मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांच्याकडे असणे आवश्यक - मा.श्री.पी.एल केंडे.

 जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांच्याकडे असणे आवश्यक - मा.श्री.पी.एल केंडे. 


पाटण - जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वास हे गुण विद्यार्थ्यांच्याकडे असणे आवश्यक आहे , तरच आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा टिकून राहणार आहे, असे मत शिक्षक पालक सह विचार दरम्यान मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी. एल. केंडे सर यांनी व्यक्त केले.
यावेळी इ.5 वी व इ.8 वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आलेली होती.
या सहविचार सभेचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले , यावेळी स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख  कु.मणेर एस एस.यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी या पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते, शेवटी या पालक सभेचे आभार विद्यालयातील वरीष्ठ शिक्षक श्री.डोंगरे एस.एल.सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...