ग्रामपंचायत वाझोली

*कराड : शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण*

 *कराड : शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण* 
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास भेट दिली. 

 *कराड:* माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली व या प्रकल्पाची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली. यावेळी स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला तसेच या सर्वांशी आ. चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, आमिर कटापुरे, झाकीर पठाण, भास्कर देवकर, विजय मुठेकर, अशोकराव पाटील आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

 *यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* शहरासाठी कचरा व्यवस्थापन हि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, शहरासाठी स्वच्छ २४ तास पिण्याचे पाणी, यासह सांडपाणी नदीला न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयुक्त असा वापर करणे महत्वाचे आहे. शहराच्या महत्वाच्या बाबीसाठी याआधी सुद्धा मोठा निधी आणला होता आता सुद्धा आणला जाईल. 

कचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक यांत्रिकी पद्धतीने होण्यासाठी तसेच शहरातील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

------------------------------------------------

*एकनाथ गायकवाड फाऊंडेशन च्या माध्यमातून घोगाव गावाला मिळणार पिण्यासाठी शुध्द पाणी*

*एकनाथ  गायकवाड  फाऊंडेशन  च्या माध्यमातून  घोगाव गावाला  मिळणार  पिण्यासाठी शुध्द पाणी* 
कराड प्रतिनिधी : महाराष्ट् राज्याच्या  शालेय शिक्षणमंञी ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या आशिँवादाने व  घोगाव गावचे सुपुञ भिमराव धुळप (पञकार) यांच्या  विशेष प्रयत्नातून जल शुध्ददीकरण मशीन  कामाचा शुभारंभ लोकनेते स्वर्गीय एकनाथ गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी १ जानेवारीला मौजे घोगाव श्री बाळसिद्ध मंदिर येते संपन्न  झाला.एकनाथ गायकवाड  फाऊंडेशन  यांच्या सौजन्याने  या  लोकांच्या  आरोग्याच्या दृष्टीने  गरजेच्या असणाऱ्या या  कामासाठी 2 लाख 85 हजार रुपये निधी  उपलब्ध झाला यामुळे गावातील नागरिकांना   शुध्द  पिण्याचे पाणी मिळणार आहे. लोकांनी  समाधान व्यक्त  केले.यावेळी स्वर्गीय गायकवाड यांच्या घोगाव गावी भेटी दिल्याच्या आठवणी काढण्यात आल्या. व वर्षाताई सुद्धा वडिलांचा वारसा जयंतीदिनी पाण्याच्या पुण्याच्या कामाने कार्यरत केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचेही आभार मानले.  यावेळी  कार्यक्रमासाठी   कराड दक्षिण  काॕग्रेस चे प्रवक्ते  पै.तानाजी चवरे (आप्पा) पं,सं.सदस्य ,काशिनाथ कारंडे  घोगाव गावच्या सरपंच सौ.सीमा पाटील,उपसरपंच निवास शेवाळे,आणि सदस्य,पोलिस पाटील शिवाजी पाटील, समाजसेवक एकनाथ तांबवेकर, संजय भावके,नानासो भावके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक.ग्रामसेवक शिवाजी जाधव यांनी केले तर आभार नानासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले.

शनिवार, १ जानेवारी, २०२२

कराड : येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलासा भूसंपादन मोबदल्यापोटी 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी वर्ग खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना दिलासा भूसंपादन मोबदल्यापोटी 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी वर्ग खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश
कराड : प्रतिनिधी 
    खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
    कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथे जलसंधारण विभागाकडून सुमारे 38 हेक्टर हद्दीत जमिन भूसंपादन करून बंधारा बांधला आहे. यासाठी स्थानिक शेतक-यांची जमिन संपादित करण्यात आली असून भूसंपादित शेतक-यांसाठी निधीही मंजूर करण्यात आले असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. सन 2010 ला सुरूवात झालेला हा प्रकल्प 2014 साली ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे. मात्र संबंधित भूसंपादित शेतक-यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी होती. यासंदर्भात संबंधित शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन हा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. 
    या मागणीची तात्काळ दखल घेत खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि महाराष्ट्र जलसंधारण विभागाचे कार्यकारी संचालक सुनिल कुशिरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून शेतक-यांना हा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली होती. तर खा.श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येळगावचे सरंपच मन्सुर इनामदार, गोटेवाडीचे सरपंच डाॅ.विलासराव आमले, येळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन साळुंखे, पत्रकार बाळकृष्ण कुंभार, सुरेश पाटील व सर्जेराव शेवाळे यांनी सुनिल कुशिरे यांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान मोबदल्यापोटी निधी संदर्भात व तलावाच्या अनुशंगाने अन्य प्रलंबित समस्या बाबत निवेदन देण्यात आले होते. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून सदर शेतक-यांना मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजार 661 रूपयाचा धनादेश मंजूर झाल्याचे सुनिल कुशिरे यांनी खा.पाटील यांच्या कार्यालयास कळविले आहे. हा निधी वर्ग झाल्याने येळगाव व गोटेवाडी बंधा-यांच्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल संबंधित शेतक-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत.

तळमावले :मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन

तळमावले :मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या दिनदर्शिकीचे प्रकाशन

तळमावले दि.1 सरत्या वर्षाला निरोप देत आता २०२२ या नव्या वर्षासाठी सारं जग सज्ज झालं आहे.  कोरोनाच्या  संकटामुळे गेली दोन वर्ष  फारच वेगळ्या पद्धतीने सगळ्यांनाच जगावं लागलं. त्यामुळे आता २०२२ च्या पहिल्या दिवशी  या नव्या वर्षात हे संकट दूर होऊन नव्या वर्षाच्या आगमनाची सुरुवात चांगली व्हावी या पार्श्वभूमीवर   तळमावले  येथील मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगर शेती संस्थेच्या माध्यमातून नवीन वर्षावर दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.   

           या वेळी संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे साहेब चेअरमन ज्ञानदेव जाधव ,व्हा.चेअरमन सर्जेराव नलवडे,,संचालक डॉ चंद्रकांत बोत्रे,प्रकाश देसाई, प्रकाश करपे,गणेश कोळेकर,अनिल माने,सुरेश देसाई,बाबासो तडाखे,लक्ष्मण मत्रे,अंजना सुर्वे,रामचंद्र कदम,ओंकार शिंदे,संस्थेचे  व्यवस्थापक दिलीप गुंझाळकर,उपव्यवस्थापक शरद शिंदे व आदी सेवक वर्ग उपस्थित होते.

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणानिर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबईतील ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

निर्णय तात्काळ अंमलात आणण्याच्या प्रशासनाला सूचना

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

कुठरे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कुठरे : श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

कुठरे ता.पाटण दिनांक ३० रोजी पवारवाडी कुठरे  येथे श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने येणाऱ्या नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
  पवारवाडी गावातील सर्व महिला,सौभाग्यवती यांच्या हस्ते प्रकाशन करून आम्ही एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवार घराण्याची महती, माहिती आणि व्याप्ती समस्त जनसमुदायास सांगण्याचं काम श्रीमंत राजे पवार घराण्याचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. अविनाश पवार यांनी केले.
       यावेळी बोलताना म्हणाले की या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आम्ही महिलांना जो मान सन्मान दिला त्यामुळे समस्त महिलावर्ग आनंदी होता. फक्त सामाजिक कार्यक्रमातच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांना मान सन्मान देऊन त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान नेहमी आग्रही असेल अशी ग्वाही दिली.
यावेळी संदिप पवार व ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाटिल  उपस्थीत होते. 
     या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल समस्त पवार परिवाराचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

तळमावले: मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
तळमावले : मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह. क्रेडिट संस्था मर्या;तळमावले संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊन पाटणचे सहाय्यक निबंधक  मा.श्री.संभाजीराव नलवडे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक मा.श्री.अनिल निवृत्ती शिंदे(साहेब)यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन पदी मा.श्री.ज्ञानदेव श्रीपती जाधव व व्हा.चेअरमन पदी मा.श्री.सर्जेराव शंकर नलवडे यांची निवड करण्यात आली.
       नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये मा.श्री.शिवराम बापूराव पवार(मामा),मा.श्री.डॉ.चंद्रकांत केशव बोत्रे,मा.श्री.अनिल रामचंद्र माने,मा.श्री.प्रकाश शामराव देसाई,मा.श्री.सुरेश बाबुराव देसाई, मा.श्री.राजेश शंकर करपे,मा.श्री.शिवाजी भाऊसो देसाई,मा.श्री.जितेंद्र जगन्नाथ कोळेकर,मा.श्री.लक्ष्मण मारुती मत्रे,मा.श्री.सचिन अधिकराव तडाखे,मा.श्री.बाबासो बाबुराव जाधव,सौ.सुजाता रामचंद्र मोरे,सौ.कल्पना शांताराम जाधव यांचा समावेश करण्यात आला.
        नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सहाय्यक निबंधक मा.श्री.संभाजीराव नलवडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.नलवडे साहेबांनी सर्व संचालकांना शुभेच्छा दिल्या.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...