पाटण : पाच गवे पडले विहिरीत चार गव्याना जीवनदान तर एकाचा मृत्यु
पाटण :पाटण तालुक्यातील मोरगिरीजवळ धावडी या गावात विहिरीत 5 गवे पडल्याची घटना घडली आहे. वन विभागाने युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवून चार गव्यांना जीवदान दिले. तर त्यातील एका गव्याचा मृत्यू झाला.पाटण तालुक्यातील वनविभागाच्या कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे वन्यजीव प्राण्यांना जीवदान मिळाले असल्याचे माहिती कराड येथील वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली.
धावडी गावातील बाळासाहेब सावंत यांच्या विहिरीत गवे पडले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर वन विभागाची धावपळ उडाली. जागेवर वनक्षेत्रपाल काळे व इतर सर्व कर्मचारी बचाव कार्यासाठी त्वरित घटनास्थळी पोहचले. गवे विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी व क्रेनही मागवण्यात आलीविहीर एका बाजूने जेसीबीने फोडण्यात आली. त्यामुळे गवे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ४ गवे बाहेर पडले आणि पडून गेले. यात दोन माद्या व दोन पिल्ले होती. एक नर गवा पाण्यात बुडन मृत झाला आहे. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ही माहिती दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा