गुरुवार, १२ मार्च, २०२०

कुंभारगाव,मान्याचीवाडी ; जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम संपन्न

 
मान्याचीवाडी,कुंभारगाव प्रतिनिधी 
 जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 372 वा सदेह वैकुंठ गमन बीज सोहळा बुधवारी येथे संपन्न झाला. या सोहळ्यात परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते.

पाटण तालुक्यातील कुंभारगाव,मान्याचीवाडी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी यांच्याकडून गावात भव्य शोभायात्रा कार्यक्रम करून पार पडला. सामुदायीक गाथा पारायण सोहळा वर्षे ३२वे पुर्ण झाले ह्या सोहळ्यासाठी गावात हजारोंच्या संख्येने नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा आणि तुकाराम गाथा  पालखीत घेऊन महाराजाच्या नामाचा गजर करत गावातून पायी  दिंडीमिरवणूक काढण्यात आली.
ह.भ.प.नाना महाराज गोफणे यांचे 
काल्याचे कीर्तन आणि तदनंतर महाप्रसादने 
सहप्ताची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...