*महागाई विरोधात काँग्रेस गावागावात करणार जनजागृती*
- उद्या कराड शहरात काँग्रेस पक्षाची महागाई विरोधात जनजागृती रॅली
- उद्या सकाळी 10:30 वाजता कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून रॅलीला होणार सुरुवात
*कराड :* माजी पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई विरोधात जनजागरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर, सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, सहप्रभारी निखिल कवीश्वर, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंडानाना जगताप, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विद्याताई थोरवडे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नितीन थोरात, नरेंद्र पाटील, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक इंद्रजीत गुजर, सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण, हेमंत जाधव आदिसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
केंद्रातील भाजप सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उध्वस्त केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सूचनेनुसार 14 नोव्हेंबर रोजी माजी पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीपासून पुढील 15 दिवस हे जनजागरण अभियान राबविले जाणार आहे. यादरम्यान विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवून केंद्रातील भाजप सरकारने केलेली महागाई व अर्थव्यवस्थेची दुरावस्था याबाबतची विस्तृत माहिती जनतेपर्यंत पोहचविली जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगारांवरील अन्याया विरोधात काँग्रेस पक्षाने याआधी विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीदेखील झोपी गेलेले मोदी सरकार जागे होत नाही.म्हणून या वाढत्या महागाई कडे लक्ष वेधण्यासाठी दि 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा