कुंभारगाव / प्रतिनिधी
कुंभारगाव ता.पाटण - कोरोनाच्या महामारी संदर्भात जनजागृती उपक्रमातुन विद्यार्थ्यांनी छोट्या नाटीकेतुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन कसे करावे व कोरोनाची विनाकारण भिती बाळगु नये तसेच पोस्टरच्या माध्यमातून विविध घोषणा तयार करूून जनजागृती करण्यात आली.देवाशिष चव्हाण व जयराज चव्हाण यांनी डायलॉग ची रचना केली आहे।या उपक्रमाला प्रा. सचिन पुजारी.(के.सी.कॉलेज तळमावले ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जगभरात मोठ्या ताकदीने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमात कोवीड-१९ प्रतिबंधात्मक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या म्हणी लिहून, ग्रामस्थांना जनजागृती बाबत संदेश देण्यात आला. यामध्ये कोरोनाला हरवा भारत जिंकवा,घरात रहा सुुुरक्षित राहा, सुरक्षित अंतर ठेवा, कोरोला दूर सारा. नको आता हस्तांदोलन, नको आता गळा भेट, नाहीतर कोरोना येईल आपल्या घरी थेट. वापरा मास्क होईल सुरक्षा, बरे आहे ते कोरोना पेक्षा, आवश्यकता नसल्यास घरा बाहेर जाणे टाळा, तरच बसेल कोरोनाला आळा. फक्त एकच नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. नका देऊ हातात हात, पसरत आहे कोरोनाची साथ, झाला जर खोकला सर्दी, प्रकर्षाने टाळा गर्दी. होणार नाही मला काही, असा करू नका गर्व, शासनाला सहकार्य करू मिळून सर्व. हस्तांदोनाला दूर सारा, हाथ जोडून नमस्कार करा. गर्दीमध्ये जाणे टाळा, कोरोनाला बसेल आळा. तोंडाला मास्क, रुमालाने झाकुया, कोरानाला हाकलुन लाऊया. नको नाका तोंडास स्पर्श, कोरोनाचा टळेल दंश. वारंवार हात स्वच्छ करू, कोरोनाला दुर सारु.
नको कोठेही खोकु,शिंकु, थुंकू, कोरोना विरुध्द युध्द जिंकु. असे म्हणीच्या पोस्टर्सच्या आधारे ग्रामस्थांना संदेश देण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी कु.जयराज उमेश चव्हाण - इयत्ता ७ वी,कु. देवाशिष यशवंत चव्हाण - इयत्ता ३ री,कु.गार्गी उमेश चव्हाण - इयत्ता ३री,कु.श्रुतिका श्रीराम जोशी - इयत्ता ६ वी,कु.प्रेरणा सुरेश पांढरपट्टे - इयत्ता ५ वी हे विद्यार्थी श्री.लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगाव, ता.पाटण आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगाव,ता. पाटण मध्ये शिकत आहेत.या उपक्रमाबद्द्ल ग्रामस्थ सर्व मुलांचे कौतुक करत आहेत.
कोरोना योद्धे सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन खूप अभिमान वाटला
उत्तर द्याहटवा