काळगाव ता.पाटण विभागातील वाझोली गावच्या परिसरात बिबट्याने शेळी व त्याची दोन पिल्ले याना ठार केले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वाझोली गावच्या परिसरात आज दि 2 रोजी सुमारे 12 च्या आसपास तानाजी लक्ष्मण मोरे हे जनावरांना राणामध्ये घेऊन गेले असता अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळी व दोन पिल्ले ठार झाली. तानाजी मोरे यांनी यांनी आरडाओरडा करताच तेथे लोकांची गर्दी झाली.
घटनास्थळी वनक्षेत्रपाल श्री पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुभाष राऊत , वनरक्षक जयवंत बेंद्रे , मुबारक मुल्ला व भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गेल्या सहामहिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिट्याचा वावर असून प्रशासनाने योग्य ती कारवाही करावी,गावातील शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतामध्ये पिकाची अन्य जनावरांच्या कडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत पण या घटने नंतर गावातील शेतकरी वर्ग हा भीतीच्या दडपणाखाली गेला असून वनविभागाने ठोस पर्याय काढून बिबट्यांचा व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा.
श्री अशोक मोरे -मा. सरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाझोली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा