सोमवार, ३ जानेवारी, २०२२

तळमावले :नवभारत पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी श्री.सौरभ देसाई यांची व्हा.चेअरमन पदी श्री.महेश ताईगडे यांची निवड

तळमावले :नवभारत पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध 
चेअरमनपदी श्री.सौरभ देसाई यांची व्हा.चेअरमन पदी श्री.महेश ताईगडे यांची निवड
तळमावले दि. २ नवभारत नागरी पतसंस्था मर्या.तळमावले संस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली .संस्थेची बिनविरोध निवडणूकीची पंरपरा कायम ठेवत कटुता व सत्ता संघर्ष टाळून परस्पर सहकार्याचा सदस्यांनी परिचय दिला .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गणेश देशमुख यांनी काम पाहिले.नुतन संचालक मंडळ सन २०२१ - २२ ते सन २०२६ - २७ पर्यंत काम पाहणार आहे
 नवभारत पतसंस्था मुख्य कार्यालय तळमावले या ठिकाणी ही बिनविरोध निवडणूक पार पडली.
यावेळी मा श्री. प्रकाश जाधव साहेब तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण,अर्थ व क्रीडा सभापती मा. श्री. संजय देसाई साहेब, मा. श्री.नायर साहेब व्यवस्थापक अमोल माने उपस्थित होते. 
या निवडीमध्ये मा सौरभ देसाई यांची चेअरमनपदी व मा श्री महेश ताईगडे यांची व्हा.चेअरमन पदी निवड झाली.यावेळी नुतन संचालकांचा  निवडणूक निर्णय अधिकारी व संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ ,बुके देऊन सत्कार करण्यात आला व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कारास उत्तर देताना नूतन चेअरमन सौरभ देसाई म्हणाले की सर्व संचालकांनी विश्वास दाखवून बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य केले सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून पतसंस्थेच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील पतसंस्था नेहमीच कर्मचाऱ्यांच्या अविरत सेवेत कार्यरत आहे आदर्श कारभार करून नवनवीन योजना राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगितले
 नूतन व्हा चेअरमन महेश ताईगडे म्हणाले की आमची पतसंस्था खऱ्या अर्थाने जनसामान्यांची कामधेनू आहे या पतसंस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी मोठी मदत झाली आहे आम्ही सर्व संचालक एकत्रितरीत्या चांगले काम करून दाखवू संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करु असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सचिन पुजारी सर यांनी केले व आभार मा श्री रमेश बावडेकर यांनी केले कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, शाखा प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...