धक्कादायक ऊसतोड मजुरांच्या मुलांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला येणके येथील घटना
येणके ता.कराड येथे पाच वर्षीय आकाश पावरा या ऊसतोड मजुरांच्या मुलांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून ठार केले. सकाळी 7 वाजता ही घटना येणके- किरपे रस्त्यावरील शिवारात ही घटना घडली आहे.येणके गावच्या जवळच असलेल्या इनाम शिवारात ऊसतोड सुरू होती. सकाळी सात वाजता पाच वर्षीय मुलगा रानात खेळत होता. पाठीमागून बिबट्याने मुलांवर हल्ला केला, त्यानंतर ऊसाच्या शिवारात जवळपास अर्धाकिलोमीटर अंतरावर मुलाला बिबट्याने उचलून नेले आहे.या प्रकारामुळे ऊसतोड मजुरांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र मुलाचा जीव वाचविण्यात यश आले नाही. कराड तालुक्यातील येणकेसह तांबवे - सुपने किरपे भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून गेल्या काही दिवसापूर्वी दक्षिण तांबवे येथेही बिबट्याने एका मुलांवर हल्ला केला होता. तर गेल्या आठवड्यात चचेगाव येथील महिलेवरही बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने दखल घेवून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा