रविवार, ६ ऑक्टोबर, २०२४

*मोरणा शिक्षण संस्थेतील तीन अध्यापकांना नेशन बिल्डर अवॉर्ड 2024 प्रदान*

*मोरणा शिक्षण संस्थेतील तीन अध्यापकांना नेशन बिल्डर अवॉर्ड 2024 प्रदान* 
पाटण -  रोटरी क्लब ऑफ मुंबई साऊथ यांच्या वतीने 5सप्टेबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण  क्षेत्रामध्ये उल्लेखणीय  काम केल्याबद्दल शिक्षकांचा गुणगौरव करून त्यांना रोटरी क्लब च्या माध्यमातून नेशन बिल्डर अवॉर्ड हा पुरस्कार देवून सन्मानित केले जाते, यावेळी त्यांनी मोरणा शिक्षण संस्थेतील श्री.संजयकुमार लालासो डोंगरे उप शिक्षक- शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे, श्री.तुकाराम विष्णू शिंदे,उप शिक्षक- न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ - धावडे व श्री.सचिन विलास कदम प्र.मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल नाटोशी यांना नुकताच मुंबई येथे एस.एन.डी.टी कॉलेज मरीन ड्राईव्ह येथे  रोटरी क्लब ऑफ मुंबई चे नर्गीस गौर,प्राचार्य नवनाथ पानस्कर सर, तसेच रोटरी चे पदाधिकारी यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात आला,
या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री त सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब ,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा , लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी  साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा, युवा नेते, जयराज देसाई दादा , आदीत्यराज देसाई दादा, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विविध शाखेचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व आजी माजी विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...