तळमावले/वार्ताहर
डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘स्नेहबंध’ पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची प्रथम भेट झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध उपक्रमाचे सुमारे 200 हून अधिक फोटो या पुस्तकात आहेत. ना.देसाई यांनी वेळोवेळी डाकवे यांच्या कलेला जाहीर व्यासपीठ मिळवून दिले आहे. तसेच विविध उपक्रमांना उपस्थित राहून प्रोत्साहन दिले आहे. अशा अनेक उपक्रमांच्या फोटोमय आठवणी पुस्तकाच्या रुपाने प्रसिध्द व्हाव्यात अषी संकल्पना मनामध्ये आली. यातून हे अनोखे फोटोग्राफी बुक साकारले आहे. अशी माहिती डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.
अक्षरगणेशा, ठिपकाचित्रे, रेखाचित्रे, हस्तलिखित, रांगोळी-कात्रण प्रदर्शन उद्घाटन, इ. ची माहिती या पुस्तकात आहे. सुसंगत फोटो, स्थळ दिनांकासह थोडक्यात व योग्य माहिती असल्याने पुस्तकाने वेगळी उंची गाठली आहे. याशिवाय गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी वेळोवेळी पाठवलेली पत्रे, प्रिंट व इलेक्ट्राॅनिक मिडीयाने दिलेली योग्य प्रसिध्दी इ.चा यात समावेश आहे. गतवर्शी ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त 54 चित्रे साकारली होती. त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे.
डाॅ.डाकवे यांचे हे पाचवे पुस्तक आहे. तर अजून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहे. स्पदंन प्रकाशनाने हे आगळेवेगळे पुस्तक तयार करुन पुस्तक निर्मितीत आपली छाप उमटवली आहे. हे अनोखे पुस्तक लोकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा