त्यानंतर म्हात्रे यांनी कामोठे पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेला प्रकार पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. त्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास रात्रीचे १२ वाजतील, असे सांगितले आणि अकारण बदनामी होईल, असा आगाऊ सल्लाही दिला.
त्यानंतर म्हात्रे यांना फिर्याद देण्यासाठी तीन अधिकाऱ्यांच्या कक्षाकडे धाव घ्यावी लागली. रस्त्यात महिला असुरक्षित आहे, याचा अनुभव आल्यानंतर म्हात्रे यांची हतबलता लपू शकली नव्हती. परंतु पोलिसांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे म्हात्रे यांच्या संतापात भर पडली. त्यामुळे त्यांनी फिर्याद दाखल न करताच घर गाठले.
सोमवारी पोलीस ठाण्यातून कोणताही संपर्क न साधला गेल्यामुळे दुपारी म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांसमोर आग्रह धरला. त्यानंतर कामोठे पोलिसांनी दुपारी दीड वाजता सभापती म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन अनोळखी चोरटय़ांविरोधात गुन्हा नोंदवला.
चोरीपेक्षा अधिक संवेदनशील गुन्हा नोंदवला जात असेल
असे काही घडलेले नाही. उलट घटना समजल्यावर तातडीने घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठविण्यात आले. घटनास्थळी असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचे काम सुरू आहे. म्हात्रे ठाण्यात आल्या तेव्हा अन्य एक गंभीर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. महिला पोलीस अधिकारी कदाचित चोरीपेक्षा त्याहून संवेदनशील गुन्हा असल्याने त्यात व्यग्र असाव्यात. उलट म्हात्रे यांनी थकल्याचे कारण देत दुसऱ्या दिवशी फिर्याद देते, असे सांगून त्याप्रमाणे मंगळवारी तक्रार दाखल केली. चोरटय़ांना पकडण्याचे काम सुरू आहे, असे कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी सांगितले.
थांबा, बसा, आम्हाला इतर गुन्हे आहेत, हेच एक काम आहे का, त्या अधिकाऱ्यांना शोधा अशी उत्तरे पोलिसांकडून कधीच अपेक्षित नसतात. सोन्याची चोरी ही घटना हादरवणारी आहेच, पण त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या उत्तरांमुळे संतापात अधिकच भर पडली आहे.
-कुसुम म्हात्रे, नगरसेविका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा