कुंभारगाव / वार्ताहर
कुमजाई पर्व Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- युवा नेते मा.यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद कुंभारगाव शाळा नं.3 मध्ये मा.प.स.सदस्य पाटण श्री.रघुनाथ माटेकर यांच्या हस्ते वह्या आणि खाऊ आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून व सामाजिक -आंतर ठेवून व समाजभान जपत शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुंभारगाव भागातील मा.प.स.सदस्य पाटण श्री.रघुनाथ माटेकर यांनी पुढाकार घेतला होता.त्यांचा कायम या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजन करण्यासाठी पुढाकार असतो. त्यांनी श्री यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
या प्रसंगी पंचायत समिती पाटण माजी सदस्य श्री रघुनाथ माटेकर,श्री दिलीप घाडगे, श्री केशवशेठ माटेकर,श्री प्रकाशशेठ बोत्रे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा