शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

पाटण : एल अँड टी आणि बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमरण उपोषण मागे

पाटण : एल अँड टी कंपनी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमरण उपोषण मागे
पाटण/ प्रतिनिधी 
कराड -चिपळूण महामार्गाच्या निकृष्ट कामा बाबत एल अँड टी कंपनी सह बांधकाम विभागाच्या बेजबाबदार अधिका-यांच्या वर कारवाई बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांच्या नेतृत्वाखाली पाटण तहसिलदार कार्यालयासमोर दिनांक 15 रोजी पासून सुरू असलेल्या बेमुदत अमरण उपोषणाला अखेर यश आले असून कंपनीने मनसैनिकांनी केलेल्या उपोषणाच्या हत्यारापुढे  नमते घेतले आहे . 
याबाबत उपोषणाच्या चौथ्या दिवशी गुरूवारी रात्री एल अँड टी कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाटण प्रशासनाशी चर्चा करून उपोषण स्थळी येऊन मनसेने उपस्थित केलेल्या मुद्यांवर बांधिल राहून नारकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 
यावेळी प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार योगेश्वर टोंपे, पोलिस निरीक्षक निंगराज चौखंडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देशपांडे ,तांगडे, श्रोती नाईक, तसेच एल अँड टी कंपनीचे अधिकारी भोईटे यांसह मनसैनिक यांच्या उपस्थितीत नारकर यांनी 4 थ्या दिवशी पाणी पिऊन उपोषण सोडले. 

याबाबत मनसेने   सबंधित रस्त्याच्या झालेल्या कामाबाबत पंधरा मुद्दे लेखी स्वरूपात कंपनी देणार असून मंगळवारी मनसैनिकांच्या सोईने कंपनी संबंधित रस्त्याची पाहणी तारीख देण्यात येईल, तसेच कंपनी काम करण्यास बांधिल रहिल असे आश्वासन उपस्थित अधिकार्‍यांनी यावेळी दिले. 

दरम्यान तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी दिनांक 15 रोजी पासून सुरू केलेल्या या उपोषणास मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड विकास पवार, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजीतसिंह पाटणकर, सभापती राजाभाऊ शेलार, विक्रमबाबा पाटणकर, सागर माने, राजाभाऊ काळे, रिपाइंचे प्राणलाल माने यांच्या सह विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाठींबा दर्शविला. 
दरम्यान या उपोषणास सहकार्य करणाऱ्या 
 प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, आणि कर्मचारी वर्ग,पत्रकार यासह पाठींबा देणार्‍या विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर व सर्व मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी आभार मानले.
          यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय सत्रे, अंकुश कापसे, राहूल संकपाळ, दयानंद नलावडे, हणमंत पवार, चंद्रकांत बामणे, अधिक पाटील, संपत जाधव, संभाजी चव्हाण, रामचंद्र, माने,जितेंद्र कवर, समर्थ चव्हाण, दीपक मुळगावकर, विशाल म्हासुर्णेकर, अमोल पवार, नवनाथ पवार, अविनाश पवार, शंकर पवार, आकाश पवार, राज मोरे आणि मनसैनिक उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस...