तळमावले दि.10 पाटण सारख्या दुर्गम डोंगरी भूकंपप्रवन तालुक्यात ग्रामीण जनतेच्या दुःखात आडीआडचणीत धाऊन जाऊन मदतीच्या व आधाराचा हात घेऊन पुन्हा जनतेच्या मनात उभारी निर्माण करून उभे करण्याचे कार्य महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यापासून त्यांची तिसरी पिढी म्हणजे ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजीव मा.यशराज देसाई हेही करत आहेत.
आज दि.10 ऑक्टोबर मा.यशराज देसाई यांचा वाढदिवस पण या तरूणाईने मंत्रीपुत्र ही बिरुदावली न मिरवता लोकनेत्यांचा वैचारीक वारसा जपत वाढदिवस डामडौलात न करता आपला वाढदिवसाचे औचित्य साधून त्यातून ग्रामीण डोंगराळ भागातील गरजू व गरीब विध्यार्थीना साहित्याविना शैक्षणिक अडसर निर्माण होऊ नये म्हणून वह्या वाटपाचे नियोजन केले.
त्यानुसार काळगाव प.स.गणातील विध्यार्थीना वह्या वाटपाचा कार्यक्रम पाटण प.स.विरोधी पक्षनेते मा.पंजाबराव देसाई (तात्या) यांच्या हस्ते व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विभागातील करपेवाडी,काळगाव,धामणी, पवारवाडी व मत्रेवाडी या ठिकाणी मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून व सामा-आंतर ठेवून व समाजभान जपत शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मा.पंजाबराव देसाई यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधत मा.लोकनेत्यांना शैक्षणिक साहित्यासाठी जी परिस्थिती होती ती तालुक्यातील विद्यार्थ्यांना येऊ नये व या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडसर येऊ नये या उद्देशाने लोकनेत्यांच्या तिसरी पिढी यशराज देसाई यांच्या रूपाने समाजकारणात सक्रीय होत असून तालुक्याच्या शैक्षणिक दूष्टया हे एक सुचिन्ह असून डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांमध्ये उमेद निर्माण करण्याचे कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
मा.ना.शंभूराज देसाई हे कोरोना काळात जनतेस कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर अहोरात्र कार्यरत असून जनतेची काळजी घेत आहेत तर
त्यांचे चिरंजीव उद्याचे सुजाण नागरिक असणारे शालेय विद्यार्थीच्या अडचणी लक्षात घेऊन वह्या वाटपाचा संकल्प करून समाजोपयोगी वाढदिवस साजरा करत आहेत वह्या वाटपाचा लाभ विभागातील 50 शाळातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यासाठी मा.पंजाबराव देसाई यांनी नेटके नियोजन केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले असून पालक वर्गातुन मा.यशराज देसाई यांना आशीर्वादरुपी शुभेच्छा व कार्याचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा