शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

सातारा ; बेरोजगारासाठी 15, 16 व 17 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा ; बेरोजगारासाठी 15, 16 व 17 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

  सातारा दि. 12 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 15, 16 व 17 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिव जाधव यांनी केले.

                या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा satararojgar1@gmail.com या ईमेलवर आयडीवर संपर्क साधावा असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...