सोमवार, ३१ मे, २०२१

सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 जून 2021 पर्यंत वाढविला

सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 जून 2021 पर्यंत वाढविला

  सातारा दि. 31 : शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सध्याचा लॉकडाऊन दि. 15 जून 2021 पर्यंत वाढविला आहे. तथापि, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता व जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 01 जून 2021 रोजीचे 07.00 वा पासून ते दिनांक 08 जून 2021 रोजीचे 07.00 वा पर्यंत खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.  
 
*कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी* 
  सातारा जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे. या कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे. 
  पुढील नमूद अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. पुढील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. या आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना ( Exemption Category)   यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

*अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल*
  रुग्णालये ,निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.  व्हेटरीनरी हॉस्पिटल्स,  अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स. दुध संकलन केंद्रे सकाळी  07.00 ते 09.00 व सायंकाळी 6.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल.  शेती विषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने सकाळी 09.00 ते  दुपारी 03.00 या वेळेत चालू राहतील. तसेच घरपोच सेवा सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी असेल. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागेल.  शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.  शीतगृहे व गोदाम सेवा. स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम व सर्व लोकांची इमारतीबाबतची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा, भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळची कार्यालये  (SEBI) आणि (SEBI) मान्यता प्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा.स्टॉक एक्सचेंज (stock exchanges) डिपॉजिटर्स व क्लिअरींग कार्पोरेशन व (SEBI) कडे नोंदणीकृत असलेले एजंट,  टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा,  ई – व्यापार फक्त (अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी),  प्रसार माध्यमे (Media), पेट्रोल/डिझेल पंप फक्त वर नमूद केलेल्या सुट दिलेल्या वाहनांसाठी व अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील. पाणी पुरवठा सेवा,सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलीफोन सेवा. ATM’s सेवा, टपाल सेवा,  लस/औषधे/जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टमहाउस एजंट (Custom House Agent/ परवानाधारक  मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स Multi Modal Transport Operators ), कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging material) ची उत्पादन केंद्रे, रास्त भाव दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीत चालू ठेवणेस परवानगी असेल. औषधे दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 या कालावधीत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील औषध दुकाने 24 तास चालू ठेवणेस परवानगी असेल. सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या फळे, भाजीपाला घाऊक खरेदी विक्रीसाठी सकाळी 6.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत चालू राहतील. या कालावधीत फक्त घाऊक व्यापाऱ्यांना खरेदी करता येईल. तेथे किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेता यांना खरेदी करणेस मनाई आहे. घाऊक व्यापारी यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल., याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी नियोजन करावे व त्याचे पर्यवेक्षण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व  संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी करावे. तसेच घरपोच फळ व भाजीपाला सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 या कालावधीत पुरविणेस परवानगी राहील व याबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander यांनी नियोजन करावे. या नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी  करणाऱ्या संस्थांनी पुढील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व अंमलबजावणी प्राधिकरण/संस्था यांनी हि बाब विचारात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध/निर्बंध नसून सदरचे प्रतिबंध/निर्बंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत. अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळ काळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवे मध्ये गणल्या जातील. 
  *या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेच्या दुकानांनी खालील निर्देशांचे पालन करावे.*
  संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारीव ग्राहक हे कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.  अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी आवश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर  र.रु  500 /-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड - 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.  सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच ,इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणे करून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.
*सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील बाबी पूर्णपणे बंद राहतील*–
  व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट बंद राहतील. भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना बंद राहतील.मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहतील
रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील. सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने व    इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. सर्व  बेकरी पदार्थ विक्री पूर्णपणे बंद राहतील. माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा बंद राहतील. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँका व सहकारी बँका यांचेशी संबंधित फक्त शेतक-यांना खरीप हंगामाचे अनुषंगाने पीक कर्जाचे कामकाज, ATM's मध्ये पैसे भरणे, Cheque Clearance, Data Centre ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या कालावधीत चालू राहील. तसेच सदर बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहील. सदर ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच कोरोनाचे अनुषंगाने सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन केले जाईल., याची जबाबदारी संबंधित बँक व्यवस्थापक यांची राहील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediariesincluding standalone primary dealers). क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर (Payment System Operators), RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार पूर्णपणे बंद राहतील. सर्व नॉन बँकिंग (Non-Banking) वित्तीय महामंडळे पूर्णपणे बंद राहतील. सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Finance Institutions) पूर्णपणे बंद राहतील.बांधकाम क्रिया (Costruction Activity) पूर्णपणे बंद राहतील. तथापि, आपत्ती व्यवस्थापनाचे अनुषंगाने मान्सून पूर्व अत्यावश्यक असलेले काम करणेस परवानगी असेल.
*प्रवासी वाहतूक : सार्वजनिक वाहतूक*
  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (MSRTC) बस वाहतूक जिल्ह्यांतर्गत पूर्णपणे बंद राहील.  इतर सार्वजनिक वाहतूक (उदा.रिक्षा, टैक्सी-4 चाकी) हि अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी पुढील क्षमतेप्रमाणे सुरु राहतील.रिक्षा- चालक+ 2 प्रवासी, टैक्सी (4 चाकी)- चालक+ RTO नियमाच्या 50 % प्रवासी 3. वाहतुकी दरम्यान खालील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. . सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे  उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.  टॅक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. प्रत्येक प्रवासा नंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.  सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड –19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टॅक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.  सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.  रेल्वेच्या सर्वसाधारण बोगीमध्ये (General Compartment) कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी. रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.  सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवाहतुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील.  बस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल.
*खाजगी वाहतूक*:  सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील. खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक ही फक्त आपत्कालिन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणासाठी वाहन चालक + प्रवासी आसन क्षमतेच्या 50 % प्रवासी इतक्या क्षमतेने सुरु राहणेस परवानगी असेल. सदरची प्रवासी वाहतूक हि आंतर जिल्हा किंवा आंतर शहर असणे अपेक्षित नाही आणि ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच मर्यादित असावी. आंतर जिल्हा किंवा आंतर शहर प्रवासी वाहतूकीस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालिन वैद्यकीय परिस्थिती किंवा अंत्यसंस्कारासाठी किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असलेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस र.रु.10,000 /- इतका दंड आकारला जाईल. खाजगी बसेस ने होणारी आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील. बससेवा देणाऱ्यांनी एका शहरात फक्त दोन ठिकाणी गाडी थांबा ठेवावा आणि त्याचे वेळापत्रक तसेच थांबा याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी. गरज भासल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यात बदल सुचवू शकतील. उतरणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस ऑपरेटर द्वारे गृह विलगीकरणाचा ठळक शिक्का हातावर मारून घ्यावा लागेल. शिक्का मारायचे काम बस कंपनीने करायचे आहे. थर्मल स्कॅनरचा उपयोग करावा आणि जर कोणत्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ कोरोना केअर सेंटर (सीसीसी) किंवा रुग्णालयात पाठवावे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शहरात आगमनाच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) करण्याचा निर्णय घेतील आणि त्यासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेची जबाबदारी देतील. सदर चाचणीसाठी लागणारा खर्च, ठरवले असल्यास, प्रवासी किंवा सेवा प्रदाता यांना करावा लागेल. जर एखादा ऑपरेटर सदर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करताना आढळला तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्या विरोधात र.रु.10,000/- इतका दंड आकारील आणि असे उल्लंघन वारंवार केले जात असतील तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-19 परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.
*सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)*
  *कार्यालये:* पुढील कार्यालयांना सूट असेल केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये . विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. औषध उत्पादन/ वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय
  कोव्हीड-19 सबंधित अत्यावश्यक सेवेशी निगडीत शासकीय कार्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये 15% क्षमतेच्या उपस्थितीसह सुरु राहील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील. उपरोक्त नमूद इतर सर्व कार्यालये एकूण कर्मचारी संख्येच्या 15% क्षमतेसह अथवा जास्तीत जास्त 5 व्यक्तींच्या/ कर्मचारी/ अधिकारी यापैकी जे जास्त असेल इतक्या उपस्थितीसह सुरु राहील. या आदेशामधील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद इतर अत्यावश्यक सेवेतील कार्यालये 50 % पेक्षा जास्त नसेल इतक्या कमीत कमी कर्मचारी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल. जे व्यक्ती प्रत्यक्ष अत्यावश्यक सेवा पुरवितात त्यांनी त्यांची कर्मचारी संख्या कमी करावी तथापि अपवादात्मक परिस्थितीत ती 100 % पर्यंत ठेवता येवू शकेल. या कार्यालयामध्ये काम करीत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल व शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालया बाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात. सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*रेस्टॉरंट, बार, हॉटेल* : सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे एकत्रित बसून सेवा देणेस बंद राहतील. हॉटेल (लॉजिंग) आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट सुरू राहील.  बार सेवा बंद राहतील. कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवा घेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा (Home Delivery) बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा (Home Delivery) लागू राहणार नाही. हॉटेल्स मधील रेस्टॉरंट हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेले ग्राहक यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बाहेर पडता येईल. घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर  घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्यक्तींना राज्यशासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाई, तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. ही कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. रेस्टॉरंट, हॉटेल व बार मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*उत्पादन क्षेत्र* : पुढील नमूद उत्पादन केंद्रे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील.  या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील.  ज्या उत्पादन केंद्रांना, निर्यात पुरवठा आदेशानुसार विहित मुदतीत निर्यात पुरवठा करणे बंधनकारक आहे, अशी उत्पादन केंद्रे सुरु राहतील. ज्या कारखान्यांमध्ये अचानक उत्पादन थांबविता येणार नाही आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरु होवू शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना कर्मचाऱ्याच्या 50 % क्षमतेच्या उपस्थितीसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक / उद्योग विभागाने एखादे उत्पादन क्षेत्र / कारखाना सदर नियमाचा गैरवापर करून त्यांचे उत्पादन सुरु ठेवणार नाही याची खात्री करावी. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी. सुरु असलेली उत्पादन केंद्रे जर ऑक्सिजनचा वापर करीत असतील तर ते फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या माल उत्पादनासाठीच असेल याची खात्री करावी. तसेच सदर उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी / कामगार यांची राहण्याची व्यवस्था कारखाना परीसरामध्येच करणे अपेक्षित आहे. जर ते कारखाना क्षेत्राच्या बाहेर राहत असतील तर त्यांची हालचाल हि शक्यतो (ISOLATION BUBBLE) मध्येच होत असलेची खात्री करावी.
  सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करूनघ्यावे. जे कारखाने  केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कार्यस्थळ लसीकरण या अटीमध्ये बसत असतील तर त्यांनी त्यांच्या कामगार / कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाची व्यवस्था करावी.
   कारखाने व उत्पादन केंद्रे यांना पुढील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल.  कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आलेस, कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे. ज्या कारखाने/ उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने/ उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षा उपाय करून कोरोना +ve व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रा पर्यंत घेवून जावे लागेल. जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला असेल तर सबंधित कारखाने/  उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील.   गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवूनये. सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तरत्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील.

