![]() |
फोटो:अनिल देसाई {कुंभारगाव} |
ढेबेवाडी दि.28: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक केला आहे मात्र अनेकजण नियम तोडतात अशा नागरिकांवर ढेबेवाडी पोलिसांनी कारवाई करून १ लाखाचा दंड वसूल केला आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी परिसरात ठीकठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करत कारवाई करून सुमारे १ लाखाच्या वर दंड वसूल केला आहे तो पण फक्त ४० दिवसात १५ एप्रिल पासून आज दि.२७ मे पर्यंत आज जमा झालेली १ लाख ३०० रु.संबधित ग्रामपंचायतीना पोलिस ठाण्यात सपुर्द करण्यात आली यामध्ये सर्वाधिक तळमावले ग्रामपंचायतीला ४९,३००/-तर मुन्द्रूळकोळे ग्रामपंचायतीला ३६,५००/- आणि ढेबेवाडी ग्रामपंचायतीला १४,५००/- असे सर्व मिळून १ लाख ३०० रु.संबधित ग्रामपंचायतीच्या सरपंच याच्याकडे सुपर्द करण्यात आला या कारवाईत अजय माने आणि संदेश लादे ट्राँफीक हावलदार होमगार्ड व इतर पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे
-----------------------------------------------------------------------------------------------
संचारबंदी चालू झाल्यापासून दररोज कारवाई सुरु आहे जनतेच्या हितासाठी आम्ही हि मोहीम राबवत आहोत नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी अत्यावश्य सेवे व्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये नियमाचे उल्लघन करणाऱ्या नागरिकावर कारवाई केली जाईल :-सहा.पो.निरीक्षक श्री संतोष पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा