तळमावले : एकाच गावातील 11 जण कोरोना बाधित
सातारा : जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करोनाचा प्रादूर्भाव कमी जास्त होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा करोनाने शिरकाव केला आहे. काढणे येथील तुपेवाडीतील तब्बल 11 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी व मंगेश खबाले यांनी ही माहिती दिली आहे. एकाच वेळी एकाच गावात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली असून या गावात तळ ठोकत सर्वेक्षण हाती घेतले आहे.
याबाबत आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठ दिवसापूर्वी तुपे वाडी मधील 70 वर्षीय पुरुष व्यक्तीला त्रास होत असल्याने ते कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यानां कोविड ची टेस्ट करा असे सांगण्यात आले त्यांनीं टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यानंतर त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेल्या 18 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल रविवारी रात्री उशिरा येथील आरोग्य विभागाला प्राप्त झाला असता त्यामध्ये तब्बल 11 जणांना करोनाचा प्रादूर्भाव झाला असल्याची बाब उघड झाली. हे सर्वजण एकाच गावातील आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने परिसराचे निर्जंतुकीकरून करून योग्य त्या सूचना दिल्या आहेत यावेळी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संतोष पवार ,तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश गोंजारी व मंगेश खबाले,आरोग्य सहाय्यक .पावरा आरोग्य सेवक रोहित भोकरे ,ग्रामसेवक बी.एस.पवार,पोलीस पाटील सौ.भोसले मॅडम CHO धर्यशील सफकाळ,व्ही.जी.फाळके , स्वप्नी ल कांबळे आशा सेविका योगिता तुपे, सरपंच सूरज चक्के, अजित पाटील, निलेश पाटील ,प्रविण पाटील उपस्थित होते. बाधित असलेल्या सर्व जण होमआयसोलोशन मध्ये आहेत त्याच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा