तळमावले प्रतिनिधी :-
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.
रक्तदान काळाची गरज आहे याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने तळमावले व्यापारी असोसिए न आणि भवानी प्रतिष्ठान महालक्ष्मी ब्लड बँक कराड यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.२७ मार्च शुक्रवार स्थळ ; बळवंत व्यापारी संकुल कॉलेज गेट समोर तळमावले ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
तळमावले व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत आज दि.५ मार्च पर्यत २३ रक्तदात्यांनी नोंदणी केली असून हा आकडा झपाट्याने वाढत आहे.२७ मार्चपर्यंत हा आकडा शंभरी पार करून पुढे जाईल असा विश्वास असोसिएशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे
रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात.......
चला तर मग आपण रक्तदान करून एखाद्या गरजवंतांची गरज पुर्ण करूया. हे महादान करून पुण्य पदरात पाडुन घेऊया.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा