कराड प्रतिनिधी :-
कोयना परिसरात पर्यटनाला चालना मिळून त्या परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, धरण परिसरातील गावांसाठी दळणवळणाचा मार्ग खुला व्हावा या उद्देशाने कोयना धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात धरणाच्या सुरक्षेची काळजी घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
कोयना धरण जलवाहतुकीसंदर्भात विधान भवनात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या वेळी श्री. पवार म्हणाले, ""कोयना धरणाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याची काळजी घेऊन धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार व्हावा. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गृह, जलसंपदा, वन विभागाच्या समन्वयाने अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जलवाहतुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना, त्यासाठीचे अंतर ठरविताना प्रथम धरणाच्या सुरक्षेचा विचार करावा.''
सध्या असलेली जेटी पोलिस पेट्रोलिंगसाठी योग्य असून, जलवाहतुकीसाठी नवीन जेटीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून जागा निश्चित करावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.कोयना धरण जलवाहतुकीसंदर्भात विधान भवनात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, कायदा सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या वेळी श्री. पवार म्हणाले, ""कोयना धरणाच्या सुरक्षेला बाधा येणार नाही, याची काळजी घेऊन धरणात जलवाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार व्हावा. यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गृह, जलसंपदा, वन विभागाच्या समन्वयाने अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जलवाहतुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना, त्यासाठीचे अंतर ठरविताना प्रथम धरणाच्या सुरक्षेचा विचार करावा.''
देसाई- पाटणकर बैठकीस एकत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीस राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर हे उपस्थित होते. अनेक वर्षांनंतर पाटणच्या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यामुळे या बैठकीबाबत पाटण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा