रविवार, ३ मे, २०२०

पाटण ;- होम कॉरंटाईनचा शिक्का असूनही फिरणाऱ्या सरपंचांचा विडिओ व्हायरल

पाटण : दि.३ मे कुमजाई पर्व

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकार विविध उपाययोजनाद्वारे आळा घालण्याचे प्रयत्न करत आहे; मात्र असे असतानाच काही जणानांकडून त्याला छेद देण्यात येत आहे. असाच काहीसा प्रकार पाटण तालुक्यातील गलमेेेवाडी येथे घडला आहे सक्तीचे होम कॉरंटाईन केलेल्या रुग्णाकडून झाल्याचे पाहायला मिळाले. 

धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून गलमेवाडी गावचे सरपंचच आहेत.सरपंचांकडे गावचे पालकत्व असते. म्हणूनच गावच्या सुरक्षेची जबाबदारी सरपंचावर असते पोलीस पाटील, सरपंच यांच्या मदतीने ग्रामदल स्थापन करुन, त्यांच्याकडून बाहेर गावाहून येणार्‍यांवर नजर ठेवली जात आहे.पण सरपंच महाशयांना आपली जबाबदारी समजलेली नाही असे दिसते.गावातील काही ग्रामस्थांनी त्याचे व्हिडिओ शुटिंग केले आणि काही वेळात हा व्हिडिओ कुंभारगाव परिसरात व्हायरल झाला आहे.त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार की नाही अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...