शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

मानेगाव : लाॅकडाऊन मध्ये गवसली ‘करियर’ची वाट

मानेगाव : लाॅकडाऊन मध्ये गवसली ‘करियर’ची वाट

काळगांव/डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून
कोरोनाच्या महामारीमुळे 23 मार्च, 2020 ला संपूर्ण देश लाॅकडाऊन झाला आणि सर्व काही जागीच ठप्प झाले. ‘न भूतो भविष्यति’ असा हा कालावधी होता. सर्वच क्षेत्रातील व्यवहार, उद्योग यावर याचा परिणाम झाला. इ.10 वी चा भूगोलाचा पेपरही यामुळे होवू शकला नाही.
पाटण तालुक्यातील मानेगांव येथील कु.मयुरी अरविंद कराळे या मुलीचाही 10 वी चा पेपर झाला नाही. लाॅकडाऊनमुळे सर्वच ठप्प असताना, भविष्य अंधकारमय झाले असताना कु.मयुरी शेजवळ या मुलीने आपली करियरची वाट स्वतःहून शोधली. इयत्ता 10 वी च्या शिक्षणानंतर थेट कला क्षेत्रातील कोर्स कडे वळण्याचा निर्णय तिने ठामपणे घेतला आहे.
कु.मयुरी शेजवळ ही मुलगी श्री वाल्मिकी विद्यामंदीर तळमावले येथे इ.10वी मध्ये शिकत होती. नुकत्याच लागलेल्या 10 वी च्या निकालामध्ये तिने प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. मयुरीच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे मयुरीने आपल्या घरकामात आईवडीलांना मदत करायला सुरुवात केली. त्यानंतरही उरलेल्या वेळेत काय करायचे. असा विचार तिच्या डोक्यात आला. त्यावेळी तिने आपल्यातील अंगभूत कलेला चालना देण्याचा निश्चय केला.
शेतातील वारुळाची माती आणून तिने आकर्षक, सुबक अशा गणेशमुर्ती तयार केल्या आहेत. मुळात हे करताना तिने कोणत्याही प्रकारचा साचा वापरलेला नाही. स्वतःच्या कल्पनेतून या मूर्ती साकारल्या आहेत. घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या कलेचा वारसा नसताना तिने केलेल्या मुर्ती सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरत आहेत. सुमारे 10 मुर्ती तिने तयार केल्या आहेत. प्रत्येक मुर्ती ही वेगवेगळया स्वरुपाची आहे. वारुळाच्या मातीपासून तयार केलेल्या या मुर्ती ती पाण्याच्या रंगात रंगवणार असल्यामुळे पर्यावरण पुरक मुर्ती तयार झाल्या आहेत.
शाळेत असताना तिने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा चांगल्या ग्रेडनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तसेच चित्रकला आणि इतर स्पर्धांमध्ये देखील शालेय पातळीवर बक्षीसे मिळवली आहेत. घराच्या दरवाजावरदेखील तिने आपली कलेची मोहोर उमटवली आहे. सामान्य परिस्थिती असलेल्या
घरात कु.मयुरी कराळे हिचा जन्म झाला आहे. वडील अरविंद कराळे खाजगी बसवरती चालक म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. लाॅकडाऊनच्या काळात फावल्या वेळेचा तिने चांगला सदुपयोग केलेल्या मुर्ती पाहून तिच्या कुटूंबियांचा ऊर आनंदाने भरुन येत आहे.
10 वी नंतर थेट कलाविषयक शिक्षण क्रमासाठी मी प्रवेश घेणार आहे, त्यासाठी कला महाविद्यालयाकडे संपर्क साधला असून मला भविष्यात चांगला कलावंत व्हायचे आहे, त्यासाठी मी मेहनत घ्यायला तयार आहे अशी प्रतिक्रिया कु.मयुरी कराळे हिने बोलताना व्यक्त केली आहे.
संकटातही संधी शोधता येते असे म्हणतात. हे वाक्य मयुरीने आपल्या कृतीतून दाखवले आहे. लाॅकडाऊनच्या काळात मयुरी कराळे या मुलीने पर्यावरणपुरक गणेशमुती साकार करत आपल्यातील कलेची चुणूक दाखवली आहे. शिवाय  आपल्या करियर च्या वाटेला गवसणी घातली आहे. असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...