गुरुवार, ६ मे, २०२१

ढेबेवाडी : अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून मत्रेवाडीतील घटना

ढेबेवाडी : अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून मत्रेवाडीतील घटना 

फोटो :पंचनामा करताना पोलीस अधिकारी
ढेबेवाडी (ता.पाटण) : मत्रेवाडी  येथील शिवारात मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचा  गळा दाबून खून झाल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. अविनाश कोळेकर (वय 20 वर्षे) असे संबंधित युवकाचे नाव असून, एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी  संबंधित महिलेच्या पती व दिराला अटक केली असून, पाटण न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, कोळेकरवाडी (ता. पाटण) येथील अविनाश कोळेकर अनेक वर्षांपासून आपल्या मामाच्या गावात मत्रेवाडीत  राहण्यास आहे.कामानिमित्ताने त्याचे मुंबईत वास्तव्य असले, तरी अधूनमधून आजोळी त्याचे येणे-जाणे असते. अलीकडे काही दिवसांपूर्वी तो मुंबईहून मत्रेवाडीस आला होता. दि.3 मे सोमवारी सकाळी गावाजवळच्या भांगा नावाच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

रात्री आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालातून अविनाशचा गळा दाबल्याने  मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून हा प्रकार घडल्याचे चौकशीतून समोर आल्याने संबंधित महिलेच्या पती व दिराला पोलिसांनी अटक केली. रविवारी (ता. 2) संबंधित महिला व अविनाश शिवारात झाडाखाली गप्पा मारताना बसलेले दिसून आल्यावर संशयितांनी रागाच्या भरात त्या दोघांनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून अविनाशचा गळा दाबला व त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी येथे भेट देऊन तपासकामी पोलिसांना मार्गदर्शन केले.

पाटण न्यायालयाने संशयित आरोपीना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार तपास करत आहेत. मृत अविनाशच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. कोळेकरवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...