कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचवणाऱ्यांना वठणीवर आनण्यासाठी कायद्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार. तर सर्वसामान्य नागरीक व पोलिस कर्मचारी यांच्याबरोबर थेट संपर्क साधुन, परिसरातील उद्योगधंद्यांसह सर्वसामान्य नागरीकांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असे मत मा. उत्तमराव भजनावळे (API - सहाय्यक पोलीस निरीक्षक ,ढेबेवाडी पोलीस ठाणे ता पाटण) यांनी झेप अंकास दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले
वांग खोर्यात असलेले हे एकमेव सिनियर कॉलेज आहे.शैक्षणिक वर्ष सन २०१८ - २०१९ हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले .संस्थेचे ब्रीद ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार’वाक्यानुसार कॉलेजची वाटचाल चालली आहे, अध्यापना बरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक ,सहकार , कला व क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपले यश संपादीत केले आहे सुसंस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्ययन व अध्यापन ज्या काही मोजक्या महाविद्यालयांत केले जाते त्यात काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे नाव आग्रक्रमाने घ्यावे लागेल.असे गौरवउद्धगार मा.भजनावळे यांनी व्यक्त केले .
काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले ता. पाटण। शैक्षणिक वर्ष २०१९ - २०२० च्या कॉलेजच्या झेप अंकासाठी भजनावळे साहेबांची मुलाखत घेण्यात आली . प्रा.महेश चव्हाण (सिनिअर विभाग -प्रकल्प अधिकारी , राष्ट्रीय सेवा योजना )प्रा सचिन पुजारी (सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना ) यांनी ही मुलाखत घेतली त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सडेतोड आणि दिलखुलासपणे दिली.या मुलाखतीत मा.भजनावळे यांनी आपलं बालपण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, पोलीस क्षेत्रातील अनुभव आणि सध्या चाललेल्या राजकीय, सामाजिक,व शैक्षणिक परिस्थितीवर आपले मनोगत व्यक्त केले.
या मुलाखतीसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ .सतिश घाटगे सरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले
या अंकाचे प्रकाशन एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
अशी माहिती प्रा.पुजारीसर यांनी दिली.
1 ch no
उत्तर द्याहटवा