*वर्तमानपत्रे* / *मासिके*/ *नियतकालिके* : वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल. वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके यांची फक्त घरपोच सेवा सुरु राहील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर इ.* :  सिनेमागृहे बंद राहतील.  नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील. करमणूक नगरी/ आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. जल क्रीडा स्थळे बंद राहतील.  क्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील. वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.   चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रण बंद राहील. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारे सर्व दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.  सर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) बंदराहतील.

*धार्मिक प्रार्थनास्थळे* : सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. धार्मिक प्रार्थना स्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल.  धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स* :  केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*शाळा व महाविद्यालये* :  शाळा व महाविद्यालये बंद राहतील.  महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सातारा जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल.  परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास सदर परीक्षेस व्यक्तीशःउपस्थित राहणे आवश्यक आहे, अशा वेळी परीक्षार्थीस एका प्रौढ व्यक्तीसोबत परीक्षेचे प्रवेश पत्र सोबत बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

*धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम* : सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील.  जास्तीत जास्त 25  नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल.  एका हॉल / कार्यालया मध्ये एकच लग्न समारंभ 2 तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत जास्तीत जास्त 25 व्यक्ती / नातेवाईकांचे उपस्थितीत करणेस परवानगी असेल. याचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधांचा भंग करणाऱ्या कुटुंबास र.रु.50,000 /- इतका दंड आकारला जाईल. सबंधित कार्यालय क्षेत्र हे कोव्हीड-19 हि आपत्ती म्हणून घोषित असेल तोपर्यंत बंद करणेत येईल.
ii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल. लग्न समारंभाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) नसलेस/ लसीकरण करून घेतलेले नसलेस त्यास प्रत्येकी र.रु.1,000/- व सबंधित आस्थापनेवर र.रु.10,000/- इतका दंड आकारणेत येईल.  दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. एखाद्या धार्मिक / प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करणेत आलेले असलेस, लग्न समारंभ यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेचे अटीवर परवानगी देणेत येत आहे. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) असणे बंधनकारक असेल.

*ऑक्सिजन उत्पादक* : ऑक्सिजन कच्चा माल असणाऱ्या औद्योगिक प्रक्रियांवर बंदी घालण्यात येत आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक प्रक्रिया अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असल्यास किंवा अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीनंतर सुरु ठेवण्यात येतील. ऑक्सिजनचे उत्पादन करणारी उत्पादन केंद्रे यांनी त्यांचे उत्पादन आरोग्य विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. त्यांनी सदर आदेशाच्या तारखेपासून त्यांचे ग्राहक व पुरवठा करण्यात आलेल्या ऑक्सिजनचा अंतिम वापर दिलेल्या निर्देशानुसार प्रसिध्द करावा.  

*ई – व्यापार* :  ई –व्यापारास फक्त या आदेशातील मुद्दा क्र.2 मध्ये नमूद अत्यावश्यक वस्तू व सेवेसाठी परवानगी असेल. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जर सदर ई-व्यापार संस्था कंपनी केंद्र शासनाने अधिकृत केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी पत्र असेल तर सदर संस्थेने कॅम्प आयोजित करून त्यांचे सर्व कर्मचारी यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे. जे कर्मचारी घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचारीयांचे संपर्कात येत नाहीत त्यांचेसाठी या आदेशातील मुद्दा क्र.5 प्रमाणे कार्यवाही करावी.  इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारती मध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारती मधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारती मधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारती मधील व्याक्तीयानी राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड – 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. सदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल, तसेच सदर. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना अनुज्ञप्ती रद्द केली जाईल.
*सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies)* : कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा.  सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे).  कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10,000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षणकामी वापरला जाऊ शकतो.  सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी त्यांचे आवार / इमारतीमध्ये नियमित प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (Negative RT-PCR / RAT / TruNAT / CBNAAT Test Report) घ्यावा.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

*सातारा जिल्ह्यातील 1872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 31 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 35 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (7523), कराड 140 (22193), खंडाळा 86 (10364), खटाव 204 (15788), कोरेगांव 92 (14255),माण 223 (11419), महाबळेश्वर 8 (4016), पाटण 125 (6875), फलटण 523 (26021), सातारा 347 (35221), वाई 37 (11526 ) व इतर 10 (1055) असे आज अखेर  एकूण 166256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(168), कराड 8 (643), खंडाळा 1 (135), खटाव 2 (413), कोरेगांव 3 (315), माण 5 (213), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 1(251), सातारा 11 (1033), वाई 2 (305) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3677 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे**कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा**मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन**कोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक*

*कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे*

*कोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन*

*कोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक*

मुंबई दिनांक ३०: दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.

आपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार,  ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.

रविवार, ३० मे, २०२१

मुंबई : राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय काही नियमांत शिथिलता येणार

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय काही नियमांत शिथिलता येणार 

*ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू*

*कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार*
----------------- 

मुंबई दि ३०: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 

२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

*पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील*
  
२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

*पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
 
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. 
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती
 व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील 
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील 
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल. 
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  

*पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. 
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. 
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

------------------------------------------

*१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी*

Ø  कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

Ø  यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

Ø  मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

Ø  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

 Ø  दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

Ø  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
Ø  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.
मुंबई, 30 मे: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने  ब्रेक द चेन  अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं पहायला मिळत आहे.त्यामुळे आता राज्य सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला

कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. सर्व जिल्ह्यांत तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोनाच्या लाटेत अनेक बालकं अनाथ झाली

सर्व जिल्हे कोरोनामुक्त झाली तर राज्य कोरोनामुक्त होणार

कोरोनामुक्त गाव राज्य सरकारची नवी मोहिम

कोरोनामुक्त गाव ही मोहीम आपल्याला आजपासून राबवायची आहे

जर हे सरपंच आपले गाव कोरोनामुक्त करु शकतात तर इतर का नाही

दक्षिण सोलापूर येथील सुद्धा कोमलताई यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं आहे

हिवरे बाजार, घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली

हिवरे बाजार हे कोरोनामुक्त झालं आहे

घरे कोरोनामुक्त झाली तर गाव कोरोनामुक्त होणार

प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं तर मी, माझं घर कोरोनामुक्त ठेवणार

शहरी भागांत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे ग्रामीण भागात थोडा प्रादुर्भाव आहे

आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडची दुसरी लाट थोपवता आली नसती, हा लढा अजूनही सुरू आहे

लॉकाडाऊन असला तरी अर्थचक्र सुरू राहिलं पाहिजे

शिक्षण सुरूच ठेवायचं आहे, ऑनलाईन ठेवायचं की आणखी काही करायचं

शिक्षण क्षेत्रात काही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज

देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं

बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने धोरण ठरवायला हवं

मी परीक्षेच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे

दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार आहोत

परीक्षांच्या संदर्भात संपूर्ण देशभात शैक्षणिक धोरण एक असावं

कोविड प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी महाराष्ट्राची

साधारणत: सव्वादोन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे

येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार

वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट बालकांत येऊ शकते

पहिली लाट वयोवृद्द, दुसरी लाट तरुणांत आली होती

कोविड विरुद्धचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो

कोविड- नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे

स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढलं

पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्याची गरज

पावसाळ्यात साधीचे आजार आहेतच आणि त्यात कोरोनाचं संकट आहे

राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण

उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा लागला होता आणि नंतर तोही कमी पडला

राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1200 मेट्रिक टन इतकी

राज्याला दरदिवशी 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती

ऑक्सिजन आता अवघ्या काही तासांसाठी राहिला आहे असे फोन मधल्या काळात येत होते आणि यामुळे घाम फुटत होता, प्रशासनाचे धाबे दणाणत होते

दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे

तिसरी लाट संपूर्णपणे आपल्या वागण्यावर अवलंबून असेल

रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक

रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची आवश्यकता सुद्धा वाढली

तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे

ग्रामीण भागात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसत आहे

राज्यातील काही जिल्हे असे आहेत तेथे रुग्ण संख्या हलकीशी वाढताना दिसत आहे आणि ती गोष्ट काळजीची आहे

कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध कायम राहणार

कडक लॉकडाऊन केलेला नाहीये, निर्बंध लागू आहेत

बाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे

यावेळी रिकव्हरी रेट हा खूपच दिलासादेणारा आहे

साधारणत: 17 सप्टेंबर 2020 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण होते तर 26 मे 2021 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण संख्या होती म्हणजेच गेल्या लाटेतील सर्वोच्च रुग्ण संख्ये पेक्षा आता कुठे रुग्णसंख्या कमी होत आहे

यावेळीचं संकट हे सणासुदीच्या आधी आलं आहे

आज राज्यात 18 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली

पण नाईलाजाने आपल्या जीवाच्या काळजीपोटी हे काम करावं लागतं

निर्बंध लादावे लागतात, त्याच्या सारखं वाईट काम कुठलं असेल असं मला वाटत नाही

फेरिवाल्यांसाठी सुद्धा 52 कोटींचा निधी आतापर्यंत दिला आहे

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 154 कोटी 95 लाखांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला

कोरोनाच्या लढाईत आपण ज्या काही घोषणा केल्या त्यात अन्न पुरवठा वितरण, शिवभोजन थाळी मोफत दिलं

भूकंप रोधक घरांची निर्मिती करावी लागणार, अंडरग्राऊंड वीज कनेक्शन करावे लागणार

किनारपट्टीच्या भागात ठोस उपाययोजना कराव्या लागणार

लवकरच नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार

वादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे

तौैत्के चक्रीवादळाच्या दरम्यान प्रशासनाने चांगलं काम केलं

मी कोकणाचा धावता दौरा केला

वादळ्याच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून होतो

अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित झाला होता

तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं

कोरोनाच्या संकटात जिद्दीनं आणि निश्चयाने बंधने पाळली त्याबद्दल धन्यवाद

साधारणत: महिन्याभरातनंतर आपल्याशी संवाद साधत आहेराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा 31 मे 2021 पर्यंत पुन्हा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला.

*सातारा जिल्ह्यातील 1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि.30 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1990 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
   तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 75 (7447), कराड 231 (22053), खंडाळा 84 (10278), खटाव 262 (15584), कोरेगांव 250 (14163),माण 209 (11196), महाबळेश्वर 39 (4008), पाटण 158 (6750), फलटण 271 (25498), सातारा 336 (34952), वाई 62  (11489) व इतर 13 (1045) असे आज अखेर एकूण 164463 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (166), कराड 4 (635), खंडाळा 3 (134), खटाव 4 (411), कोरेगांव 1 (312), माण 1 (208), महाबळेश्वर 1 (44), पाटण 0  (157), फलटण 4 (250), सातारा 3 (1022), वाई 3 (303) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तळमावले :-इथं घडतंय माणुसकीच दर्शन ! वाढदिवसानिमित्त कोरोना सेंटर मध्ये अंडी आणि दूध वाटप

तळमावले :-इथं घडतंय माणुसकीच दर्शन ! वाढदिवसानिमित्त कोरोना सेंटर मध्ये अंडी आणि दूध वाटप

फोटो :अनिल देसाई (कुंभारगाव)

तळमावले -दि.30.संपूर्ण महाराष्ट्रावर कोरोना संकट उभं ठाकलं आहे. यात अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण या आजारात माणुसकीचं दर्शन घडविताना दिसत आहेत.शेंडेवाडी (कुंभारगाव) ता.पाटण येथील पोलीस पाटील व आदर्श संस्कार कॉम्पुटर इन्स्टिट्यूट तळमावले चे संचालक संतोष पवार सर यांनी आपला वाढदिवस ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी येथील कोरोना वार्ड मधील रुग्णांना अंडी व दुध वाटप करून साजरा केला त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.याप्रसंगी डॉ.अश्विनी देसाई अधिपरीचारक अमित निकम कुंभारगावचे पोलीस पाटील अमित शिंदे प्रेस फोटोग्राफर अनिल देसाई कोव्हिड हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते



शनिवार, २९ मे, २०२१

*आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा**आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत* *मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येणार*

*आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा*

*आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत* 

*मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करुन सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येणार*
                                                             *- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती*
पुणे, दि. 28 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.  
          पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (व्हीसीद्वारे), आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तर व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख व मान्यवर उपस्थित होते. 
            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रीमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल. गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी सांप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, यांनीही वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवार, २८ मे, २०२१

ढेबेवाडी : फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर घेतया खाकी वर्दीतील जनतेच्या सेवकांची काळजी

 ढेबेवाडी : फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर घेतया  खाकी वर्दीतील जनतेच्या सेवकांची काळजी
ढेबेवाडी : ता.पाटण येथील फुड अँण्ड  ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर नेहमी सामाजिक बांधीलकी जपली असून सामाजिक क्षेत्रातील  फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअरचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी येथे बोलताना केले.फुड अँण्ड ड्रग्ज कंन्झ्युमर वेल्फेअर यांच्या वतीने मास्क व सॅनिटायझरच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. फुड अँण्ड ड्रग्जकंन्झ्युमर वेल्फेअरच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाणे,कराड ग्रामीण पोलीस ठाणे येथे कोरोना प्रतिबंधक यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या पोलीस दलासह फ्रंटलाईन वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप कराड ग्रामीण चे पोलीस निरीक्षक श्री.बाळासाहेब भरणे व ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  श्रीसंतोष पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी श्री माणिक खटावकर (माजी सदस्य, कुंभारगाव ग्रामपंचायत )श्री प्रकाश मोरे ( अध्यक्ष फुड अँण्ड ड्रग्ज पाटण तालुका ) प्रा सचिन पुजारी सर (के.सी.कॉलेज,तळमावले व सचिव,संजिवन प्रतिष्ठान कुंभारगाव ) ,श्री मानंतोष  जंगाणी (गुढे) , श्री राजेंद्र पुजारी (दै.क्रूष्णाकाठ प्रतिनिधी ), मा श्री संजय भुलूगडे ( माजी उपसरपंच तळमावले ग्रामपंचायत ) ,मा श्री  दुधडे (प्रेस  फोटोग्राफर )  तसेच पोलीस कर्मचारी , होमगार्ड उपस्थित होते.

मुंबई :अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण :जूनअखेर लागणार निकाल

मुंबई :अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण :जूनअखेर लागणार निकाल

मुंबई, दि. २८ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जून अखेरीस लावण्याचे नियोजन असून अकरावी  प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परिक्षा (CET) घेण्यात येईल, ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

जून अखेर लागेल निकाल

मंडळामार्फत जून २०२१ अखेर निकाल घोषित करण्याचे नियोजन आहे.त्याकरिता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रा.गायकवाड यांनी केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे धोरण तयार करताना विभागातील तज्‍ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे २४  बैठकांद्वारे चर्चा केली आहे.

सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने आली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापनासाठी विविध उपक्रम केलेले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इयत्ता

दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता ठेवून राज्य मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने इयत्ता नववी व इयत्ता दहावीसाठी सुधारित मूल्यमापन योजना निश्चित केली असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२०२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेच्या अंतिम निकालाचे निकष असे

  • विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण
  • विद्यार्थ्यांचे दहावीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन २० गुण
  • विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण (इयत्ता नववी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश व इयत्ता दहावी संपादणूक यासाठी ५० टक्के भारांश)

हे मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोरोना पूर्व काळातील (सामान्य परिस्थितीमधील) संपादणूक पातळीही विचारात घेतली गेली आहे. सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा) निकाल कोरोनापूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर सदर निकालाची नोंद आहे.

ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांनी कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई याची तरतूद करण्यात आली आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

पुनर्परीक्षा आणि श्रेणीसुधार

पुनर्परीक्षार्थी ( Repeater Student), खाजगी ( फॉर्म नं. १७), तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठी देखील मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजने (Class Improvement) अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी अबाधित राहतील. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार आम्ही हे धोरण तयार करताना केला आहे.

अकरावी परीक्षेसाठी प्रवेश परीक्षा

विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इयत्ता दहावी निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने अकरावी प्रवेशासाठी  एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) सीईटी  घेणार असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ढेबेवाडी पोलिसांनी वसूल केला लाखाच्या वर रुपयांचा दंड

 


फोटो:अनिल देसाई {कुंभारगाव}

ढेबेवाडी दि.28: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक केला आहे मात्र अनेकजण नियम तोडतात अशा नागरिकांवर ढेबेवाडी पोलिसांनी कारवाई करून १ लाखाचा दंड वसूल केला आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे  सहा.पो.निरीक्षक  संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी परिसरात ठीकठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करत कारवाई करून सुमारे १ लाखाच्या वर दंड वसूल केला आहे तो पण फक्त ४० दिवसात १५ एप्रिल पासून आज दि.२७ मे पर्यंत  आज जमा झालेली १ लाख ३०० रु.संबधित ग्रामपंचायतीना पोलिस ठाण्यात सपुर्द करण्यात आली यामध्ये सर्वाधिक तळमावले ग्रामपंचायतीला ४९,३००/-तर मुन्द्रूळकोळे ग्रामपंचायतीला ३६,५००/- आणि ढेबेवाडी ग्रामपंचायतीला १४,५००/- असे सर्व मिळून १ लाख ३०० रु.संबधित ग्रामपंचायतीच्या सरपंच याच्याकडे सुपर्द करण्यात आला या कारवाईत अजय माने आणि संदेश लादे ट्राँफीक हावलदार होमगार्ड व इतर पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे 

­­­­­­-----------------------------------------------------------------------------------------------

संचारबंदी चालू झाल्यापासून दररोज कारवाई सुरु आहे जनतेच्या हितासाठी आम्ही हि मोहीम राबवत आहोत नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी अत्यावश्य सेवे व्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये नियमाचे उल्लघन करणाऱ्या नागरिकावर कारवाई केली जाईल :-सहा.पो.निरीक्षक श्री संतोष पवार 


*सातारा जिल्ह्यातील : 2528 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 30 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 2528 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 30 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 28 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2528 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 50 (7314), कराड 172 (21709), खंडाळा 95 (10112), खटाव 167 (15075), कोरेगांव 146 (13787),माण 159 (10912), महाबळेश्वर 39 (3965), पाटण 67 (6502), फलटण 1253 (24311), सातारा 308 (34498), वाई 59 (11356 ) व इतर 13 (1013) असे आज अखेर  एकूण 160554 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 5 (626), खंडाळा 0 (131), खटाव 2 (404), कोरेगांव 2 (309), माण 4 (205), महाबळेश्वर 1(43), पाटण 1 (156), फलटण 1(245), सातारा 13 (1010), वाई 1 (299) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3592 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवार, २७ मे, २०२१

कुंभारगाव : चिखलेवाडीतील ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास !

कुंभारगाव : चिखलेवाडीतील ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास !
तळमावले/प्रतिनिधी
चिखलेवाडी (ता.पाटण) येथील एका कोरोना बाधित महिलेचा घरातच मृत्यू झाला असता नातेवाईकानीं आरोग्य विभागाला अंधारात ठेऊन अंत्यसंस्कार उरकल्याने खळबळ उडाली होती 
अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच  उडाली होती प्रतिबंध म्हणून प्रशासनाने आज गुरूवार दि.27 एप्रिल तळमावले प्राथमीक केंद्राअंतर्गत अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये 25 जणांची टेस्ट केली.यातील 1 व्यक्तीचा अहवाल बाधित आल्याने चिखलेवाडी ग्रामस्थांनी व आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकला 
तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणी कॅम्प मध्ये डॉ.सुप्रिया यादव तसेच आरोग्य सेविका ए, एम कांबळे, आरोग्य सहाय्यक जामसिंग पावरा व चिखलेवाडी पोलीस पाटील प्रवीण मोरे, अमित शिंदे सहभागी झाले होते. 


"वापर आणि काढून टाका!"बी ए एम एस. डॉक्टरांसाठीचे धोरण कायमस्वरूपी बदलून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय करण्याची शासनाला मागणी.

 "वापर आणि काढून टाका!"बी ए एम एस. डॉक्टरांसाठीचे धोरण कायमस्वरूपी बदलून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय करण्याची शासनाला मागणी.

अनेक वेळा भरतीसाठी जाहिरात देऊन सुद्धा शासनाला एमबीबीएस(MBBS) धारक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नव्हते. एमबीबीएस (MBBS) डॉक्टर शासन सेवा करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कमजोर झाली होती. स्थानिक लोकप्रतिनिधी शासनाकडे वारंवार रिक्त असलेल्या पद भरण्यासाठी पाठपुरावा करत होते. त्यामुळे दोन वर्षापूर्वी शासनाने बीएएमएस (BAMS) अर्हता धारकामधून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळ स्थापून त्याव्दारे निवड प्रक्रिया घेवून मुलाखतीद्वारे १३०० याच्यावर तदर्थ वैद्यकीय अधिकारी या पदांवर कंत्राटी पद्धतीने नेमणुका दिल्या.

या तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांच्या नेमणुका झाल्यानंतर लगेचच कोरोना साथीने संपूर्ण महाराष्ट्रसह देशात आपले हातपाय पसरले. या पहिल्या लाटेच्या काळात कोणतेही विमा संरक्षण नसताना , तुटपुंजे  मानधन तेही अनियमित मिळत असताना, इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणे रजा व भत्ते मिळत नसताना, वैयक्तिक  संरक्षण साधने अपुरी असताना याबाबत शासनास वेठीस न धरता वैद्यकीय कर्तव्याची जाण ठेवून व ' सेवा हेच व्रत'या उक्तीप्रमाणे स्वतःच्या जीवाची परवा न करता मुख्यालयी राहून 24 तास काम करून कोरोना साथ नियंत्रणात महत्त्वाचे योगदान दिले आहे. 

दुसऱ्या लाटे च्या काळातही संपूर्ण क्षमतेने व पहिल्या लाटेच्या अनुभवाच्या जोरावर या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने ग्रामीण भागामधील जनतेला आरोग्यसेवा दिली आहे व देत आहेत.
अशातच शासनाकडून अननुभवी व नवीनच पदवी प्राप्त केलेले  एमबीबीएस अर्हताधारक यांना  वैद्यकीय अधिकारी म्हणून आरोग्य केंद्राची ठिकाणी नेमणुका देण्यात येत आहेत व महाराष्ट्रभर कोरोनाच्या कठीण काळामध्ये शासनाला साथ देणाऱ्या तदर्थ  वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचा शासनाने सपाटा लावला आहे. हा निर्णय          लोककल्याणकारक व ग्रामीण भागातील जनतेच्या हिताचा नाही .  तसेच या निर्णयामुळे तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे . या तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  दोन वर्षांपासून नियुक्ती आदेशातील जाचक अटी व शर्ती मुळे स्वतःचा खासगी वैद्यकीय व्यवसाय बंद करून 24 तास शासनास सेवा दिली आहे. आत्ता महाराष्ट्रभर जवळ जवळ ८५० तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे . त्यामुळे  नोकरीही नाही व व्यवसाय बंद केल्याने  त्यांच्यावर  बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गहन प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे.
शासनाने गरज सरो वैद्य मरो! 
वापरा आणि काढून टाका! 

हे धोरण बदलणे आवश्यक आहे. कारण एमबीबीएस अर्हताधारक बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी हे दीर्घकाळ शासन सेवा देण्यासाठी उत्सुक नाहीत. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेला पात्र होण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये एक वर्षासाठी आरोग्य सेवा देणे सक्तीचे केले असल्याने एमबीबीएस धारक वैद्यकीय अधिकारी रुजू झाले आहेत.. जुलै महिन्यामध्ये प्रवेश परीक्षा झाल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी शासन सेवा अर्ध्यात सोडून पदव्युत्तर शिक्षणासाठी निघून जातील दरम्यानच्या काळात तिसरी लाट आल्यास व  डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे साथ नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे .तसेच आरोग्य यंत्रणेचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या कार्यमुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत घेतल्यास तिसरी लाट व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थेला सोपे जाईल.

तरी शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे व कोरोना साथ उद्रेक काळातील तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आवश्यक   वैद्यकीय अधिकारी गट-ब पदे लवकरात लवकर निर्माण करणेसाठीचा  दीर्घकालीन हिताचा व दूरदृष्टीचा शासन निर्णय करणे व त्याची त्वरीत  अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 
 महाराष्ट्रातून अनेक विद्यमान आमदार व खासदार यांनी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मा. आरोग्य मंत्र्यांकडे बी. ए . एम. एस. डॉक्टरांसाठी नवीन पदनिर्मिती साठीचा  धोरणात्मक निर्णय होण्यासाठी  पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तरी शासनाकडून त्याची दखल घेऊन   तिसरी लाट व्यवस्थापनासाठी आवश्यक बी. ए. एम. एस. अर्हता धारकांसाठी वैद्यकीय अधिकारी गट- ब पदनिर्मिती करून कार्यमुक्त केलेल्या तदर्थ वैद्यकीय अधिकरी  यांना  तात्काळ सेवेत घेणे आवश्यक आहे. बी ए एम एस डॉक्टरांच्या बाबतीत वापरा आणि काढून टाका हे धोरण कायमस्वरूपी बदलून ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था स्थायी व बळकट करण्यासाठी ही नियमित पद निर्मिती करून या कार्यमुक्त तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांना  दिलासादायक निर्णय करून न्याय देणे गरजेचे आहे . माननीय मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी यात जातीने लक्ष घालून तदर्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक  आहे.

-------------------------------------

आमच्या प्रतिकूल परिस्थितीत सर्व गोष्टी विरोधात असून कोणताही निर्णय आमच्यासाठी कल्याण कारी नसताना केलेल्या प्रामाणिक सेवेला शासनाने सन्मान द्यावा. आणि बळजबरीने कामाला लावलेल्या bonded mbbs लोकांसाठी कार्यमुक्त केलेल्या सर्व लोकांना पुन्हा शासनसेवेत घेऊन नियमित पदनिर्मिती करुण ऐतिहासिक निर्णय घ्यावा ज्यामुळे mbbs आणि bams यांच्यात इथूनपुढे पदासाठी कलगीतुरा लागणार नाही आणि लोक कल्याणकारी निर्णय घेतल्यामुळे आम्ही सर्व उपेक्षित लोक आपल्या कायम ऋणात राहू. :- डॉ.मंगेश खबाले

*सातारा ; कोरोनाबाधित रुग्णाकडून विविध हॉस्पिटलकडून 20 लाखापेक्षा अधिकचे बिल ; रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

*सातारा ; कोरोनाबाधित रुग्णाकडून विविध हॉस्पिटलकडून 20 लाखापेक्षा अधिकचे बिल ; रक्कम परत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

सातारा दि. 27 :  जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारांचे देयक पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन एकूण 183 रुग्णांची  जादा आकारणी करण्यात आलेली रक्कम रु. 20 लाख 56 हजार 743 परत करण्याचे आदेश काढण्याबात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेशीत केले आहे. 
  महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ बाधित रुग्णांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे. याबाबत शासनाने वेळावेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत आहे अगर कसे ? तसेच जिल्ह्यातील रुग्णालयांकडुन कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणारे बाबनिहाय वैद्यकीय उपचारांचे देयक योग्य आहे अगर कसे ? याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यातील 63 हॉस्पिटलसाठी  63 ऑडीटर व तपासणी अधिकाऱ्यांच्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.  या पथकामार्फत एकूण 63 हॉस्पिटलमधील 4579 एवढ्या रुग्णांच्या बीलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये रुग्णालयांनी  रक्कम रु. 22 कोटी 62 लाख 20 हजार 239 इतकी रक्कम आकारण्यात आली होती. 
  सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना 28 हॉस्पिटलमध्ये सुरु असून या हॉस्पिटलमध्ये एकूण बेडच्या 80 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
 

*सातारा जिल्ह्यातील 2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 2675 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 27 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2675 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 125 (7264), कराड 228 (21537), खंडाळा 135 (10017), खटाव 283 (14908), कोरेगांव 158 (13641),माण 131 (10753), महाबळेश्वर 15 (3926), पाटण 111 (6435), फलटण 1071 (23058), सातारा 343 (34190), वाई 64 (11297 ) व इतर 11 (1000) असे आज अखेर  एकूण 158036 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(164), कराड 9 (621), खंडाळा 1 (131), खटाव 8 (402), कोरेगांव 4 (307), माण 2 (201), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (155), फलटण 0(244), सातारा 9 (997), वाई 0 (298) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3562 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

बुधवार, २६ मे, २०२१

*सातारा जिल्ह्यातील :2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील :2156 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 26 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 40 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
   तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 94  (7139), कराड 227 (21309), खंडाळा 161 (9882), खटाव 324 (14625), कोरेगांव 181 (13483),माण 138 (10622), महाबळेश्वर 11 (3911), पाटण 81 (6324), फलटण 408 (22087), सातारा 437 (33886), वाई 82 (11233) व इतर 12 (989) असे आज अखेर एकूण 155490 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (164), कराड 4 (612), खंडाळा 4 (130), खटाव 6 (394), कोरेगांव 3 (303), माण 2 (199), महाबळेश्वर 0(42), पाटण 4  (155), फलटण 2(244), सातारा 9 (988), वाई 4 (298) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3529 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

मंगळवार, २५ मे, २०२१

आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून २५ टक्के निधी कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी

आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून २५ टक्के निधी कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी 

मुंबई, दि. २५ : राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. टोपे यांनी  संगितले.

मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजार व्हायल्स उपलब्ध होतील.

ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना  करण्यात आली आहे.

म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.

राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणावर भर द्यावा. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

*सातारा : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद**सुधारीत आदेश जारी*

सातारा : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद सुधारीत आदेश जारी

  सातारा दि. 25 :  कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात  जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार  दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा लागू राहणार नाही.” 

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पी एच सी च्या डॉक्टरांची घेतली आढावा बैठक*

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पी एच सी च्या डॉक्टरांची घेतली आढावा बैठक* 
कराड /वार्ताहर
 कराड दि.25: कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मधील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांची आढावा बैठक कराड येथील विश्रामगृह येथे घेतली. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, उपजिल्हा रुग्णालय कराड चे अधीक्षक डॉ प्रकाश शिंदे आदींच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यावेळी उपस्थित होते यांच्यासह या बैठकीला मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे आदी यावेळी उपस्थित होते. 

हि आढावा बैठक कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने घेतली गेली होती. या बैठकीत आ. चव्हाण यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या केंद्रातील अडचणी समजून घेतल्या तसेच सद्य सुरु असलेले लसीकरण, कोरोना रुग्णांची तपासणी यांचा आढावा घेत कोरोना होऊन बरे झालेल्यांचे नोंदणी करून त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे यावेळी आ. चव्हाण यांनी सांगितले.  यासाठी "पोस्ट कोविड" विभाग व्यवस्था प्रत्येक पी एच सी सेंटर मध्ये करणे आवश्यक असल्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच आ. चव्हाण यांनी या मिटिंग मध्ये सर्व डॉक्टरांना पुढे सूचना दिल्या कि, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रकारे आरोग्य व्यवस्थेने काळजी घेतली होती ती यंत्रणा किंवा व्यवस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिसली नाही कोरोना गेल्याचे समजून सर्व यंत्रणा शांत झाल्याने दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास यंत्रणा कमी पडली ती अवस्था तिसऱ्या लाटेत होऊ नये यासाठी आधीच काळजी घेणे आवश्यक असल्याचे आ. चव्हाण यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होत असल्याचे तत्ज्ञांचे मत आहे ते विचारात घेऊन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज बेडची व वार्ड ची व्यवस्था करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यवस्था गरजेच्या आहेत तसेच ज्या गोष्टींची, यंत्रणेची आत्ता गरज जाणवली ती तिसऱ्या लाटेत उद्भवू नये यासाठी एक अहवाल व मागणी पत्र शासनाकडे तात्काळ पाठवावा अश्या सूचना आ. चव्हाण यांनी आजच्या आढावा बैठकीत दिल्या. 
------------------------------------------------------

*सातारा जिल्ह्यातील2364 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील2364 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 25 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2364 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 66 (7045), कराड 302 (21082), खंडाळा 228 (9721), खटाव 359 (14373), कोरेगांव 133 (13302),माण 192 (10484), महाबळेश्वर 11 (3900), पाटण 54 (6243), फलटण 562 (21679), सातारा 316 (33549), वाई 116 (11151 ) व इतर 25 (977) असे आज अखेर  एकूण 153506 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4(162), कराड 6 (608), खंडाळा 2 (126), खटाव 7 (388), कोरेगांव 1(300), माण 2(197), महाबळेश्वर 0(42), पाटण 1 (151), फलटण 0(242), सातारा 8 (979), वाई 2 (294) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3489 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट

‘शिवसमर्थ’ने जपली बांधिलकी; कोवीड सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट

तळमावले/वार्ताहर
ढेबेवाडी येथील कोविड केअर सेंटरला वाॅटर प्युरिफायर भेट देवून शिवसमर्थ ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी पाटणचे तहसिलदार योगेश टोम्पे, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, शिवसमर्थ सोसायटीचे उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, ‘प्रहार संघटनेच्या’ विद्याताई कारंडे, सेंटरमधील डाॅक्टर, नर्सेस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शिवसमर्थ ने आर्थिक सेवा देत असताना सामाजिक बांधिलकीही तळमळीने जोपासली आहे. यापूर्वी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेने कोवीड-19 च्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाखाचा धनादेश दिला आहे. महिला बचत गटांकडून बनवलेले मास्क ग्रामीण भागातील वाडयावस्त्यांवर वाटले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी व्हिडीओ क्लिप, तसेच पत्रकार, पोलीस पाटील यांना जीवनावश्यक वस्तू असलेले कीट दिले आहेत. या माध्यमातून संस्थेने कोरोना विरुध्दच्या लढयात सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिवसमर्थ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24 तास सेवा देण्याचाही प्रयत्न गेली 10 वर्षे संस्था करत आहेत.
तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगांव या विभागातील संस्थेने तळमावले येथून गेली 3 वर्षे एटीएम सेवा देवून लोकांची होणारी गैरसोय थांबवली आहे. संस्थेच्या या विविध उपक्रमांचे जनमानसांत कौतुक होत आहे. कोविड केअर सेंटर ला वाॅटर प्युरिफायर भेट दिल्याबद्दल मान्यवरांनी शिवसमर्थचे आभार मानले आहेत.

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश 

मुंबई, : गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा !

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरले.किती बाहेर विकले. यासंदर्भात तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

कोट्यवधींचा महसूल बुडतोय

गौण खनिजाच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय. महसूल यंत्रणेने योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीत काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

सोमवार, २४ मे, २०२१

*सातारा :बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु**जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*

*सातारा :बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु*
*जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी*

सातारा दि. 24 : सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.

*सातारा :खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

*सातारा :खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा*

- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन*

सातारा दि. 24 : या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पिक कर्ज वाटप करुन  सर्वसमान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बॅकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
येथील नियोजन भवनात खरीप हंगाम 2021 पीक कर्ज पुरवठा, शेती विद्युत पंप व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचे कर्जाची प्रकरणे मंजूर करावेत, अशा सूचना करुन, तौक्ते वादळामुळे विद्युत वितरण कंपनीचे विद्युत पोल पडले आहेत ते तात्काळ दुरुस्त करुन गावांमधील खंडीत झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करावा.

*तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणेनी सज्ज रहावे*

 तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तशी तयारी करावी. तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज रहावे. तसेच ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, घाबरुन त्यांचा मृत्यु ह्दय विकाराने झाला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्ग झाल्यास न घाबरता वेळेत औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.
   शेतकऱ्यांचे शेती विद्युत पंप वीज कनेक्शन प्रलंबीत आहे, अशा प्रलंबीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर विज कनेक्शन द्यावे. तसेच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज पुरवठा करावा. तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे या अनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या बैठकीत केल्या.
 खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
 जिल्हा अग्रणी बॅकेने तयार केलेल्या 9 हजार 275 कोटीच्या वार्षिक पतआराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही  मान्यवरांच्या हस्ते या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, जिल्हा उपनिबंधक, प्रकाश आष्टेकर, अधीक्षक अभियंता गौतम गाकयावाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

*सातारा जिल्ह्यातील : 2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील : 2648 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 31 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 24 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2648 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 31 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 47 (6979), कराड 182 (20880), खंडाळा 362(9493), खटाव 566(14014), कोरेगांव 212(13169),माण 207(20292), महाबळेश्वर 39 (3889), पाटण 109(6189), फलटण 515 (21162), सातारा 311 (33333), वाई 84 (11035 ) व इतर 14 (952) असे आज अखेर  एकूण 151387 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 5(158), कराड 3(602), खंडाळा 0 (124), खटाव 8 (381), कोरेगांव 4(299), माण 0(195), महाबळेश्वर 0(42), पाटण 0 (150), फलटण 1(242), सातारा 7 (971), वाई 3 (292) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3456 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...