मंगळवार, ५ मे, २०२०

कुंभारगाव :- एक घास मुक्या प्राण्यासाठी...मान्याच्यावाडीतील तरुणांची भूतदया

पाटण :- 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा सोडून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे सगळ्यांचेच हाल झाले. यातून मनुष्य पण सुटला नाही तर मुक्याप्राण्यांचे तरी काय,आज ग्रामीण भागात वानराचे प्रमाण अधिक आहे.सध्या शेतीमध्ये त्यांना खायला काही नाही त्यामुळे वानराचे कळप मानवी वस्तीकडे वाटचाल करीत आहेत पण लॉकडाऊनमध्ये मनुष्य प्राण्याचे जेवढे हाल झाले त्यापेक्षा मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत.मनुष्य तरी आपणास काय हवे आणि काय नको हे सांगू शकेल पण मुके प्राणी कोणाला सांगणार, अशी त्यांची स्थीती आहे.
पण यासाठी पाटण तालुक्यातील कुंभारगाव मान्याच्यावाडीतील युवक पुढे आले असून एक घास मुक्या प्राण्यांसाठी म्हणत गंगाराम माने,शशिकांत माने,राजेंद्र माने.
यांच्या ग्रुपचे जवळपास दहा ते पंधरा युवक जिथे दिसतील तिथे ह्या वानर प्राण्याच्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत.
गंगाराम माने आणि त्याचे सहकारी यांना पूर्वीपासून समाज कार्याची आवड आहे. त्यामुळे अनेक गरीब व गरजूंना ते नेहमीच मदत करत असतात.अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेत असतात. 

अनोख्या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक.......

युवकांच्या या अनोख्या मोहिमेमुळे गावातील अनेक नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. तर काही नागरिकही या कामात मदतीसाठी पुढे येत आहेत. या युवकांची प्रेरणा घेऊन आणखीही काही युवकांनी पुढे यावे त्यातून मुक्या प्राण्यांना या कसोटीच्या दिवसात पोटभर अन्न मिळेलच तसेच मनुष्य प्राण्याप्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार मिळेल, हा त्याच्या मागचा आमचा उद्देश असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गंगाराम माने यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...