बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

* सातारा : 58 हजार 979 लाभार्थ्यांच्या कर्जखाती एकूण 370.12 कोटी एवढी रक्कम जमा**779 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे**जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोहर माळी यांचे आवाहन*

* सातारा : 58 हजार 979 लाभार्थ्यांच्या कर्जखाती एकूण 370.12 कोटी एवढी रक्कम जमा*
*779 पात्र लाभार्थी  शेतकऱ्यांनी  15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे*
*जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोहर माळी यांचे आवाहन*
  सातारा दि. 2 : महाराष्ट्र शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजने अंतर्गत कर्जमुक्ती देण्याची योजना केली होती. सातारा जिल्ह्यातील 60 हजार 389 कर्ज खाती  विशिष्ट क्रमांकासह  योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. पैकी 59 हजार 610  लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घेतले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्या  पैकी 58 हजार 979 लाभार्थ्यांच्या कर्जखाती एकूण 370.12 कोटी एवढी रक्कम जमा झालेली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे मनोहर माळी यांनी दिली. 
 अद्याप 779 पात्र लाभार्थी  शेतकऱ्यांनी  त्यांचे आधार प्रमाणीकरण करुन घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जाची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही. तरी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत  त्यांचे आधार प्रमाणीकरणासाठी संबंधीत बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि तालुक्याचे निंबंधक सहकारी संस्था यांच्याकडे संपर्क करुन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. अन्यथा सदरची योजना शासनाकडून बंद करण्यात आल्यास त्या नुकसानीची व परिणामाची जबाबदारी व्यक्तिगतरित्या संबंधित लाभार्थ्याची राहील असेही श्री. माळी यांनी सांगितले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...