बुधवार, ५ मे, २०२१

कुंभारगाव : पडवळवाडी येथील 16 जणांच्या कोविड चाचणीत 8 जण बाधित आल्याने खळबळ

कुंभारगाव : पडवळवाडी येथील 16 जणांच्या कोविड चाचणीत 8 जण बाधित आल्याने खळबळ

कुंभारगाव (ता.पाटण) : कुंभारगाव (पडवळवाडी) या छोट्याशा वाडीतील 16 जणांची आज आरोग्य विभागाने कोरोना चाचणी केली असता त्यातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. खबरदारी म्हणून रुग्णांचे वास्तव्य असलेला परिसर सील करण्यात आला आहे. 

कुंभारगाव ग्रामपंचायत हद्दीतील  पडवळवाडी या छोट्याशा वाडीतील अनेकजण ताप-सर्दीने आजारी असून, उपचारासाठी परिसरातील खाजगी दवाखान्यात जात असल्याची माहिती पोलिस पाटील अमित शिंदे यांना समजल्यावर त्यांनी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राला त्याबाबत कळविले.

आरोग्य केंद्राच्या वतीने आज तेथे कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले.त्यामध्ये 16 जणांची अँटिजेन चाचणी केल्यावर चक्क आठ जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली.खबरदारी म्हणून तातडीने तेथे प्रतिबंधित क्षेत्र तयार करून रुग्णांना औषधोपचार देत घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तपासणी शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोंजारी, आरोग्य कर्मचारी कांबळे, रोहित भोकरे, जे. एफ. पावरा, व्ही.जी. फाळके, स्वप्नील कांबळे, आशा स्वयंसेविका मनीषा शिंदे, पोलिस पाटील अमित शिंदे आदींनी सहभाग घेतला. गावात आणखी रुग्ण वाढू नयेत, यासाठी आवश्‍यक उपाययोजना हाती घेतल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोंजारी यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...