सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला नागरिकांनी घाबरु नयेशासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे: पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला नागरिकांनी घाबरु नये
शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे:  पालकमंत्री बाळासाहेब पाटील
 
  सातारा दि. 6  : जिल्ह्यात कोरोनांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला घाबरुन न जाता नागरिकांनी  कोरोना संदर्भात शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

 जिल्हाधिकारी यांच्या दालनात  जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

 पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती केंद्र शासन राज्य शासनाला देत आहे. परंतु आपल्या घराशेजारी नागरिक परदेशातून आला असले तर त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी.  कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहता सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...