आंबवडे येथे शेतात बिबट्याने बकरीचा पाडला फडशा
ग्रामस्थांमध्ये बिबट्याची निर्माण झाली भीती तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी
ढेबेवाडी /प्रतिनिधी :दीपक सुर्वे
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात नेहमीच बिबट्याचे दर्शन होत असून काल गुरुवारी दि 2 डिसेंबर दुपारी 3 वा. सुमारास रामचंद्र लक्ष्मन सुर्वे यांच्या मालकीच्या बकरीवर बिबट्याने हल्ला करत बकरीचा फडशा पाडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आंबवडे खुर्द येथील शेतकरी रामचंद्र लक्ष्मन सुर्वे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या घेऊन जवळच असलेल्या चिवटाचा माळ नावाच्या रानात चरण्यासाठी घेऊन गेले असता काल दुपारी अचानक बिबट्याने त्याच्या बकरीवर झडप घालून बकरीला घेऊन बिबट्या पशार झाला त्यावेळी त्यांनी बिबट्या बकरीला घेऊन गेलेल्या दिशेला शोध घेतला असता त्यांना काही सापडले नाही त्यावर त्यांनी आज सकाळी पुन्हा डोगरात जाऊन शोध घेतला असता अर्धवट खाल्लेली बकरी त्यांना सापडली याबाबत त्यांनी वन विभागाला माहिती दिली असून पंचनामा करण्याचे काम बाकी होते सदर घटनेने ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीती निर्माण झाली आहे यावर उपाय म्हणजे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी आंबवडे खुर्द येथील शेतकऱ्यांनी केली आहे .
आंबवडे परिसरामध्ये अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर आहे येथे ग्रामस्थ शेतामध्ये काम करतात शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठा असल्यामुळे शेतातील कामे हे नेहमीच सुरू असतात यामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेळीवर ही याठिकाणी बिबट्याने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान झाली असून वन विभागाने त्वरित दखल घेत परिसरामध्ये पिंजऱ्याची व्यवस्था करावी आणि बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आंबवडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा