बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

सातारा ; भिक्षेकरी ग्रहास राणू आक्का फेम अश्विनी महागंडे यांनी दिली भेट

भिक्षेकरी ग्रहास राणू आक्का फेम अश्विनी महागंडे यांनी दिली भेट
●स्वच्छतेबाबत केले कौतुक
●भिक्षेकरी ग्रहाच्या प्रागंणात पांढऱ्या चाफ्याचे वृक्षारोपण
सातारा
प्रतिनिधी
जिल्ह्यात सातारा येथे पुरुष भिक्षेकरी ग्रह आहे.या गृहात असलेल्या भिक्षेकरी स्वतः व्यवस्थित राहून शेती काम करतात.इतर कामे करतात.त्या भिक्षेकरी ग्रहास राणू आक्का फेम अश्विनी महागंडे यांनी भेट दिली.भिक्षेकरी गृहात असलेली स्वच्छता नेटकेपणा पाहून कौतुक केले.त्यांच्या हस्ते पांढऱ्या चाफ्याचे झाड लावण्यात आले.
सातारा येथील सदरबाजार परिसरात भिक्षेकरी गृहात 72 भिक्षुक राहतात.भिक्षुक शेतीकाम करतात.चांगली टापटीप व स्वच्छता राखून ठेवण्यात आली आहे.अधीक्षक शिवाजी खुडे हे काम पहात आहेत. राणू अक्का फेम अभिनेत्री अश्विनी महागंडे यांनी महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांना जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाची माहिती विचारली त्यावर त्यांनी भिक्षेकरी ग्रहाची ही माहिती सांगितली होती.त्यांनी या भिक्षेकरी ग्रहाला भेट देऊन तेथील भिक्षुक यांच्याशी सवांद साधत तेथील स्वच्छतेबाबत कौतुक केले.भिक्षेकरी ग्रहाची माहिती अधीक्षक शिवाजी खुडे यांनी दिली तर पांढऱ्या चाफ्याचे झाड लावण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...