संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 230 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु
बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या आराखडा राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी एकत्रितपणे तयार करुन शासनास सादर करावा.- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
अकोला, दि. २७ : शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्थिरता संपविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा अधिकाधिक उपयोग करत बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या दिशेने वाटचाल करणारा निश्चित संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी एकत्रितपणे तयार करुन शासनास सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्यावतीने ‘संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती-२०२०’ची ४८ वी सभा अकोला येथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती.
ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा प्रतिकुलपती कृषी विद्यापीठे दादाजी भुसे हे होते. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व मानव संसाधन विकास खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची विशेष उपस्थिती होती. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, सहकार, कृषी व मराठी भाषा राज्यमंत्री विश्वजीत कदम व फलोत्पादन, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण, माहिती व जनसंपर्क व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे महासंचालक विश्वजीत माने तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु डॉ. ए. एस. ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. एस.डी सावंत आदी मान्यवरही सहभागी झाले.
आपल्या संबोधनात मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्र बंद करावी लागली पण शेती हे एकच क्षेत्र असे होते जे पूर्णत: खुले राहिले. संपूर्ण जग हे दोन घास अन्नासाठी अथक मेहनत करत असते. त्यांना दोन घास उपलब्ध करून देण्याचं काम बळीराजा शेतकरी करतो, म्हणून त्याचे आपल्यावर ऋण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे.
शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे अशी भूमिका मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना घरी बसून शेतीतील काही कामे करता येतील का? म्हणजे काही गोष्टींसाठी त्याला ‘वर्क फ्रॉम होम’ करता येईल का? याचा विचार संशोधकांनी करावा, यासाठी माहिती तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. शेतीला पाणी देणे, सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करताना शेतकऱ्यांना घरी बसून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था विकसित करता येईल का? असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित करण्याचा प्रयत्न करावा. माहिती तंत्रज्ञान आणि कृषी विभागाने एकत्र येऊन अशा पद्धतीने काम केल्यास महाराष्ट्र या क्षेत्रात दिशादर्शक स्वरूपाचे काम करू शकेल. अतिवृष्टी, पूर, दुष्काळ अशा निसर्गाच्या प्रकोपापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याला स्थिरता देण्यासाठी तंत्रज्ञानाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल, याचा संशोधकांनी अभ्यास करावा, असेही श्री.ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, आपण शेतकऱ्यांना विविध योजनांमधून मदत करतो, अनुदाने देतो. पिकांसाठी हमी भाव देखील देतो. हमीभाव नको पण हमखास भाव मिळावा यासाठी शासन आग्रही आहे. त्यादृष्टीने बाजारपेठ संशोधनाकडे अधिक जागरुकपणे लक्ष देण्याची गरज आहे. माहिती तंत्रज्ञान विभागानेही कृषीमालाला अधिक चांगला भाव मिळण्यासाठी बाजारपेठ संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेचे महत्त्वही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय कृषि कायद्यातील सुधारणा या शेतकरी हिताच्या असाव्यात ही आपली आग्रही भूमिका असून यासाठी केंद्र शासनाने राज्यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठका घेऊन त्यांची मते घ्यावीत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यामध्ये शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, बाजारपेठ क्षेत्रातील तज्ज्ञ यांचीही मते घ्यावीत असेही ते म्हणाले. कृषि क्षेत्रातील अस्थिरता संपवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणणे ही प्राधान्याची बाब असल्याचे स्पष्ट करून कृषि संशोधन हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, चारही कृषि विद्यापीठातून हजारो विद्यार्थी कृषि शिक्षण घेऊन बाहेर पडतात. ते पुढे कोणत्या क्षेत्रात काम करतात, कृषि क्षेत्रातच कार्यरत आहेत की अन्य क्षेत्रात? याचा आढावा कृषि विद्यापीठांनी घ्यावा. यातून आपण विद्यार्थ्यांना खरच उपयुक्त शिक्षण देतो का? हे समजून येईल. काही सुधारणा करावयाच्या असतील तर त्याही स्पष्ट होतील. संशोधकांची बुद्धी, माहिती आणि जैव तंत्रज्ञान, बाजारपेठ संशोधन यामधून शेतकऱ्यांसाठी एक परिपूर्ण संशोधन असलेले प्रॉडक्ट या संशोधन समितीच्या बैठकीत निश्चित केले जावे. शेतीला उद्योगाचा दर्जा देत नाही तोपर्यंत आपले सगळे प्रयत्न पूर्णत्वाला जाणार नाहीत, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्रातील संशोधनात्मक कामांना प्रेरणा देऊन माहिती घेण्यासाठी, त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी दर महिन्याला भेटू. कृषीक्षेत्रातील संशोधन आणि प्रगतीवर चर्चा करू असे सांगतांना त्यांनी विस्कळीत शेती आणि शेतकऱ्यांना संघटित करून काम करण्याची, शेतकरी, शेतमजुरांच्या आरोग्यासाठी योजना आखण्याची, गरजही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.
संशोधनाची दिशा स्पष्ट करणारे सशक्त व्यासपीठ – दादाजी भुसे
कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतपिकांवर होणारे परिणाम ही कृषि संशोधकांसमोरील आव्हानात्मक बाब आहे. या पार्श्वभूमीवर विचारविनिमय घडवून आणून संशोधनाची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे हे सशक्त व्यासपीठ आहे. कापूस आणि सोयाबीन या दोन महत्वाच्या पिकांसाठी गुणवत्ता आणि संख्यात्मकदृष्ट्या अधिक सखोल संशोधन होण्याची गरज आहे. कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असून कृषि विद्यापीठांकडील मोकळ्या जमिनीवर रोपवाटिका, बियाणाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला जावा, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.
श्री.भुसे म्हणाले की, राज्यात अनेक शेतकरी प्रयोगशील आहेत, ते आपापल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेतकऱ्यांची ही जी ‘रिसोर्स बँक’ आहे, त्याची माहिती घेऊन शेतीक्षेत्रातील संशोधनाला अधिक बळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत झालेल्या कृषि संशोधनाचे नेमके काय झाले, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत किती संशोधन पोहोचले याचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘विकेल ते पिकेल’, ही संकल्पना अधिक यशस्वी करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंसमवेत पुन्हा एकदा बैठक घेणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.
कृषीक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा – केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
कृषीक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. ते म्हणाले की, यासाठी कृषीक्षेत्रातील डेटा संकलन परिपूर्ण, अचूक आणि अधिकृत होण्याची गरज आहे. आपल्या विद्यापीठांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे. कोरोना काळात पीपीई कीट, मास्क, व्हेंटिलेटर्स सारखे संशोधन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात झाले. शिवार फेऱ्या काढून शालेय विद्यार्थ्यांच्या कृषि महाविद्यालये, कृषि विद्यापीठांमध्ये भेटी आयोजित कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण होऊन शेतीच्या प्रगतीची बीजे त्यांच्या मनात रुजण्यास मदत होईल. चांगल्या संकल्पना, चांगले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे कृषि संशोधन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या राज्यस्तरीय बैठकीचे स्वागताध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम भाले यांनी प्रारंभी दीपप्रज्वलन करुन डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बैठकीचे प्रयोजन व रुपरेषा स्पष्ट केली.
बैठकीच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक (संशोधन) डॉ. व्ही. के. खर्चे यांचेसह सर्व संचालक, कुलसचिव आणि बैठकीचे यशस्वितेसाठी गठित विविध समिती अध्यक्ष, सहअध्यक्ष, सचिव तथा सदस्य तसेच कृषी, फलोत्पादन, मृद व जलसंधारण, वन विभाग, महाबीज असे शेतीशी संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथील जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आभार मानले.
पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन बैठकीत राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पिक वाणे, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारसी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा व सुधारणांसह प्रसारित करण्यात येणार आहेत. यावर्षी चारही कृषि विद्यापीठांमधून एकूण २०८ शिफारसी या बैठकीमध्ये सादर होणार आहेत. यामध्ये १६ पिक वाण, १२ यंत्रे व अवजारे तर १८० पिक उत्पादन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता ही बैठक ऑनलाइन पद्धतीने होत आहे.
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 187 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.27 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 187 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील रविवार पेठ 1, गोडोली 3, शाहुपुरी 2, शाहुनगर 1, प्रतापगंज पेठ 1, करंजे पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, गडकर आळी 1, विसावा नाका 1, संगमनगर 1, मत्यापूर माजगाव 1, बोरखळ 2, गजवडी 1, बोरगाव 1, सर्जापूर 1, किडगाव 1, मालगाव 1, देगाव 1, जकातवाडी 1, देगाव फाटा 1, किन्ही 2, वाढे 1, नागझरी 1, पिंपळवाडी 1, .
कराड तालुक्यातील कराड 11, मंगळवार पेठ 1, विद्यानगर 1, कोळे 1, आगाशिवनगर 1, चरेगाव 1, किन्हई 1, कार्वे नाका 2, तळबीड 1, येळगाव 1, येरवळे 1, शेरे 2, घोगाव 1, मलकापूर 1, गोंदी 1, .
फलटण तालुक्यातील फलटण 1, गोळीबार मैदान 1, हिंगणगाव 1, ताथवडा 9, मठाचीवाडी 1, तरडफ 1, बिबी 1, ढवळ 1, साखरवाडी 2, शिंदेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, विढणी 1, निरगुडी 3, खटकेवस्ती 2= .
वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, सुरुर 1, पसरणी 3, धोम 3, भुईंज 1, आसले 1. .
महाबळेश्वर तालुक्यातील .
खटाव तालुक्यातील वडूज 8, सिध्देश्वर कुरोली 2, गोपूज 1, वर्धनगड 1, नेर 1, विसापूर 2, पुसेगाव 2, सिध्देश्वर 1, कुरोली 1, मायणी 1, .
माण तालुक्यातील बिदाल 1, म्हसवड 5, दहिवडी 4, विरकरवाडी 1, शेवारी 1, खाटलवस्ती 1, .
खंडाळ तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 3, खंडाळा 4, अहिरे 1, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, रहिमतपूर 4, एकसळ 1, कुमठे 2, वाठार किरोली 5, शिरंबे 2, निढळ 1, ल्हासुर्णे 1, अनपटवाडी 1. .
पाटण तालुक्यातील पाटण 1, पांढरवाडी 1, साइर्कडे 1, खाबळवाडी 1, गारवडे 1, मारुल हवेली 1, अबदारवाडी निझरे 1. .
जावली तालुक्यातील मेढा 2, गंजे 1, बेलवडे 1, खर्शी 1, ओझरे 5, शेटे 1, आगलावेवाडी 4, कुडाळ 1. .
इतर पिंपरी 1. .
बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1. .
6 बाधितांचा मृत्यु .
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पसरणी ता.
तळमावले ; ‘धसका’ शाॅर्टफिल्म करतेय कोरोनाविषयक जनजागृती
रविवार, २५ ऑक्टोबर, २०२०
*सातारा ; जिल्ह्यातील 190 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;5 बाधितांचा मृत्यु*
मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 209 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 11 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.20 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 209 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 10, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, करंजे 2, सदरबझार 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 3, संगमनगर 2, धोंडेवाडी 1, क्षेत्र माहुली 1, धोंडेवाडी कामेरी 1, चिंचणेर 2, पिंपवडे 1, नवीन एमआयडीसी सातारा 2,कृष्णानगर सातारा 2, खेड 4, भाटमरळी 1, रामाचा गोट सातारा 1, कोडोली 1, दिव्यनगरी सातारा 1, वडगाव 1, .
कराड तालुक्यातीलकराड 5, सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 1, बाहेर 1, नेरले 1, जुलेवाडी 1, कालवडे 1, तुरुख 1, सैदापूर 3, मसूर 3, मलकापूर 4, मालखेड 2, काशारशिरंबे 1, नंदलापूर 2, आटके 1, घारेवाडी 2, उंडाळे 2, विद्यानगर 2, उंब्रज 4, वाकेश्वर 1, आगाशिवनगर 4, हेळगाव 1, .
फलटण तालुक्यातील फलटण 1, विढणी 1, निंबोरे 5,वाठार निंबाळकर 5, निरगुडी 1, हिंगणगाव 1, जावली 1, झिरपवाडी 4, साखरवाडी 1, शिंदेनगर 3, मालेवाडी 1, .
वाई तालुक्यातील किकली 1, उडतारे 2, खानापुर 1, सिद्धनाथवाडी 1, व्याहळी 1, .
पाटण तालुक्यातील नाटोशी 1,पाटण 1, मारुल हवेली 1, निसरे 1, .
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, .
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पागचणी 1, .
खटाव तालुक्यातील खटाव 5, पुसेगाव 7, काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, मायणी 5, वडूज 3, त्रिमाली 1, भुरकवाडी 1, धारपुडी 1, .
माण तालुक्यातील म्हसवड 3, बिदाल 1, पिंगळी बु 1, तुपेवाडी 1, गोंदवले बु 1, .
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, संभाजीनगर हौसिंग सोसायटी कोरेगाव 1, कुमठे 1, दुर्गळवाडी 1, वाठार 1, रहिमतपूर 6, अंबवडे 1, वाठार किरोली 3, तरडुलवाडी 1, देवूर 1, वाठार स्टेशन 1, पळशी 2, धामणेर 2, तांदूळवाडी 1 .
जावली तालुक्यातील ओझरे भणंग 1, मालचौंडी 11, केंडांबे 1, सोमार्डी 1, केंजळ, अंबवडे 1, खर्शी 1, .
इतर 1, .
बाहेरील जिल्ह्यातील खाडवडीवाडी ता.शिराळा 1, इस्लामपूर 1, हातकलंगले 1,
#11 बाधितांचा मृत्यु #
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वावरहिरे ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भक्तवाडी ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय महिला, तारगाव ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, विविध खासगी हॉस्पीटलमध्ये घारेवाडी ता. कराड येथील 67 वर्षीय महिला, खेड बु ता. खंडाळा येथील 90 वर्षीय पुरुष, गंजे ता. जावली येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले शनिवार पेठ, कराड येथील 67 वर्षीय पुरुष, म्हासुर्णे ता. खटाव येथील82 वर्षीय पुरुष, जैतापूर ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, अटके ता. कराड येथील 66 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --173366
*एकूण बाधित --43865 *
*घरी सोडण्यात आलेले --37308 *
*मृत्यू --1449 *
उपचारार्थ रुग्ण-5108
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
तळमावले ; ‘स्पंदन’ चा निर्धार गरजू विद्याथ्र्यांना ‘आधार’
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; पालकमंत्र्यांकडून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी ;कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 1420 हेक्टर वरील पिकांचे नुकसान
*सातारा ; नवरात्रौत्सव साजरा करण्याबाबतच्या नियमावलीसंदर्भात जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश जारी*
सातारा ; जिल्ह्यातील 268 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु
#प्लाझमा_दाते_व्हा.. !! " प्लाझमा थेरीपी "हा एक उपचार आहे. नेमकी काय आहे ही प्लाझमा थेरीपी यावर प्रकाश टाकणारा हा लेख आवश्य वाचा
बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 354 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु
कुंभारगाव ; कोरोना महामारीच्या संदर्भात विद्यार्थ्यां कडुन जनजागृती उपक्रम
कुंभारगाव / प्रतिनिधी
कुंभारगाव ता.पाटण - कोरोनाच्या महामारी संदर्भात जनजागृती उपक्रमातुन विद्यार्थ्यांनी छोट्या नाटीकेतुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कसे करावे व कोरोनाची विनाकारण भिती बाळगु नये तसेच पोस्टरच्या माध्यमातून विविध घोषणा तयार करूून जनजागृती करण्यात आली.देवाशिष चव्हाण व जयराज चव्हाण यांनी डायलॉग ची रचना केली आहे।या उपक्रमाला प्रा. सचिन पुजारी.(के.सी.कॉलेज तळमावले ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जगभरात मोठ्या ताकदीने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमात कोवीड-१९ प्रतिबंधात्मक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या म्हणी लिहून, ग्रामस्थांना जनजागृती बाबत संदेश देण्यात आला. यामध्ये कोरोनाला हरवा भारत जिंकवा,घरात रहा सुुुरक्षित राहा, सुरक्षित अंतर ठेवा, कोरोला दूर सारा. नको आता हस्तांदोलन, नको आता गळा भेट, नाहीतर कोरोना येईल आपल्या घरी थेट. वापरा मास्क होईल सुरक्षा, बरे आहे ते कोरोना पेक्षा, आवश्यकता नसल्यास घरा बाहेर जाणे टाळा, तरच बसेल कोरोनाला आळा. फक्त एकच नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. नका देऊ हातात हात, पसरत आहे कोरोनाची साथ, झाला जर खोकला सर्दी, प्रकर्षाने टाळा गर्दी. होणार नाही मला काही, असा करू नका गर्व, शासनाला सहकार्य करू मिळून सर्व. हस्तांदोनाला दूर सारा, हाथ जोडून नमस्कार करा. गर्दीमध्ये जाणे टाळा, कोरोनाला बसेल आळा. तोंडाला मास्क, रुमालाने झाकुया, कोरानाला हाकलुन लाऊया. नको नाका तोंडास स्पर्श, कोरोनाचा टळेल दंश. वारंवार हात स्वच्छ करू, कोरोनाला दुर सारु.
नको कोठेही खोकु,शिंकु, थुंकू, कोरोना विरुध्द युध्द जिंकु. असे म्हणीच्या पोस्टर्सच्या आधारे ग्रामस्थांना संदेश देण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी कु.जयराज उमेश चव्हाण - इयत्ता ७ वी,कु. देवाशिष यशवंत चव्हाण - इयत्ता ३ री,कु.गार्गी उमेश चव्हाण - इयत्ता ३री,कु.श्रुतिका श्रीराम जोशी - इयत्ता ६ वी,कु.प्रेरणा सुरेश पांढरपट्टे - इयत्ता ५ वी हे विद्यार्थी श्री.लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगाव, ता.पाटण आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव,ता. पाटण मध्ये शिकत आहेत.या उपक्रमाबद्द्ल ग्रामस्थ सर्व मुलांचे कौतुक करत आहेत.
मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 242 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु
तळमावले ; डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘समाज स्पंदनाची पत्रे’ पुस्तकाचे प्रकाशन
अभिनेत्री अश्विनी महांगडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार वेगळ्या भूमिकेत
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०
लाळ खुरकत रोगाच्या समुळ उच्चाटनासाठी गायवर्ग व म्हैसवर्ग जनावरांना टॅगिंगसह लसीकरण करावे - जिल्हाधिकारी शेखर सिंह
सातारा ; जिल्ह्यातील 223 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 10 बाधितांचा मृत्यु
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
कुंभारगाव ; युवा नेते मा.यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वाटल्या वह्या
कुंभारगाव / वार्ताहर
कुमजाई पर्व Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- युवा नेते मा.यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कुंभारगाव शाळा नं.3 मध्ये मा.प.स.सदस्य पाटण श्री.रघुनाथ माटेकर यांच्या हस्ते वह्या आणि खाऊ आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून व सामाजिक -आंतर ठेवून व समाजभान जपत शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुंभारगाव भागातील मा.प.स.सदस्य पाटण श्री.रघुनाथ माटेकर यांनी पुढाकार घेतला होता.त्यांचा कायम या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजन करण्यासाठी पुढाकार असतो. त्यांनी श्री यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
या प्रसंगी पंचायत समिती पाटण माजी सदस्य श्री रघुनाथ माटेकर,श्री दिलीप घाडगे, श्री केशवशेठ माटेकर,श्री प्रकाशशेठ बोत्रे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सातारा ; जिल्ह्यातील 316 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 18 बाधितांचा मृत्यु*
शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०
लोकनेत्यांची तिसरी पिढीही जोपासतेय सामाजिक बांधिलकी ; पणतू यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप
*सातारा ; जिल्ह्यातील 314 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 14 बाधितांचा मृत्यु*
शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 सातारा जिल्हा केंद्रावरील उपकेंद्रात बदल
साताऱ्यातील कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्नकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, हात धुणे, अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करू या --- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसातारा जिल्ह्यासाठी 45.59 कोटी एवढा निधी दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
सातारा ; जिल्ह्यातील 345 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 13 बाधितांचा मृत्यु
गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 441 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 19 बाधितांचा मृत्यु। बादितांची संख्या कमी होत असली तरी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट होत नसल्यामुळे जिल्ह्यातील चिंता वाढत आहे.
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...