वाझोली : वाझोलीत विविध विकासकासाठी 4.30 कोटीचा निधी मंजूर
तळमावले : महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) मा. नामदार श्री शंभुराज देसाईसाहेब यांनी वाझोली गावासाठी विविध विकासकामे मंजुर करुन कोट्यावधीचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये वाझोली गाव पोहच रस्ता 20 लाख ,वाझोली फाटा ते डाकेवाडी रस्ता 4 कोटी ,ग्रामपंचायत इमारत 10 लाख रु.नवीन वीज पोल इ.कामे मंजुर व पुढील कामे प्रस्तावित आहेत.याबद्दल मा. नामदारसाहेबांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले यावेळी वाझोली गावच्या उपसरपंच सौ.सविता आनंदा मोरे व श्री आनंदा मनोहर मोरे,अध्यक्ष -शालेय व्यवस्थापन कमिटी वाझोली समवेत उपस्थित श्री यशवंत पाटील माजी चेअरमन विकास सोसायटी वाझोली ,अजय मोरे,ग्रामपंचायत सदस्य व ग्राामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाझोली डाकेवाडी सलतेवाडी या गावासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) मा.नामदार श्री शंभुराज देसाईसाहेब यांच्या प्रयत्नातुन कोट्यावधीची अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत आणि पुढेसुद्धा मा. नामदारसाहेबांच्या माध्यमातून विकास कामे करुन,गावचा विकास करुन एक आदर्श गाव करण्याचा आमचा संकल्प आम्ही नामदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुर्ण करुन वाझोली,डाकेवाडी,सलतेवाडी या तीन्ही गावांचा मोठा पाठिंबा मा.नामदारसाहेबांच्या पाठीशी उभा करु अशी ग्वाही आनंदा मनोहर मोरे यांनी दिली यावेळी मा.राजेश चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख ,सरपंच सौ.शितल लोहार,उपसरपंच सौ.सविता मोरे ,माजी सरपंच अशोक मोरे , विकास मोरे. रवींद्र मोरे,
शिवसेना शाखा प्रमुख आनंदा मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा