बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर न केल्याने पाटण तालुक्यातील या ग्रामपंचायतीचे दोन विद्यमान सदस्य अपात्र

वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर न केल्याने पाटण तालुक्यातील या ग्रामपंचायतीचे दोन विद्यमान सदस्य अपात्र
जाळगेवाडी (चाफळ ) ता. पाटण ग्रामपंचायतीच्या दोन विद्यमान सदस्यांची निवड अपात्र ठरविण्यात आली आहे. वेळेत जात पडताळणी कागदपत्रे सादर न केल्याची तक्रार रविंद्र गुरव यांनी केल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही कारवाई केली.

या अपात्रतेच्या कारवाईमुळे जाळगेवाडीसह संपूर्ण चाफळ विभागातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या जाळगेवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 2017 मध्ये झाली होती. या ग्रामपंचायतीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. निवडणुकी दरम्यान थेट सरपंचपदी शिवाजी काटे व सात सदस्य निवडून आले होते. यात, मागास प्रवर्गातुन प्रभाग तीन मधून बाळाराम  सुतार व महिलांच्या मागास प्रवर्गातून प्रभाग दोन मधून उषाताई सुतार या निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर या दोन सदस्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र प्रशासनाला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

या ग्रामपंचायतीत सरपंच काटे यांच्यासह सर्व सदस्य ह देसाई गटाचे आहेत. या ग्रामपंचायतीत  पाटणकर गटाला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. त्यामुळे दोन सदस्य अपात्र ठरले तरी या ग्रामपंचायतीवर देसाई गटाचीच सत्ता राहणार आहे. असे असले तरी दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार पडल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...