तळमावले : 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस एड्स निर्मुलनासाठी जगभर केल्या जाणाऱ्या एकत्रित प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी आणि एच आय व्ही विषाणू संसर्गामुळे प्रतिकार शक्तीवर आघात झाल्याने निर्माण झालेल्या एड्स या जीवघेण्या आजाराशी सामना करणाऱ्या अनेक नागरिकांना पाठींबा दर्शवण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. या विषाणूला नष्ट करणारं औषध किंवा एड्स प्रतिबंधक लस तयार करण्यात अद्याप शास्त्रज्ञांना यश आलेलं नाही. मात्र, एड्सशी दोन हात करण्याच्या अनेक प्रभावी उपचार पद्धतींचा विकास आणि एड्सग्रस्त बांधवांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या विशेष कायद्यांमुळे एच आय व्ही बाधित आणि एड्सग्रस्त नागरिकांचं जीवन सुकर झालं आहे. 'विषमता नष्ट करा, एड्सला रोखा, साथरोगांना आळा घाला', हे यंदाच्या एड्स दिनाचं घोषवाक्य आहे.
यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की एच. आय. व्ही. हा विषाणू धोकादायक आहे. यापासूनच एड्स रोगाची वाढ जगभरात झालेली आहे. इतर रोगाप्रमाणे हाही एक रोग असून त्यामुळे मानसिक सामाजिक समस्या निर्माण झाल्या.हा रोग होऊ नये याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे. शरीराला पोखरून टाकणारा हा रोग आज औषधोपचार व समुपदेशनाने बरा होऊ शकतो. एड्स बाबतचे प्रबोधन समाजातील आपण सर्वांनी करणे काळाची गरज आहे असल्याचे मत डॉ. प्रेमला कांबळे (वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय ढेबेवाडी ता पाटण )यांनी व्यक्त केले
ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्राचार्य डॉ.अरुण गाडे (के.सी.कॉलेज,
तळमावले ता पाटण यावेळी प्रमुख उपस्थित मा लता पाटील (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) मा कल्पना डुबल (स्टाफ नर्स ) या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी, रा.से.यो.विभाग) तर सुत्रसंचालन - प्रा सचिन पुजारी सर - सदस्य,ज्यु.रा.से.यो. यांनी केले
आणि आभार प्रा श्रीमती डॉ उषादेवी साळुंखे ( प्रमुख ,तक्रार निवारण समिती) यांनी मानले तसेच या कार्यक्रमास सिनियर विभागातील गुरूदेव कार्यकर्ते व विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा