बुधवार, ४ मार्च, २०२०

आधार प्रमाणीकरणासाठी शेतकर्‍यांची लूट सुपा येथे सीएससी चालकांकडून प्रत्येकी 100 रुपयांची आकारणी

पारनेर/ प्रतिनिधी ः
कर्जमाफीसाठी सध्या शेतकर्‍यांची आधार प्रमाणीकरण करण्याची धावपळ सुरु आहे. या धावपळीचाच गैरफायदा सीएससी चालक घेत असल्याचे सुपा येथे दिसून आले. सुपा येथील काही सीएससी चालकांकडून आधार प्रमाणीकरणासाठी प्रत्येकी 100 रुपयांची लूट शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
राज्य सरकारने नुकतीच महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून सरकारकडून कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी सेतू केंद्र व सीएससीवर गर्दी करु लागले आहेत.
पारनेर तालुक्यातील सुपा येथील काही सीएससी चालक म्हणजे कॉमन सर्व्हीस सेंटरवाले प्रत्येक शेतकर्‍याकडून एका आधार प्रमाणीकरणासाठी 100 रुपये घेत आहेत.
महसूल विभागाने आधार प्रमाणीकरण मोफत करण्याचे आदेश सीएससीचालकांना दिले आहेत. तरीही शेतकर्‍यांची लूट केली जात आहे. मुळात शेतकरी आगोदरच निसर्गाची लहर, बाजार भाव, बी- बियाण्याचे वाढते भाव व शेतमालाला नसलेला बाजारभाव यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.
आता कुठे कर्जमाफीने थोडासा दिलासा मिळत असताना काही संधीसाधू त्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...