शनिवार, ९ मे, २०२०

कराड येथील एक कोरोना बाधित; 101 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह 172 नागरिक विलगीकरण कक्षात


  सातारा दि. 9 : पारले कोविड केअर सेंटर कराड येथे दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19)  आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
101 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2 महिला पोलीसांसह इतर 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 49, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 व ग्रामीण रुग्णालय वाई येथील 9 असे एकूण 101 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
172 नागरिकांना केले विलगीकरण कक्षात दाखल 
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 106,  ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 14 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 27 असे एकूण 172 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
कोविड बाधित रुग्णांच्या 14 दिवसानंतरचे 17 नमुने तसेच वरील 172 जणांचे  घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 116 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 94, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 20, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2  रुग्ण  आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...