रविवार, ४ एप्रिल, २०२१

तळमावले : विना मास्क फिरणार्यावर ढेबेवाडी पोलिसांची कारवाई


       फोटो :अनिल देेेसाई कुंभारगाव

तळमावले : ढेबेवाडी विभागात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढु लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन ढेबेवाडी पोलीस विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असुन या कारवाईतुन हजारो रुपयांचा दंड ही वसुल करण्यात येत आहे.विभागात कोरोनाचा स्कोर दररोज वाढु लागला असुन कोरोनाला वेळीच रोखण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला मदत करावी व दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन वारंवार पोलिसांकडुन केले जात असले तरीही काही बहाद्दर हे मोकाटपणे  विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्यानेच या मोकाटविरांना चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने हि मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे.

या मोहिमेंतर्गत आजवर हजारो रुपयांचा दंडही वसुल झाला असला तरी ही काही महाभाग बिनधास्तपणे तळमावले परिसरात विनामास्क फिरत आहेत, हे मोकाटवीरच खरे कोरोना प्रसारक असल्याचे स्पष्ट होत असल्याने पोलीसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासन कारवाई ही लोकांनी व्यवस्थित वागावे यासाठीच करीत असले तरी काहीजण मात्र पोलिस समोर दिसताच तेवढ्यापुरते मास्क लावत आहेत, शनिवार दि. 3 रोजी अचानक  पोलिसांनी मोहिम राबवत एस. टी. बसस्थानक परिसरात फिरुन ट्रॅव्हल्स,वडाप,एस. टी. बस मधील प्रवाशी यांचावर आणि विनामास्क दुकानदारांवर कारवाई करीत त्यांच्याकडुन हजारो रुपयांचा दंडही वसुल केला, या कारवाईत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संतोष पवार साहेब. श्री. पानवळ साहेब. श्री. शेळके साहेब. पोलीस नाईक माने साहेब. लादे साहेब. चार होमगार्ड सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...