रविवार, ३० मे, २०२१

मुंबई : राज्यात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय काही नियमांत शिथिलता येणार

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय काही नियमांत शिथिलता येणार 

*ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू*

*कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार*
----------------- 

मुंबई दि ३०: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 

२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

*पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील*
  
२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

*पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :
 
वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील. 
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील. 
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती
 व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील 
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील 
दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल. 
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते  

*पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल. 
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील. 
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

------------------------------------------

*१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी*

Ø  कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

Ø  यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

Ø  मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

Ø  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज  बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

 Ø  दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

Ø  कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
Ø  स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.
मुंबई, 30 मे: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने  ब्रेक द चेन  अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. जवळपास दोन महिन्यांपासून लागू असलेल्या या लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही रुग्णसंख्या कायम असल्याचं पहायला मिळत आहे.त्यामुळे आता राज्य सरकारने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्येत घट झाली आहे तेथील नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला

कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे. लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ज्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला. सर्व जिल्ह्यांत तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोनाच्या लाटेत अनेक बालकं अनाथ झाली

सर्व जिल्हे कोरोनामुक्त झाली तर राज्य कोरोनामुक्त होणार

कोरोनामुक्त गाव राज्य सरकारची नवी मोहिम

कोरोनामुक्त गाव ही मोहीम आपल्याला आजपासून राबवायची आहे

जर हे सरपंच आपले गाव कोरोनामुक्त करु शकतात तर इतर का नाही

दक्षिण सोलापूर येथील सुद्धा कोमलताई यांनी आपलं गाव कोरोनामुक्त केलं आहे

हिवरे बाजार, घाटणे ही गावे कोरोनामुक्त झाली

हिवरे बाजार हे कोरोनामुक्त झालं आहे

घरे कोरोनामुक्त झाली तर गाव कोरोनामुक्त होणार

प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं तर मी, माझं घर कोरोनामुक्त ठेवणार

शहरी भागांत कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे ग्रामीण भागात थोडा प्रादुर्भाव आहे

आपण सहकार्य केलं नसतं तर कोविडची दुसरी लाट थोपवता आली नसती, हा लढा अजूनही सुरू आहे

लॉकाडाऊन असला तरी अर्थचक्र सुरू राहिलं पाहिजे

शिक्षण सुरूच ठेवायचं आहे, ऑनलाईन ठेवायचं की आणखी काही करायचं

शिक्षण क्षेत्रात काही क्रांतिकारी निर्णय घेण्याची गरज

देशासाठी एक शैक्षणिक धोरण असायला हवं

बारावीच्या परीक्षेबाबत केंद्राने धोरण ठरवायला हवं

मी परीक्षेच्या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे

दहावीचा निर्णय आम्ही घेतला बारावीच्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार आहोत

परीक्षांच्या संदर्भात संपूर्ण देशभात शैक्षणिक धोरण एक असावं

कोविड प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी महाराष्ट्राची

साधारणत: सव्वादोन कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे

येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार

वयोमानाप्रमाणे म्हटलं तर कदाचित तिसरी लाट बालकांत येऊ शकते

पहिली लाट वयोवृद्द, दुसरी लाट तरुणांत आली होती

कोविड विरुद्धचं युद्ध आपण नक्कीच जिंकू शकतो

कोविड- नॉन कोविड ओळखणं हे फार महत्त्वाचं आहे

स्टेरॉईडमुळे म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढलं

पावसाळ्यात साथीचे रोग रोखण्याची गरज

पावसाळ्यात साधीचे आजार आहेतच आणि त्यात कोरोनाचं संकट आहे

राज्यात म्युकरमायकोसिसचे 3 हजार रुग्ण

उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करावा लागला होता आणि नंतर तोही कमी पडला

राज्याची ऑक्सिजन निर्मिती क्षमता 1200 मेट्रिक टन इतकी

राज्याला दरदिवशी 1700 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती

ऑक्सिजन आता अवघ्या काही तासांसाठी राहिला आहे असे फोन मधल्या काळात येत होते आणि यामुळे घाम फुटत होता, प्रशासनाचे धाबे दणाणत होते

दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे

तिसरी लाट संपूर्णपणे आपल्या वागण्यावर अवलंबून असेल

रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणे आवश्यक

रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनची आवश्यकता सुद्धा वाढली

तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे

ग्रामीण भागात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसत आहे

राज्यातील काही जिल्हे असे आहेत तेथे रुग्ण संख्या हलकीशी वाढताना दिसत आहे आणि ती गोष्ट काळजीची आहे

कडक लॉकडाऊन नाही पण निर्बंध कायम राहणार

कडक लॉकडाऊन केलेला नाहीये, निर्बंध लागू आहेत

बाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे

यावेळी रिकव्हरी रेट हा खूपच दिलासादेणारा आहे

साधारणत: 17 सप्टेंबर 2020 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण होते तर 26 मे 2021 रोजी 24 हजारांच्या आसपास रुग्ण संख्या होती म्हणजेच गेल्या लाटेतील सर्वोच्च रुग्ण संख्ये पेक्षा आता कुठे रुग्णसंख्या कमी होत आहे

यावेळीचं संकट हे सणासुदीच्या आधी आलं आहे

आज राज्यात 18 हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली

पण नाईलाजाने आपल्या जीवाच्या काळजीपोटी हे काम करावं लागतं

निर्बंध लादावे लागतात, त्याच्या सारखं वाईट काम कुठलं असेल असं मला वाटत नाही

फेरिवाल्यांसाठी सुद्धा 52 कोटींचा निधी आतापर्यंत दिला आहे

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी 154 कोटी 95 लाखांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला

कोरोनाच्या लढाईत आपण ज्या काही घोषणा केल्या त्यात अन्न पुरवठा वितरण, शिवभोजन थाळी मोफत दिलं

भूकंप रोधक घरांची निर्मिती करावी लागणार, अंडरग्राऊंड वीज कनेक्शन करावे लागणार

किनारपट्टीच्या भागात ठोस उपाययोजना कराव्या लागणार

लवकरच नुकसानग्रस्तांना मदत देण्यात येणार

वादळामुळे नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे

तौैत्के चक्रीवादळाच्या दरम्यान प्रशासनाने चांगलं काम केलं

मी कोकणाचा धावता दौरा केला

वादळ्याच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून होतो

अनेक ठिकाणी घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित झाला होता

तौत्के चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं

कोरोनाच्या संकटात जिद्दीनं आणि निश्चयाने बंधने पाळली त्याबद्दल धन्यवाद

साधारणत: महिन्याभरातनंतर आपल्याशी संवाद साधत आहेराज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्य सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत आणि त्यानंतर पुन्हा 31 मे 2021 पर्यंत पुन्हा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...